Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

समता पर्व 2022 - दिनांक २६ नोव्हेंबर, संविधान दिन ते ६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व आयोजित करणेबाबत शासन निर्णय

समता पर्व 2022 - दिनांक २६ नोव्हेंबर, संविधान दिन ते ६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व आयोजित करणेबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केलेली आहे. सदर राज्यघटना ही दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आलेली आहे. त्यानुषंगाने ज्या संविधानाने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या त्या संविधानाची ओळख सर्वांना करुन देण्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.


संविधान दिनानिमित्त उपयुक्त माहिती - Click Here

संविधान दिनानिमित्त संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा. आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा. - Click Here


संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे दिनांक १६ डिसेंबर हा दिवस भारतीयांसाठी दुःखाचा गांभिर्याने पालन करावयाचा दिवस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२२, संविधान दिन ते ६ डिसेंबर, २०२२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व आयोजित करण्यात येणार आहे. 

दिनांक २६ नोव्हेंबर २०२२, संविधान दिन ते ६ डिसेंबर, २०२२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीतील आयोजित समता पर्वामध्ये पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात यावेत.

समता पर्व दररोजचे कार्यक्रम डाउनलोड करा. Click Here




समता पर्व आयोजित करतांना ग्राम पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद वा राज्य निवडणुक आयोगाने घोषित / लागू केलेल्या अन्य कोणत्याही निवडणुक / पोट निवडणुकीची आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2022 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here

Post a Comment

0 Comments

close