ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टल | Online Teacher Transfer Portal | ottportal | https://ottportal.mahardd.com
June 09, 2022
जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीने होणार असून सदर बदल्याचे पोर्टल 9 जून पासून सुरु करण्यात येत आहे.
आंतरजिल्हा बदली process पूर्ण झाली असून बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या ईमेलवर बदली झाले संदर्भात चे मेल पाठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपला ई-मेल चेक करावा.
बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी शिक्षक बदली पोर्टल सुरु करण्यात आले आहे. 👇 बदली झालेल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या लॉगीन वरुन बदली आदेश डाउनलोड करता येतील.
प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली आदेश डाउनलोड करा.
प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन २०२२ मध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या शिक्षकांच्या बदली आदेशाकरिता सर्व शिक्षकांचे लॉगिन सक्षम करण्यात आले असून काही वेळात प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या बदली पोर्टल (ott.mahardd.in) वैयक्तिक लॉगिनला आदेश दिसून येतील. सर्व बदली झालेल्या शिक्षकांनी आपल्या वैयक्तिक लॉगिन मध्ये जाऊन Intra District या टॅब मधील Transfer Order या टॅबमधून आपला बदली आदेश प्राप्त करून घेणेबाबत सर्व शिक्षकांना सूचित करावे. त्याचप्रमाणे BEO लॉगिन मध्ये सुद्धा सर्व शिक्षकांचे बदली आदेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यमुक्ती व रुजू संदर्भात सविस्तर सूचना यास्तरावरून आपणांस स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.
आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाले बाबत व पुढील टप्पा जिल्हांतर्गत बदल्या बाबत vinsys कंपनीचा Video पहा. Click Here
New Update 22.08.2022
ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना E-mail द्वारे सूचित करण्यात येत आहे.
आंतरजिल्हा बदली आदेश 24 ऑगस्ट रोजी निर्गमित होणार.
NOC, संवर्ग 1, संवर्ग २ यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून आता सर्वसाधारण संवर्ग यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. याबाबत 18 ऑगस्ट चे परिपत्रक पहा.
सर्वसाधारण संवर्ग पडताळणी साठी आवश्यक कागदपत्रे
नेमणूक आदेश
सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची प्रत
जात प्रमाणपत्र
*विशेष संवर्ग 2 मधील अर्ज केलेल्या शिक्षकांना महत्वाच्या सूचना*
1) आपण विशेष संवर्ग 2 मधून अर्ज केला आहे त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या कार्यालयाने सेवेत असलेबाबतचा दिलेल्या दाखल्याची *झेरॉक्स प्रत व मूळ प्रत*.सोबत आणावी.
2) जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्राची *झेरॉक्स प्रत व मूळ प्रत* सोबत आणावी.
3) जोडीदार नात्यासाठी पती -पत्नी विवाह नोंद दाखला, सेवापुस्तकात वारस नोंद म्हणून जोडीदाराचा उल्लेख असलेल्या पानाची सत्यप्रत,रेशनकार्ड, जोडीदाराचे आधारकार्ड, जोडीदाराच्या नावात बदल असल्यास राजपत्र इ.
वरील सर्व कागदपत्रांच्या *झेरॉक्स प्रत व मूळ प्रत* सोबत आणाव्यात.
4) शिक्षकांचा जोडीदार राज्य अथवा केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत येत असल्यास तसा स्पष्ट अभिप्राय असलेचा दाखला *मूळप्रत* सोबत आणावी.
5) ज्या शिक्षकांचा जोडीदार अनुदानित संस्थेतील कर्मचारी असेल्यास सदर संस्था अनुदानित असेलबाबतचा दाखला *मूळप्रत* सोबत आणावी.
New Update
9.08.2022
शासन स्तरावरून सर्वानाच आंतरजिल्हा बदली फॉर्ममध्ये दुरुस्तीची संधी देण्यात येत आहे.
*त्यासाठी शिक्षकांनी प्रथम आपले बदली पोर्टल लॉगिन करावे.*
👉 शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन केल्यावर *Appliction Form* वर क्लिक करावे
👉आपणास आपल्या बदलीफॉर्म च्या माहितीसह *Withdraw* हे बटण दिसेल त्यावर क्लिक करावे.
👉यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर *OTP* येईल सदर OTP नोंद केल्यावर *Action Performed Successfully* असा मेसेज दिसेल.
