शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे. सन २०२४-२५ संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत शासन परिपत्रक
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबत परिपत्रक 20 नोव्हेंबर 2025
शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे.
सन 2024-25 ची संच मान्यता शासन निर्णय दि.15.03.2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि.30.09.2024 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च 2025 व एप्रिल 2025 च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सदर सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हास्तरावर अनुदान प्रकार (अनुदानित/अंशतः अनुदानित) व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दि. 13.05.2025 पर्यंत पूर्ण करणेस्तव संचालनालयाचे दि. 28.04.2025 च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये निर्गमित अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र. 5456/2025 दाखल केली असून सदर याचिकेमध्ये मा. न्यायालयाने दि.23.04.2025 रोजी जैसे-थे आदेश पारित केलेले असल्याने सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाहीस स्थगिती होती,
मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र.5456/2025 मध्ये मा. न्यायालयाने दि. 14.11.2025 रोजीच्या आदेशान्वये शा.नि.दि. 15.03.2024 च्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्र.5456/2025 सह इतर सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत.
तद्नुषंगाने शासन निर्णय दि. 15.03.2024 मधील तरतूदीनुसार सन 2024-25 च्या संच मान्यतेन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही दि.05.12.2025 पर्यंत पूर्ण करावी.
जिल्हास्तरीय समायोजनाबाबत दिलेल्या कालमर्यादेत समायोजन प्रक्रियेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, याची नोंद घ्यावी.
तनंतर जिल्हास्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा/अतिरिक्त शिक्षक कर्मचारी (असल्यास) यांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दि.08.12.2025 पूर्वी सादर करावी.
विभागीय शिक्षण उपसंचालक, यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे विभागस्तरावर समायोजन प्रक्रिया दि.19.12.2025 पर्यंत पूर्ण करावी. व उर्वरित रिक्त पदांचा तपशिल/अतिरिक्त कर्मचारी यांदी (रिक्त पदांचा प्रवर्ग/विषय/अनुदानाचा/व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास दि.22.12.2025 पूर्वी सादर करावा. दिनांक 19.12.2025 रोजी विभागस्तरावर समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, याची नोंद घ्यावी,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रीया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करुन विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशिल/अतिरिक्त कर्मचारी यांदी (रिक्त पदांचा प्रवर्ग/विषय/अनुदानाचा/व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास सोबत जोडलेल्या नमुन्यामधील तपशिलासह दि.22.12.2025 पूर्वी सादर करावा. सदर बाब प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबत परिपत्रक 20 नोव्हेंबर 2025 परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत 18 नोव्हेंबर 2025
सन २०२४-२५ संचमान्यतेनुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत शासन परिपत्रक
संचालनालयाचे संदर्भ क्र.४ च्या पत्रान्वये सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार मंजूर व रिक्त, अतिरिक्त बाबत पदांची माहिती संचमान्यता प्रणालीच्या वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार वर्ग-३ च्या शिक्षकेत्तर संवर्गातील १३०१ ( अधीक्षक या संवर्गातील ०४ पदे वगळून) अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र रिक्त असणाऱ्या शाळांमधील पदावर समायोजन करण्याची कार्यवाही करावी तसेच समायोजन करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय पदभरतीबाबत निर्णय घेत नसल्याने समायोजनाची कार्यवाही तात्काळ करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास तात्काळ सादर करणेबाबत कळविण्यात आले होते.
सबब सन २०२४-२५ संचमान्यतेनुसार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे समायोजनाची माहिती सोबत जोडलेल्या प्र-पत्रात भरुन संचालनालयास दि.21.११.२०२५ पर्यंत तात्काळ सादर करावी.




0 Comments