MHT-CET 2022 परीक्षा होणार ऑगस्ट 2022 मध्ये. संभाव्य वेळापत्रक पहा.
June 09, 2022
शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी- 2023 ऑनलाईन प्रवेश परीक्षा ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे.
देशपातळीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रिय परीक्षा एजन्सीमार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई (मेन) या परीक्षेचे वेळापत्रक दिनांक ०६/०४/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदर वेळापत्रकाचे अवलोकन केले असता या कार्यालयातर्फे घेण्यात येणाया एमएचटी-सीईटी २०२२ या परीक्षेच्या (दिनांक २०,२१,२२ व २३ जून २०२२) या तारखा एकसमान असल्याचे दिसून आले.
जेईई (मेन) व नीट या सामाईक प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकाचे अवलोकन करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन एमएचटी-सीईटी २०२२ ही परीक्षा जुलै महिन्यात न घेता माहे ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले.
दिनांक २६/०४/२०२२ रोजी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या परीक्षा ०१ जुन ते १५ जुलै, २०२२ या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याअनुषंगाने दिनांक २१/०४/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या सुधारीत वेळापत्रकामध्ये विद्यार्थी हितास्तव पुन्हा सुधारणा करण्यात आलेली असून सुधारीत अंदाजित वेळापत्रक विद्यार्थी, पालक व संस्था यांच्या माहितीस्तव प्रसिध्द करण्यात येत आहे.
अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी १९ मार्च, २०२२ ते १२ एप्रिल, २०२२ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच सीईटी परीक्षा अंदाजे दिनांक ०२ ऑगस्ट, २०२२ ते २५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
0 Comments