दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत शिक्षण संचालक यांचे परिपत्रक
TET बंधनकारक यावर तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे उपाय वाचा
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग, सर्व.
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. सर्व.
३) शिक्षण निरिक्षक, बृहमुंबई (उ.द.प.)
विषय: दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत.
संदर्भ :-
१) विविध वर्तमान पत्रामध्ये छापून आलेली बातमी
२) महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती यांचे दि. निरंक चे निवेदन
३) मा. श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत, सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद यांचे दि.०१/१२/२०२५ चे पत्र
४) महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांचे दि.०१/१२/२०२५ चे निवेदन
वरील विषयाचाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित/ अंशतः अनुदानित/ विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यासाठी दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे उक्त संदर्भीय निवेदन/वृत्तपत्रातील बातमीद्वारे निर्देशनास आलेले आहे.
तरी विद्यार्थी हीत लक्षात घेता दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही यांची आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी, तसेच ज्या शाळा दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही आपल्यास्तरावरून करण्यात यावी व सदर चाब सर्व शाळांच्या निर्देशनास आणून द्यावी.
Digitally signed by
Mahesh Madhukar Palkar 13:48:24 (डॉ. महेश पालकर)
Date: 03-12-2025
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तय सविनय सादर.
सदर परिपत्रकांचा कोणताही परिणाम शिक्षकांवर पडणार नसून 100% शाळा बंद राहणार असलेबाबत शिक्षक संघटनांकडून निश्चय करण्यात आला आहे.
5 डिसेंबर शाळा बंद आंदोलन का❓कशासाठी❓
सर्व शिक्षकांना TET शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करणे, संचमान्यतेच्या आडून जिल्हा परिषद शाळा बंद पाडणे अशा अन्यायकारक निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड दरी निर्माण होणार आहे. त्यामुळे गरीबांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. अशी मुले शिक्षण प्रवाहा पासून दूर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
TET बंधनकारक व संचमान्यता नवीन निकष शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी सर्व शिक्षकांनी एकजूट दाखवून 5 डिसेंबर रोजीच्या शाळा बंद आंदोलनात 100% सहभागी व्हावे.
चला...
जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवू
गरीबांच्या शिक्षणाची दारे खुली ठेवू...
TET बंधनकारक यावर तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे उपाय वाचा



0 Comments