New Update - 17 April 2025
शिक्षक बदली - कालच्या VC मधील मुद्दे
1. सर्व जिल्हयानी आपली गोल्डन फाइल डाउनलोड करावी. त्यातील अॅक्टिव शिक्षक, inactive शिक्षक , निलंबित शिक्षक, शिक्षण सेवक, सेवानिवृत्तीसाठी एक वर्ष राहिलेले शिक्षक या सर्वांची संख्या पडताळून घ्यावी.
2. निलंबित शिक्षक Inactive असतील तर त्यांना अॅक्टिव करून घ्यावे. फक्त current working (कार्यरत शिक्षक) शिक्षकांची संख्या चुकू नये म्हणून त्यांना अॅक्टिव करावे, त्यांना बदली प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. तसेच वन यूनिट मध्येही त्यांची बदलीहोणार नाही.
3. सेवानिवृत्तीला 1 वर्षे राहिलेले शिक्षक Inactive केले असतील तर त्यांना अॅक्टिव करावे. त्यांना फक्त विशेष संवर्ग 1 मधून बदली हवी असेल तर अर्ज करता येईल. इतर कुठलेही टॅब त्यांना उपलब्ध होणार नाहीत तसेच विशेष संवर्ग 1 व्यतिरिक्त कुठल्याही यादीत त्यांचे नाव येणार नाही.
4. जात प्रवर्ग खुला आणि नियुक्ती प्रवर्ग ews असेल तर validation काढण्यात आलेले आहे. तर अशा शिक्षकांचे प्रोफाइल अॅड करून सबमिट करून घ्यावे.
5. 2022 मध्ये जे शिक्षक अधिकार प्राप्त शिक्षक होते (आर डीडी पत्र 28 मार्च 2025 आणि 16 एप्रिल 2025) व ज्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना 2025 च्या बदली मध्ये पुनः संधि देण्यात येणार आहे. त्या सर्व शिक्षकांची यादी आम्ही तुम्हाला पाठवत आहोत. सर्व जिल्हयानी आपली यादी पडताळून घ्यावी. व सुधारित यादी आम्हाला पाठवावी. पोर्टल वर पुनः बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसारित केली जाइल.
6. गटशिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षकाची माहिती अद्ययावत करण्यासाठी पोर्टल वर टॅब खुला करून देण्यात येईल. तेव्हा गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील शिक्षकांची माहिती अद्ययावत करून घ्यावी. 1. सरनेम 2. विद्यमान क्षेत्र रुजू दिनांक 3. Marital status 4. लिंग , इत्यादि माहिती अद्ययावत करून घ्यावी.
7. शिक्षक Inactive चे अॅक्टिव केले असतील तर त्या शिक्षकांचे प्रोफाइल beo force acceptance मधून accept करून घ्यावे.
8. डेटा अपडेट व करेक्शन ची फेज तीन दिवस चालू राहील. तेव्हा सर्व जिल्हयाणणी आपापळी माहिती अद्ययावत करून घ्यावी
9. त्यानंतर वेकन्सी अपडेट चालू होईल. तेव्हा सर्वांना विनंती आहे की माहिती वेळेत आणि अचूक अद्ययावत करून घ्यावी. वेकन्सी चालू झाली की डेटा अपडेट फेज बंद होईल याची नोंद घ्यावी.
OTT vinsys कंपनीचा बदली बाबतचा कालचा video -
New Update - 16 April 2025
जिल्हांतर्गत बदलीबाबत येणाऱ्या अडचणीवर Vinsys कंपनी पुणे यांनी दिलेली प्रश्नांची उत्तरे पहा.
New Update - 15 April 2025
जिल्हांतर्गत बदली साठी संवर्ग 2 मधील बदली पात्र शिक्षकांना नकार देण्याचा अधिकार मिळणेबाबत शिक्षणमंत्र्यांचे ग्रामविकास मंत्री यांस पत्र
Comment on Facebook post -
New Update 11 April 2025
बदली पात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या बदली ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करणे सुरू आहे.
