मा. सचिव (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक १६/१०/२०२५ रोजी व्ही.सी.द्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरुन इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना "शिक्षक पात्रता परीक्षा TET" उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. सदर परिपत्रक अधिक्रमित करण्यात आले आहे.
परिपत्रक रद्द :- TET उत्तीर्ण असणे बंधनकारक असलेबाबतचे दि. 17-10-2025 चे परिपत्रक रद्द
इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबतचे इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे दि.17-10-2025 चे परिपत्रक अधिक्रमित करण्यात आले आहे. याबाबत शासन स्तरावरुन अंतिम निर्णय झाले नंतर कळविण्यात येणार आहे.
दि.17-10-2025 चे टीईटी बंधनकारक परिपत्रक अधिक्रमित करणेबाबत परिपत्रक डाउनलोड. Click Here
इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना "शिक्षक पात्रता परीक्षा TET" उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत
शिक्षकांना TET शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पहा. Click Here
मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपिल क्र. १३८५/२०२५ मध्ये दि. १/१/२०२५ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद आहेत-
१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधोल तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना "शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.
२. जे सेवेत असलेले शिक्षक RTE कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा उरलेली आहे, त्यांच्यासाठी दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत शिक्षक पात्रता परिक्षा (TET) उत्तीर्ण न केल्यास, त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्तीपश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र, निवृत्ती लाभमिळविण्यासाठी शिक्षकाने नियमांनुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
३. ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी शिल्लक आहे, असे शिक्षक शिक्षक पात्रता परिक्षा (TET) परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील, मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने (ज्याची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे) पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास, अशा शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील.
४. अल्पसंख्यांक शाळांना RTE कायदा लागू नाही. त्यामुळे अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही.
मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपिल क्र. १३८५/२०२५ मध्ये दि. १/९/२०२५ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयास अनुसरुन प्रकरणी कार्यवाही करावी.





0 Comments