Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

शिक्षक बदली 2022-23 अपडेट | संवर्ग 1 व संवर्ग 2 बाबत दोन महत्त्वाची परिपत्रके | दररोजचे अपडेट व संपूर्ण माहिती वाचा.

शिक्षक बदली 2022-23 संदर्भात सर्व अपडेट येथे उपलब्ध करुन दिले जातील. 

शिक्षक बदली बाबतचे लेटेस्ट शासन निर्णय व परिपत्रके नवीन अपडेट - Click Here

जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली संपूर्ण  VC Update - Click Here

Teacher's Transfer Portal Login - Click Here

Most Useful - जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया संपूर्ण माहिती व शंका समाधान- Click Here

शिक्षक बदली नवीन वेळापत्रक जाहीर - Click Here


ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.in/

महत्त्वाची सूचना

जिल्हाअंतर्गत बदली बाबत सोशियल मिडियातून अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. सदर मेसेज वर पूर्णतः अवलंबून न राहता, बदली संदर्भात काही शंका असल्यास आपल्या जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

👇 जिल्हानिहाय नोडल अधिकारी यादी
https://ottportal.mahardd.in/


शिक्षक बदली 2022-23 अपडेट


23 नोव्हेंबर - संवर्ग 1 व 2 साठी बदलीपात्र शिक्षक होण्यासाठी एका शाळेवर किमान 3 वर्षे सेवा आवश्यक असले बाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

22 नोव्हेंबर - संवर्ग 1 व 2 कागदपत्रे पडताळणी करणे व चुकीची माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाही करणेबाबत आजचे पत्र


18 नोव्हेंबर - शिक्षक बदली नवीन वेळापत्रक जाहीर - Click Here

18 नोव्हेंबर - महत्त्वाच्या सूचना: सीईओ लॉग-इन वरून आज/ उद्या वैकंन्सी यादी प्रकाशित केली जाईल त्यानंतरच शिक्षकांना लॉग इन उपलब्ध असेल याची नोंद घ्यावी.

संवर्ग 1 व संवर्ग 2 मधील शिक्षकांना होकार किंवा नकार नोंदविता येईल. त्यानंतर बदली फॉर्म भरता येतील. 
फॉर्म भरण्यासंदर्भात Vinsys चा Video पहा. 

15 नोव्हेंबर - माध्यम निहाय रिक्त पदे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिले बाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

11 नोव्हेंबर - जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2022

बदली प्रक्रिया 2022 साठी  आवश्यक असलेल्या बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या यादया EO लॉगीनवर प्राप्त झाल्या असून फक्त सदरच्या याद्या प्रसिद्ध करण्याबाबतचे वेळापत्रक मा. D.S.साहेब यांच्या लॉगीनवरून पोर्टलवर अपडेट केले आहे सदर वेळापत्रकानुसार दिनांक 11-11-2022 ते 12 -11-2022 या कालावधीत यादया प्रसिद्ध करावयाच्या आहेत  त्यामुळे आज दिनांक 11 -11 -2022 रोजी मा. शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीनंतर बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या ऑनलाईन /ऑफलाईन प्रसिद्ध केल्या जातील.

सदरच्या  यादया सर्व गटशिक्षणाधिकारी व सर्व शिक्षक यांच्या लॉगिनला उपलब्ध असणार आहेत.

त्यामुळे सदरच्या दोन्ही यादया आपले गटाकडील सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व सदरच्या यादया आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करावी.


सदर यादीबाबत कोणती कार्यवाही करावी हे सुधारित वेळापत्रक प्राप्त होताच कळवले जाईल.


*महत्वाच्या सूचना*


👉 लवकरच जिल्हाअंतर्गत बदली बाबत पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल

👉 आपले गटाकडील सर्व शिक्षकांना दि07/04/2021 व बदली संदर्भात ग्राम विकास विभागाकडून प्राप्त झालेली सूचना पत्र काळजीपूर्वक वाचण्यास सूचना द्याव्यात

👉 शक्यतो  या दरम्यान केंद्र संमेलन असल्यास शासन निर्णयाचे सामूहिक वाचन करावे जेणेकरून त्यावर चर्चा करून मार्गदर्शन मिळू शकते.

👉 काही वेळेस बदली संदर्भात इतर ठिकाणाहून VDO व PPT प्राप्त होत असतात  त्यामधील काही सूचना 100% अचूक असतीलच असे नाही म्हणून दि.07/04/2021 चा शासन निर्णय,ग्राम विकास विभागाकडील सूचनापत्र तसेच विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत VDO तसेच जिल्हा स्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचना या व्यतिरिक्त इतर कोणत्याही अन्य मार्गाने बदली संदर्भात केलेले मार्गदर्शन व त्यामुळे आपल्या बदलीत काही अडचण समस्या निर्माण झाल्यास ती जबाबदारी संबधित शिक्षकांची राहील या बाबत सर्वच सूचना द्याव्यात.


