Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

VSK weekly Swadhyay Link | attendance chatbot | विद्या समिक्षा केंद्र पुणेे निर्मित साप्ताहिक स्वाध्याय लिंक व ऑनलाईन हजेरी

VSK weekly Swadhyay Link | विद्या समिक्षा केंद्र पुणेे निर्मित साप्ताहिक स्वाध्याय लिंक | विद्या समिक्षा केंद्र  (VSK) पुणे निर्मित साप्ताहिक स्वाध्याय सोडविण्यासाठी व विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती बाबत मार्गदर्शक सूचना

शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.


VSK Swadhyay Link | VSK स्वाध्याय लिंक


सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत सदर Attendance Bot (चॅटबॉट) च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती SwiftChat Application & Attendance Bot & ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे. तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे. तसेच सदर उपस्थिती नियमितपणे जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून नियमितपणे आढावा घेण्यात यावा.


VSK weekly swadhyay विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती मार्गदर्शक सूचना


1. Google play store Swift Chat & Application download करावे.

VSK weekly Swadhyay Link - Click Here

VSK Swadhyay Link - Click Here

विद्या समिक्षा केंद्र पुणेे निर्मित साप्ताहिक स्वाध्याय लिंक - Click Here

Attendance Bot Link - Click Here

Student attendance chat Bot link - Click Here

VSK विद्यार्थी उपस्थिती लिंक : - Click Here

Swift Chat application - Click Here


२. प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार Swift Chat या Application मधील Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी.

३. उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा.

४. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

५. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय. डी. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

Step By Step Guide - Click Here

६. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.

७. काही शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय. डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी.

८. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यु-डायस या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

९. या Attendance Bot (चॅटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. 5:00 या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करावी. 

१०. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची यांची दैनंदिन उपस्थिती Attendance Bot (चॅटबॉट) वर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.

११. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी https://tinyurl.com/AttendanceBot या लिंकवर सादर कराव्यात.

VSK Swadhyay Link - Click Here

Swadhyay VSK Link - Click Here

विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत साप्ताहिक स्वाध्याय सुरु करणेबाबत. MPSP चे परिपत्रक 30 ऑक्टोबर 2023 - Click Here


विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत साप्ताहिक स्वाध्याय सुरु करणे व उपस्थिती नोंदविणेबाबत. MPSP चे परिपत्रक 03 नोव्हेंबर 2023 - Click Here

Post a Comment

0 Comments

close