सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे. सदर पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर ॲप वर नोंदविण्यात येणार आहेत. त्यासाठी पायाभूत चाचणी गुण नोंद ॲप डाऊनलोड करुन घ्यावे लागेल.
STARS प्रकाल्पामधील SIG 2 limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र हा चाटबाट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० से ०१:३० या कालावधीत युट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल.
संबंधित शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण PAT पायाभूत चाचणी २०२३-२४ यु-ट्युबद्वारे घेण्याबाबत कळविण्यात यावे, प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी, सदर जिल्हा समन्वयक यांना जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे, अशा इयत्ता तिसरी ते आठवी शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी.
चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा. तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.
शालेय शिक्षण समूह लिंक - https://chat.whatsapp.com/IqbVaQYgepyJ4qCZbbuK6D
यु-ट्यूब लिंक
https://www.youtube.com/live/oC0gFdp000?si=18watwfwVZtNsirk
PAT (maharashtra) चाटबॉट ॲप डाउनलोड लिंक - Click Here
PAT महाराष्ट्र ॲप डाउनलोड लिंक - Click Here
PAT महाराष्ट्र Swiftchat App login - School Code and Teacher ID
PAT महाराष्ट्र Swift Chat Login - Click Here
http://bit.ly/pat-mh
पायाभूत चाचणी चे गुण भरण्यासाठी PAT महाराष्ट्र Swift Chat Bot लिंक.
PAT महाराष्ट्र SwiftChat Login - Click Here
पायाभूत चाचणी गुण भरण्यासाठी PAT महाराष्ट्र SwiftChat Bot Link - Click Here
PAT चाटबॉट मार्गदर्शिका - Click Here
https://bit.ly/PATManual
PAT MAHARASHTRA APP - Swift Chat Link - Click Here
Swift Chat Convegenius app download link - Click Here
Share with your friends.
0 Comments