अकरावी ऑनलाइन प्रवेशांची दुसरी यादी शनिवारी ५ डिसेंबर रोजी जाहीर झाली. ही यादी अकरावी ऑनलाइनच्या अधिकृत संकेतस्थळावर 11thadmission.org.in वर जाहीर करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेला प्रवेश ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत निश्चित करावायाचा आहे. पुढील पद्धतीने मेरीट लिस्ट डाऊनलोड करता येईल -
FYJC 2nd Merit List 2020 डाऊनलोड कशी करावी?
- अकरावी ऑनलाइनच्या 11thadmission.org.in या संकेतस्थळावर जा.
- मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद किंवा अमरावती यापैकी तुमचा विभाग निवडा.
- तुमचा आयडी आणि पासवर्ड यांच्या सहाय्याने लॉगइन करा.
- सबमीट करा आणि अलॉटमेंट निकाल पाहा.
कनिष्ठ महाविद्यालये ९ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार दिलेल्या प्रवेशाची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. तिसऱ्या फेरीसाठी किती जागा आहेत, त्याचा तपशील १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येईल.
अकरावी ऑनलाइन प्रवेशांची दुसरी गुणवत्ता यादी पाहण्यासाठी विभागनिहाय थेट लिंक पुढीलप्रमाणे आहेत -
हे ही वाचा
0 Comments