Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दहावी निकाल 2023 वेबसाइट लिंक | SSC Result 2023 website link | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा सन 2023 चा निकाल पाहण्यासाठी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल २०२3 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दती नुसार दिनांंक 02/०६/२०२3 पर्यंत जाहीर करण्यात येईल. बोर्डाच्या नियोजनाप्रमाणे दुपारी ०1.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

निकाल 2023 नोटिफिकेशन PDF डाउनलोड करा. Click Here

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०23 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक 02/०६/२०२3 रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. 



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२3 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक 02/०6/२023 रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. 

12 th Result Link - Click Here

Join WhatsApp group

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा सन २०२3 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे.

इयत्ता दहावी निकाल खालील वेबसाइट वरुन पहा. 

https://sscresult.mkcl.org/ (recommended) 

mahresult.nic.in (recommended) 

https://ssc.mahresults.org.in/ (recommended) 

www.mahahsscboard.in


https://lokmat.news18.com

https://www.indiatoday.in/education-today/results

https://mh12.abpmajha.com

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध


सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

१) उत्तरपत्रिका गुणपडताळणी / छायाप्रत /पुनर्मूल्यांकन / यासाठी 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in 

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी दिनांक 03/०६/२०२3 ते  दिनांक 12/०६/२०२3 पर्यंतछायाप्रतीसाठी  दिनांक 03/०६/२०२3 ते दिनांक 22/०6/२०२3 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.

२) मार्च - एप्रिल २०२3 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) मार्च - एप्रिल २०२3 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. 

४) जुलै-ऑगस्ट २०२3 मध्ये आयोजित करण्यात येणान्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्याथ्र्यांसाठी सोमवार दिनांक 03/0६/२०२3 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

५) मार्च-एप्रिल २०२3 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.


Post a Comment

1 Comments

close