Eligible Transfer list - बदली पात्र शिक्षक यादी
Entitled Transfer list - बदली अधिकार प्राप्त शिक्षक यादी
Eligible for difficult round - दुर्गम क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठीची फेरी 7 साठी शिक्षक यादी
ott portal - Online Teachers Transfer Portal 👇
जिल्हांतर्गत शिक्षक बदली 07.11.2024 च्या बदली वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे.
New Update - 09 April 2025
दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक घोषित करणेत आले आहे. सदर वेळापत्रक मा. उच्च न्यायालय, नागपूर यांनी अवमान याचिका क्र. २१६/२०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार घोषित करण्यात आले असून त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविणेबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
त्यामुळे प्रधान सचिव (ग्राम विकास) यांनी या विषयाबाबत दि.०४.०४.२०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या विहीत वेळापत्रकानुसार करणेबाबत शासन परिपत्रक 09 April 25 - Click Here
जिल्हांतर्गत बदली वेळापत्रक दि. 07.11.2024 चे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
जिल्हांतर्गत बदली 2024/25 वेळापत्रक
संवर्ग 1 बदली - 28 एप्रिल ते 3मे ...7 दिवस
संवर्ग 2....4 मे ते 9 मे ...6दिवस
संवर्ग 3....10 मे ते 15 मे ....6 दिवस
संवर्ग 4....16 मे ते 21 मे ....6दिवस
विस्थापित बदल्या...22 मे ते 27 मे....6दिवस
अवघड क्षेत्रातील जागा भरणे....28 मे ते 31 मे ....4दिवस
New Update
Phase 1 Completed
Phase 2nd started
Phase2 - आंतरजिल्हा बदली
आंतरजिल्हा बदलीसाठी रोस्टर अपडेट करण्यास 12 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी अंतिम रोस्टर पाहण्यासाठी उपलब्ध होईल.
सर्व जिल्ह्याचे रोस्टर अपडेट न झाल्यास आंतरजिल्हा बदल्या रद्द करुन जिल्हांतर्गत बदल्या सुरु होणार?
ott portal - Online Teachers Transfer Portal 👇
New update -28/03/2025
जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदलीबाबत शासन परिपत्रक - 28 मार्च 2025
🔰 जिल्हांतर्गत बदली
1) _परिपत्रकानुसार ज्या शिक्षकांना 30 जून 2025 पर्यंत वयाची ५३ वर्ष पूर्ण झालेले आहेत *त्यांना संवर्ग एक चा लाभ मिळणार आहे*._(हा नियम फक्त ५३+ साठीच लागू आहे.)
2) _ज्या शाळा पुर्वी अवघड क्षेत्रात होत्या परंतु 2022 च्या यादीनुसार त्या सोप्या क्षेत्रात आल्या त्यांना या बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्राचा म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा लाभ मिळणार आहे._
3) _जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेपुर्वी जिल्हा परिषदेने *सर्व प्रकारच्या पदोन्नती प्रक्रिया पूर्ण* करावयाची आहे._
4) _पुढील बदली वर्षात म्हणजेच सन २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी बदली मागितली असल्यास त्यांची बदली संवर्ग 01 मधून करण्यात येईल._
🔰 आंतरजिल्हा बदली
1) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2024-25 करीता शिथील करण्यात येत आहे.
2) संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात.
28/03/2025 चे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
New Update - 24/03/2025
दुर्गम / अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपली शाळा दुर्गम / अवघड क्षेत्रात आहे किंवा नाही हे कसे शोधाल❓
👉 प्रथम बदली पोर्टलला लॉगीन करा.
👉 त्यानंतर Difficult Area या टॅब ला टच करा.
👉 त्यानंतर Search बॉक्स मध्ये आपल्या शाळेचे नाव टाकून 🔍 चिन्हाला टच करा.
👉 तुमच्या शाळेचे नाव अवघड क्षेत्रात 2022 आणि 2025 नुसार आहे किंवा नाही? हे दिसेल.
0 Comments