Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण 2023-24 नवीन अपडेट | नाव नोंदणी सुरु | 31 मार्च रोजी 12 / 24 वर्ष पूर्ण होणारे शिक्षक अर्ज करु शकतात.

वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२3-२4 करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे व प्रशिक्षण फी बाबत शासन परिपत्रक जाहीर.

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२3-२4 या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. 

Join शालेय शिक्षण WhatsApp Group

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण रजिस्ट्रेशन बाबत सूचना

१) दि. ३१ मार्च २०२4 रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

२) दि. ३१ मार्च २०२4 रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील. 

३) प्रशिक्षण नोंदणी दिनांक 12 जून २०२3 पर्यंत सुरु राहील.

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कोणासाठी? 

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील 12 वर्षे / 24 वर्षे झालेल्या शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल.

Join शालेय शिक्षण WhatsApp Group

New Update - वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण साठी रजिस्ट्रेशन केलेल्या सर्वांना user ID व Password  प्राप्त होणार 👇


सूचना - 🔖 प्रशिक्षण ऑनलाईन होईल. 

🔖प्रशिक्षणाच्या पुढील सूचना इमेलवर दिल्या जातील. 


रजिस्ट्रेशन अंतिम मुदत - 12 जून 2023

1) शालार्थ क्रमांक असलेल्यांसाठी नोंदणी लिंक

वरिष्ठ वेतनश्रेणी 12 वर्षे - Click Here
निवडश्रेणी 24 वर्षे - Click Here


2) शालार्थ क्रमांक नसलेल्यांसाठी नोंदणी लिंक

वरिष्ठ वेतनश्रेणी 12 वर्षे - Wait
निवडश्रेणी 24 वर्षे - Wait

४) प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक, मोबाईल, ईमेल इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

5) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र ) शुल्क असेल. 


वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२2-23 बाबत सविस्तर सूचना

१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेत स्थळास भेट द्यावी.

२. दि. ३१ मार्च २०२4 रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

३. दि. ३१ मार्च २०२4 रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील. 

४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २9 मे, २०२3 ते 12 जून, २०२3 पर्यंत सुरु राहील.

५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे देण्यात येतील. 

६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत- 

गट क्र.१ प्राथमिक गट, गट

क्र. २- माध्यमिक गट, 

गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट, 

गट क्र. ४ अध्यापक विद्यालय गट. 

७. प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID. शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

८. नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

९. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्य आय. डी. वर पाठविण्यात येतील.

१०. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात याची. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल. 

११. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. 

१२.या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१३ प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बैंकिंग/ क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ. 

१४. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र ) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन अदा करावे, एकदा जमा केलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही कारणात्सव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी. यासंदर्भात परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये.

१५. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई मेल आयडीवर संपर्क करावा.

१६. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ/निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

१७. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. 

१८. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल. 

१९. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.

वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२3-२4 बाबतचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

Post a Comment

7 Comments

  1. यात शिक्षकांचे पैसे जमा झाल्याची पावती बघण्यासाठी लिंक नाहीये कृपया आपण ते यात ताकने गरजेचे आहे.

    ReplyDelete
  2. यात शिक्षकांचे पैसे जमा झाल्याची पावती बघण्यासाठी लिंक नाहीये कृपया आपण ते यात ताकने गरजेचे आहे.

    ReplyDelete
  3. The teachers who have received CHESS TRAINING must be exempted for other special trainings..

    ReplyDelete
  4. Me register kelay pan mala mail var samore chi mahiti nahi aali.... Dates Kay ahet training che

    ReplyDelete
  5. ज्या शिक्षकाने निवड श्रेणीच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी नांव नोंदणी केलेली आहे त्याला त्याचे नाव यादीत सामाविष्ट आहे की नाही ; नंबर किती आहे ते कुठे पाहता येईल ते सांगावे ८९९९७०६७४४

    ReplyDelete
  6. निवड श्रेणी चे कालच्या प्रोसिजर नुसार रजिस्ट्रेशन झाले की नाही हे कसे समजेल

    ReplyDelete
  7. कालच्या प्रोसिजर नुसार रजिस्ट्रेशन झाले की नाही हे कसे समजेल

    ReplyDelete

close