Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एमएचटी सीईटी 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता महत्वाच्या सुचना

 


एमएचटी सीईटी २०२3 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता महत्वाच्या सुचना Click Here

एमएचटी सीईटी २०२3 साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. 

MHT-CET 2023 Online Application  - Click Here

अर्ज करण्यापूर्वी एमएचटी सीईटी २०२3 साठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे सखोल वाचन करावे. 

उमेदवाराने इयत्ता १० वी किंवा इयत्ता १२ वी च्या गुणपत्रीकेवरील नाव अर्ज भरताना त्याचं क्रमाने नमूद करावे. 

उमेदवाराने स्वतःचा फोटो व सही योग्य पद्धतीने व योग्य Size मध्ये अपलोड करावे.

उमेदवाराने जर राखीव प्रवर्गामधून परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केला असेल, तर प्रवेश प्रक्रीयेपूर्वी खालील नमुद प्रमाणपत्रे तयार ठेवावीत

जात प्रमाणपत्र

वैधता प्रमाणपत्र 

Non creamy layer certificate

उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा करण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून भरलेली माहिती योग्य आहे याची खातरजमा करावी.

भरलेल्या माहिती मध्ये बदल करण्यासाठी Edit सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा केल्या नंतर भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

उमेदवाराने परीक्षा केंद्रांची निवड काळजीपूर्वक करावी.

कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही.

उमेदवाराने अर्ज भरताना PCM किंवा PCB किंवा दोन्ही ग्रुपची नोंद काळजीपूर्वक करावी. 

उमेदवारास परीक्षा देण्याकरिता प्रश्न पत्रिका इंग्रजी/मराठी/उर्दू या भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

उमेदवाराने अर्जभरताना प्रश्न पत्रिकेची योग्यती भाषा निवडावी.

उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा केल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट व अदा केलेल्या शुल्काची पावती प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे.

उमेदवाराने विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.

एमएचटी सीईटी २०२3 परीक्षेच्या अनुषंगाने या कार्यालयतर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या जाहीर सुचनाच्या माहितीसाठी उमेदवाराने या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला अनियमितपणे भेट द्यावी.

MHT-CET 2023 अधिकृत संकेतस्थळ - Click Here

उमेदवाराने कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे Login Id व Password इतर व्यक्ती सोबत share करू नये. 

उमेदवाराने परीक्षाअर्ज भरताना स्वतःचा मोबाईल न. व ई-मेल आयडी द्वावा, जेणेकरू, परीक्षेबाबतच्या सुचना संबंधित मोबाईल न. वर sms द्वारे पाठविण्यात येतील. 

उमेदवारास अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी, संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन न. वर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments

close