Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

JEE Advanced 2021 परीक्षा पुढे ढकलली... 3 जूलै रोजी होणार होती.

कोविड-१९ च्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुढील सूचना मिळेपर्यंतJEE Advanced परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.


JEE Advanced 2021 postponed: या वर्षीची जॉइंट एन्ट्रन्स एग्जाम (JEE) ॲडव्हान्स्ड 2021 ची परीक्षा भारतीय प्रौद्योगिकी संस्था, IIT खरगपूर च्या वतीने घेतली जाणार आहे. या वर्षीची JEE Advanced 2021 परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी आयोजित होणार होती.  परंतू कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे JEE ॲडव्हान्स्ड 2021 परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. 

हे सुद्धा वाचा.

जेईई ॲडव्हान्स्ड 2021 परीक्षेची नवी तारीख कधी?

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा तूर्त पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, परीक्षेच्या सुधारित तारखेची घोषणा जेईई ॲडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in वर जाहीर केली जाईल. 

जेईई मेन 2021 एप्रिल-मे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला होता. यामुळे जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ जुलै परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. करोना व्हायरस महामारीचे संकट पाहता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) सध्या परीक्षा आयोजित करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत.  

JEE main exam मातृभाषेतून देता येणार..... 

जेईई मेन परीक्षा पॅटर्न

लॉकडाऊनमुळे अभ्यासक्रम बदलणाऱ्या शाळा, बोर्डांमार्फत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी जेईई मेनची पद्धत यावेळी बदलली आहे. प्रश्नपत्रिकांना पर्याय असणार आहेत. आता दोन विषयांमध्ये विभागलेल्या प्रत्येक विषयात उमेदवारांचे 30 प्रश्न असतील. विभाग अ मध्ये 20 प्रश्न असतील तर विभाग ब मध्ये 10 प्रश्न असतील. विभाग ब मधील 10 प्रश्नांपैकी कोणत्याही पाच प्रश्नांचे उमेदवारांना उत्तर देता येणार आहे.

हे सुद्धा वाचा.



सुमारे २.५ लाख विद्यार्थी प्रभावित

जेईई मेन परीक्षा २०२१ क्वालिफाय करणारे विद्यार्थी ॲडव्हान्स्डसाठी पात्र असतात. प्रत्येक वर्षी सुमारे २.५ लाख विद्यार्थी जेईई मेन परीक्षेत पात्र ठरून मग जेईई ॲडव्हान्स्डसाठी अर्ज करतात. प्रत्येक प्रवर्गातील रँक आणि गुण लक्षात घेता उमेदवारांची संख्या थोडी जास्त होऊ शकते.

JEE Advanced  परीक्षा संपूर्ण माहितीचा Video

🎯 या परीक्षेसाठी *अर्ज* कसा करावा? 
🎯 अर्ज करण्यास *मुदत* किती तारखेपर्यंत? 
🎯 *परीक्षा फी* किती? 
🎯 *रिझल्ट* कधी लागणार? 
📌 *यासह JEE Advanced परीक्षेच्या संपूर्ण माहितीसाठी पुढील लिंक ला टच करा.* 👇

📌 *ही परीक्षा देण्यासाठी पात्रता कोणत्या ?*
📌  *कोणकोणत्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी* ही परीक्षा घेतात?
📌 *JEE main* परीक्षेतील किती विद्यार्थी ही परीक्षा देवू शकतात. *Category wise संख्या?*
📌 परीक्षेचा *पॅटर्न* कसा?
💥 *वरील सर्व माहितीसाठी पुढील लिंक ला टच करुन video पहा.*


💥 *इ.10वी ते इ.12वी मधील विद्यार्थी व पालकांसाठी उपयुक्त असा  video.*
Tags 
Jee main 2021
Jee main attempts four
Jee main 2021 registration 
Jee main Exam pattern
Jee main exam language
Jee advanced exam
जेईई मेन 2021
जेईई मेन 2021 4 प्रयत्न करता येणार.
जेईई मेन 2021 नाव नोंदणी रजिस्ट्रेशन
जेईई मेन परीक्षा पॅटर्न

Post a Comment

0 Comments

close