जिल्हाअंतर्गत बदली 2022 - मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यमुक्तीचे आदेश | दिनांक 16 मे रोजी बदली झालेल्या सर्व शिक्षकांनी कार्यमुक्त होऊन 17 मे रोजी नवीन शाळेवर रुजू होणे संदर्भात आदेश वितरित.
कार्यमुक्ती रिपोर्ट व रुजू / हजर रिपोर्ट PDF - Click Here
चार्ज देवाण-घेवाण यादी PDF - Click Here
दि.04/05/2023 च्या मार्गदर्शन सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित आदेश पाठविला आहे.
जिल्हांतर्गत बदली कार्यमुक्ती बाबत दि. 04/05/2023 चे शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी सदर आदेश आपले गटाकडील जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावा व याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास त्वरित सादर करावा.तसेच दिलेल्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळल्या जातील याबाबत आपले स्तरावरून पुढील कार्यवाही करावी.
जिल्हांतर्गत बदली 2022 कार्यमुक्ती बाबत महत्वाच्या सूचना
१. या कार्यालयाकडून पाठविलेल्या बदली आदेशातील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
२. सर्व शिक्षकांचे एकत्रित आदेश निर्गमित केलेले आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषद आकडेवारी यामध्ये
Cadre 1 = 241
Cadre 2 = 105 पैकी104
Entitled = 299
Eligible = 867
Eligible 2 = 6
Difficult Aria = 159
एकूण 1677 बदली झालेल्या शिक्षकांपैकी पैकी 1676 शिक्षकांचा एकत्रित आदेश पाठविण्यात आला आहे. प्रत्येक शिक्षकांचा स्वतंत्र आदेश या कार्यालयाकडून दिले जाणार नाहीत. संकलित आदेशातील पहिले पान, शेवटचे पान व आपले नाव ज्या पेज वर आहे त्या पानाची प्रिंट काढावी.
३. बदली झालेल्या सर्व शिक्षकांनी आपल्या लॉग इन वर उपलब्ध करून दिलेला डिजिटल स्वाक्षरी असलेला संगणकीय आदेश या आदेशासोबत जोडणे बंधनकारक असेल. या कार्यालयाकडील आदेश व संगणकीय आदेश कार्यमुक्त व रुजू होताना सादर करावा.
४. आदेश डाउनलोड करण्यासाठी सर्व शिक्षकांना या कार्यालयाकडून कळविणेत आलेले होते तसेच आदेश डाउनलोड करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला होता.
५. बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करताना येणे-देणे नसलेबाबतचा दाखला देण्यात संबधित गटशिक्षणाधिकारी यांनी सूचना द्यावी.
६. दिलेल्या सूचनेनुसार कार्यमुक्त व रुजू प्रक्रिया पार पडल्यानंतर दि.20/05/2023 रोजी सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या तालुक्याचा कार्यमुक्त व रुजू झालेल्या शिक्षकांचा संकलित अहवाल या कार्यालयास सादर करावा.
७. दिलेल्या सूचनेनुसार कार्यमुक्त व रुजू प्रक्रिया पार पडताच सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या तालुक्याचा रिक्त पदांचा अहवाल यापूर्वी दिलेल्या नमुन्यात 20 मे पर्यंत सादर करावा. सदर अहवाल मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावयाचा असल्याने दि.20/05/2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अहवाल सादर करावा.
बदली नियंत्रण कक्ष
जिल्हा परिषद रत्नागिरी.
0 Comments