Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हांर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्र १ - (समानीकरणातून बदलीस पात्र शिक्षक यादी निश्चिती) कसा राबविला जाईल❓ टप्पा क्र १ बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया टप्प्यानिहाय पूर्ण केली जाईल. प्रथम समानीकरन, नंतर संवर्ग १ च्या बदल्या, नंतर संवर्ग २ च्या बदल्या, नंतर संवर्ग ३ च्या बदल्या, नंतर संवर्ग ४ च्या बदल्या, सर्वात शेवटी विस्थापितांच्या बदल्या केल्या जातील. टप्पा १ बाबत बऱ्याच शिक्षकांना साशंकता आहे. कसा राबविला जाईल टप्पा १ पहा. ❓


टप्पा क्र १ - समानीकरणातून बदलीस पात्र शिक्षक कसे ठरविले जातील? 

ज्या शाळांमध्ये समानीकरणातून रिक्त ठेवायच्या पदापेक्षा कमी रिक्त पदे असतील आणि त्या शाळेतील शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांची बदली करण्यात येईल. तथापी बदलीपात्र शिक्षक नसतील तर अतिरिक्त शिक्षक निश्चित केले जातील. त्यांचा बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत समावेश करण्यात येईल. 

उदा १ - समजा एका शाळेत १० शिक्षक मंजूर आहेत. समानीकरणातून त्या शाळेत ३ जागा रिक्त ठेवायच्या आहेत. सद्यस्थितीत त्या शाळेत एकच पद रिक्त आहे. अशावेळी दोन सेवाजेष्ठ शिक्षकांचा बदलीस पात्र यादीत समावेश करण्यात येईल. (बदलीस पात्र नसले तरीही)

उदा २ - समजा एका शाळेत १० शिक्षक मंजूर आहेत. समानीकरणातून त्या शाळेत ३ जागा रिक्त ठेवायच्या आहेत. सद्यस्थितीत त्या शाळेत एकही पद रिक्त नाही. अशावेळी तीन सेवाजेष्ठ शिक्षकांचा बदलीस पात्र यादीत समावेश करण्यात येईल. (बदलीस पात्र नसले तरीही) 

उदा ३ - समजा एका शाळेत २ शिक्षक मंजूर आहेत. समानीकरणातून त्या शाळेत एक पद रिक्त ठेवायचे असल्यास कार्यरत दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाचा समावेश बदलीपात्र यादीत केला जाईल. (बदलीस पात्र नसला तरीही) 



Post a Comment

0 Comments

close