राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षेबाबत अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी सुरक्षा समिती कशी स्थापन करायची? तिची रचना व कार्ये कोणती याबाबत माहिती जाणून घेऊया.
शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे :- शासन निर्णय
शाळेत तक्रार पेटी बसविणे :- शासन निर्णय
सखी सावित्री समिती स्थापन करणेबाबत शासन निर्णय - Click Here
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात. समाजाचा अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांचे विपरित परिणाम विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो. अशा अनुचित प्रकारांचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे.
ज्याप्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने POSH Act २०१३ या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्यास्तरावरुन एक आठवड्यात करावे. अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल.
विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करणेबाबत शासन निर्णय - Click Here
विद्यार्थी सुरक्षा समिती रचना
विद्यार्थी सुरक्षा समिती कार्ये
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेणे.
लैंगिक शिक्षणाबाबत जागृती करणे.
गुड टच, बॅड टच बाबत मार्गदर्शन करणे.
शालेय परिसरातील वातावरण निकोप ठेवणे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून त्यावर उपाय करणे.
बालकांच्या हक्काचे रक्षण करणे.
विद्यार्थ्याच्या भावनिक, शारीरिक व बौध्दिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे.
मुलींच्या स्व-संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती :-
विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे :-
0 Comments