माणुसकीला सलाम! 20 चिमुकल्यांचे प्राण वाचवताना अंगणवाडी सेविका कांचनबाई मेघवाल यांचे बलिदान!
एका अंगणवाडी सेविकेने स्वत:च्या जीवाची बाजी लावत गावातील 20 मुलांचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या धाडस आणि प्रेमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील कांचनबाई मेघवाल (40) असं या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे. अचानक मधमाशांचा थवा 20 मुलांवर अंगावर कोसळला होता. या महिलेने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता या मुलांचे प्राण वाचवले. मात्र, दुसऱ्या बाजूल मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात या अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला आहे. मात्र, अंगणवाडी सेवेकेच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
आपल्या पोटच्या नसलेल्या, पण आपल्याच लेकरांसारख्या चिमुकल्यांना वाचवण्यासाठी एका मातेने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली…ही बातमी डोळे पाणावणारी आणि माणुसकीवरचा विश्वास दृढ करणारी आहे.
मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यातील रानपूर गावात एका अंगणवाडी केंद्रावर अचानक मधमाशांचा भीषण हल्ला झाला. अंगणवाडीत असलेली लहान मुले घाबरून सैरावैरा पळू लागली. त्याच क्षणी अंगणवाडी सेविका कंचन बाई मेघवाल यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून 20 निष्पाप मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. मुलांचे प्राण वाचले पण कांचन बाई स्वतः मात्र मधमाशांच्या भीषण हल्ल्याला बळी पडल्या. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नेमकी कशी घडली घटना?
कांचनबाई यांच्या कुटुंबाला कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी
कांचन बाईंचं धाडस, माया आणि कर्तव्यनिष्ठा ही एका खऱ्या ‘सुपरवुमन’ची ओळख आहे.
त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, तर ते अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, एका आईच्या मायेने 20 लेकरांना नवे आयुष्य दिले आहे.
🙏 कांचनबाई मेघवाल यांच्या आत्म्यास शांती लाभो.
त्यांच्या अदम्य साहसाला आणि माणुसकीला आमचा मानाचा सलाम!




.jpeg)

0 Comments