👉त्यानंतर पोर्टलवर परत एकदा फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली दिसेल यामध्ये सुरवातीला *Demotion Disclaimer* दिसेल ती वाचल्यावर शेवटी *Accept*-या बटनावर क्लिक करावे.
👉 त्यांतर आपणास ज्या संवर्गातून बदली फॉर्म भरायचा आहे त्यातून योग्यरित्या फॉर्म भरावा.
*महत्वाची सूचना*
बदली फॉर्म दुरुस्ती संधी दिली आहे. त्यामुळे बदली फॉर्म काळजीपूर्वक भरावा त्यामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.
Roster म्हणजेच बिंदुनामावली बाबत सविस्तर माहितीचा Video - Click Here
या विडिओ मधून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये असणाऱ्या बिंदूनामावली या महत्त्वाच्या मुद्याबाबत येथे सविस्तर माहिती मिळणार आहे. संगणकीय बदली प्रणालीमध्ये बिंदूनामावली कोण व कसे भरू शकते ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे शिक्षण अधिकाऱ्यांनी Roster म्हणजेच बिंदूनामावलीचा फॉर्म कसा भरायचा याची मुद्देसूद महिती घेणार आहोत.👇
18 जुलै रोजी आंतरजिल्हा बदली पोर्टल फेज 2 सुरु होणार लिंक -
ऑनलाईन शिक्षक बदली 2022 संपूर्ण वेळापत्रक (13 जुलै)
13/07/2022 रोजी इंटर डिस्ट्रीक्ट टॅब उपलब्ध झाली आहे. सध्या रोस्टर अपडेट नसल्याने पुढील माहिती आढळून येत नाही. 18 जुलै पासून आंतर जिल्हा बदली phase 2 सुरु होईल.
4. शिक्षकांना profile update करण्याची सुविधा *दिनांक 13/ 6/ 2022 पासून ते दिनांक 20/ 6/ 2022* पर्यंतच आहे.
5.वरील कालावधीत सर्व शिक्षकांनी आपले profile update करणे अनिवार्य आहे.
6. *Personal details* मधील माहिती आपल्याला बदलता येणार नाही. Personal details मधील माहिती चुकीची असल्यास BEO कार्यालयाशी संपर्क साधा.
7. *Employment details* मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करून अचूक काळजीपूर्वक बिनचूक भरायची आहे.
*8. Date of appointment* - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व आंतर जिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा *(ऑर्डर वरील दिनांक भरू नये)*
*9. Cast category* - Drop down लिस्ट मधून सिलेक्ट करावा.
*10. Appointment category* - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा आपल्या मूळ नियुक्ती आदेशावर दिलेली आहे.त्यानुसारच नोंद करणे
*11. Current district joining date* - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा *(ऑर्डर वरील दिनांक भरू नये)*
12. Udise code of current School - शिक्षकांनी कार्यरत शाळेचा यु डायस नंबर चेक करूनच काळजीपूर्वक बिनचूक भरावा.
13. Current School joining date - यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे *(ऑर्डर वरील दिनांक भरू नये)*
14. *Current teacher type* - Graduate / Under graduate यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा.
15. *Teaching subtype* यामध्ये graduate teacher असेल त्यांनी *भाषा/ गणित -विज्ञान /समाजशास्त्र* यापैकी एक आपल्या आदेशात नमूद असलेला विषय सिलेक्ट करावा
16. *Teaching Medium* - या मध्ये Marathi/ Urdu आपल्या शाळेचे माध्यम निवडा.
17.*Last Transfer Category* - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होऊन आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.*(2019 मधील अवघड व सर्वसाधारण क्षेत्र)*
Cadre 1 संवर्ग 1
Cadre 2 संवर्ग 2
Untitled संवर्ग 3
Eligible संवर्ग 4
NA- एकदाही बदली न झालेले.
18.*Last Transfer Type* - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होऊन आलात तो प्रकार ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा लागू नसल्यास NA निवडा.
Intra District जिल्हांतर्गत बदली
Inter District आंतरजिल्हा बदली
19.Have you been suspended in last 10 years ?
आपण मागील 10 वर्षात निलंबित झाले असल्यास yes नमूद करावे.
🤔 प्रोफाईल अपडेट कोणी करायची ?
👉🏻 बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने पडताळून पाहणे आवश्यक आहे. आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.
👉🏻 माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.
0 Comments