Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर अंमलबजावणी

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर 20 जून पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 17 व 18 जून ला पूर्व चाचणी घेण्यात येणार होती, परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. सेतू अभ्यासक्रम PDF दिवसनिहाय व इयत्तानिहाय डाउनलोड करा. सदर उपक्रम 30 दिवस राबवयचा असून दिवसनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतीपत्रिकांचा सराव करावयाचा आहे. पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ अंमलबजावणी बाबतचे परिपत्रक 1 डाउनलोड करा. - Click Here17.06.2022 चे परिपत्रक - नवीन बदल

सेतू पूर्व चाचणी 20 जून ते 25 जून दरम्यान घेणे बाबत ( विदर्भात 28 जून ते 4 जुलै दरम्यान) 

क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत सेतू अभ्यासक्रम पूर्वीची विद्यार्थी अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्वेक्षण फॉर्म द्वारे विद्यार्थी माहिती संकलित केली जाणार आहे. 

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ अंमलबजावणी बाबतचे परिपत्रक (17.06.2022) डाउनलोड करा. - Click Here


दिवसनिहाय सेतू अभ्यास मिळण्यासाठी Telegram Channel जॉईन करा. 


01 जुलै ची वेतनवाढ व एकूण वाढणारा पगार काढा 5 सेकंदात - Click Here


पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप :

१. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

२. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्ता महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे. 

३. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे. 

४. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती अरेत आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत. 

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दि. २३ जुलै / दि. ६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.


पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी

पूर्व चाचणी - 17 व 18 जून बदल 20 ते 25 जून
सेतू अभ्यास कालावधी - 20 जून ते 23 जुलै 
उत्तर चाचणी - 8 व 10 ऑगस्ट


विदर्भातील शाळांसाठी चे नियोजन

पूर्व चाचणी - 1 व 2 जुलै (बदल 28 जून ते 4 जुलै) 
सेतू अभ्यास कालावधी - 4 जूलै ते 6 ऑगस्ट
उत्तर चाचणी - 8 ते 10 ऑगस्ट

पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :

१. सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात. 

३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.

४. सदर कृतीपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.

५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात. 

6. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी.  उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात. 

7. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी.

८. शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेसाठी दि. ९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी विषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप, कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल.

उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व घटकांना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झालेनंतर शाळा भेटींच्या आधारे सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल पुढील १५ दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास विनाविलंब सादर करावा.

💐 सेतू अभ्यासक्रमास शुभेच्छा

➖➖📚➖➖📚➖➖

💥 सेतू अभ्यासक्रम Bridge Course PDF डाउनलोड करा.

इयत्ता - 2री ते 10वी

https://bit.ly/Bridge-Course-pdf-std2-to-std10

➖➖➖➖➖➖➖➖➖

💥 सेतू अभ्यासक्रम (Bridge course) बाबत विद्यार्थ्यांसाठी सूचना

Read all instructions 👇

 https://cutt.ly/AmutKvu

➖➖➖➖➖➖➖➖➖

💥 सेतू अभ्यासक्रम (Bridge course) बाबत शिक्षक व पालकांसाठी सूचना

Read all instructions 👇

 https://cutt.ly/Mmimht1

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

➡️ सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांना शेअर करा.

Post a Comment

0 Comments

close