*लवकरच फॉर्म प्रक्रिया चालू केली जाईल*बदली नियंत्रण कक्ष 

जि.प.रत्नागिरी


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

7 नोव्हेंबर - शिक्षक बदली अपडेट

*👉🏻 बदली पात्र शिक्षकांच्या याद्या विंसी कडून सर्व जिल्हा परिषद यांना प्राप्त झालेल्या आहेत,पंस स्तरावरून व जिल्हा परिषद स्तरावरून आज त्या verify होणे अपेक्षित आहे.*


*👉🏻 सदर काम पूर्ण झाल्यावरच याद्या प्रकाशित होतील व त्यानंतर बदली प्रक्रिया सुरू होईल.*


*👉🏻लवकरच बदलीचे सुधारित वेळापत्रक येऊ शकते.*


*👉🏻 बदली पोर्टल आणखी सुरु नाही.*


बदलीसाठी ३१ डिसेंबर अखेरची माहिती घेतल्याने सर्व जिल्ह्यांचे  vacancy update चे  आतापर्यंत झालेले काम राज्य स्तरावरून  0 करण्यात आले आहे . 
राज्य स्तरावरून सूचना आल्यावर BEO LOGIN वरून पुन्हा Vacancy update करावी लागेल.

5 नोव्हेंबर - शिक्षक बदली अपडेट

✳️ *बदली अपडेट - शिक्षक लॉगिन अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही*


➡️ *जिल्हा कार्यालयाकडून शिक्षकांना बदली अर्ज करण्यासंदर्भात सूचना येणे अपेक्षित आहे*


➡️ *काल झालेल्या VC नुसार, सद्या 31/12/22 पर्यंत सेवानिवृत्त, कालच्या  तारखेपर्यंत निधन झालेले, यांना system मधून वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.*


➡️ *यानंतर BEO/EO Login वरुन Sanction, working & Compulsary vacancy update करणे आहे.*


➡️ *यानंतर eligible व entitled ची यादी व रीक्त पदे, समानीकरणात रिक्त पदे प्रसिद्ध केले जाईल*

➡️ समानीकरणातून अतिरिक्त शिक्षक कसे ठरविले जातात?

👇 समानीकरण धोरण कसे राबविले जाते?

https://www.shaleyshikshan.in/2021/04/teachers-transfer-samanikaran.html

➡️ *लगेच संवर्ग 1/2 साठी फार्म भरणे सुरू होईल*


➡️ *जोपर्यंत 31 डिसेंबर 2022 पर्यंत सेवानिवृत्त कालच्या तारखेपर्यंत निधन झालेले पोर्टलवरून वगळण्यात येत नाही..* 


➡️ *गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी लॉगिन वरून संच मान्यतेनुसार उपलब्ध पदे व कार्यरत पदे अपडेट करून संपूर्ण जिल्ह्यातील रिक्त पदा नुसार समानीकरणांनुसार बॅनपदे अपडेट होत नाहीत...* 


➡️ *बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त यांच्या याद्या प्रसिद्ध होत नाही..* 


➡️ *रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध होत नाहीत..* 


➡️ *वरील सर्व कामे सर्व जिल्ह्यांची जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पोर्टलवर संवर्ग एक व संवर्ग दोन यांना बदली होकार किंवा नकार देण्यासाठी बदली पोर्टल सुरू होणार नाही.*


➡️ *जर आज संध्याकाळपर्यंत युद्ध पातळीवर ही सर्व कामे पूर्ण झाली तर उद्या बदली पोर्टलवर आपल्याला होकार किंवा नकार देता येईल.. जर सर्व कामे सर्व जिल्ह्यांची पूर्ण झाली नाहीत तर अजून वाट पहावी लागेल.*

➡️  संभाव्य रिक्त जागा ,बदली पात्र शिक्षकांची यादी,अवघड क्षेत्र यादी  लॉगिनला आल्यानंतरच शिक्षकांना होकार किंवा नकार देणे शक्य होणार आहे. 

➡️ जिल्हा कार्यालयाकडून शिक्षकांना बदली अर्ज करण्यासंदर्भात सूचना येणे अपेक्षित आहे. 

3 नोव्हेंबर 2022 - जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर पर्यंतची रिक्त पदे नोंद करणेबाबत परिपत्रक - Click Here

21 ऑक्टोबर 2022 - जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया नवीन वेळापत्रक. 31 ऑक्टोबर पासून बदली प्रक्रिया सुरु होणार. 5 जानेवारी ला आदेश प्राप्त होणार. शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close