SQAAF - शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF) - राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सर्व टप्प्यांसाठी खाजगी आणि शासकीय शाळांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृती करण्यासाठी, आवश्यक गुणवत्ता मानके सुनिश्चित करून, SQAAF हे मार्गदर्शक साधन विकसित करण्यात आले आहे. SQAAF Web Portal - https://scert-data.web.app/
SQAAF शाळानिहाय लागू मानके PDF - Click Here
SQAAF 128 मानकांची माहिती PDF - Click Here
SQAAF Blank Form PDF | SQAAF कोरा फॉर्म PDF - Click Here
SQAAF राज्यस्तरीय मार्गदर्शक समिती - शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती - Click Here
SQAAF Full Form - School Quality Assessment and Assurance Framework
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये सुरू झाली असून, त्यात अनेक मूलभूत घटकांचा समावेश करण्यात आला आहे. एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक अशा सर्वांगीण गरजा पूर्ण करणाऱ्या, देशातील सर्व शाळा आदर्श शाळा असाव्यात. गुणवत्ता हा शिक्षणाचा गाभा असून, त्यासाठी दर्जेदार शिक्षण देणे, हे शाळेच्या सुधारणांच्या माध्यमातूनच होऊ शकते. प्रत्येक शाळेने मानकसंचाच्या आधारे सुधारणा करणे आवश्यक आहे. शाळेत अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, मूल्यांकन पद्धती, नेतृत्व व प्रशासन, शाळेत लागणारी संसाधने व त्यांची उपलब्धता, उपयोगिता, शाळेतील शिक्षणाचा दर्जा, शाळेतील शिक्षणप्रणाली व शाळेच्या संदर्भातील निरीक्षणे यांत सातत्य असणे आवश्यक आहे, तसेच मूल्यांकन केले जाणेही आवश्यक आहे.
यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत, महत्त्वाचा घटक म्हणजे सार्थक प्लॅन टास्क क्र. २१५, 'शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा' School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF) होय.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सर्व टप्प्यांसाठी खाजगी आणि शासकीय शाळांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृती करण्यासाठी, आवश्यक गुणवत्ता मानके सुनिश्चित करून, SQAAF हे मार्गदर्शक साधन विकसित करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० परिच्छेद क्र. ८.१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, शाळा आणि शिक्षकांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करता यावा आणि आपले काम सर्वोत्कृष्ट करता यावे, यासाठी त्यांना विश्वासपूर्ण पद्धतीने समृद्ध बनविणे, त्याचबरोबर पूर्ण पारदर्शकतेची अंमलबजावणी व शैक्षणिक निष्पत्ती आणि सर्व शालेय आर्थिक व्यवहारांचे सार्वजनिक प्रकटीकरण करून, व्यवस्थेची एकात्मता अबाधित राखणे हे नियमन व्यवस्थेसमोरील अपेक्षित उद्दिष्ट आहे.
शाळेतील सर्व महत्त्वाच्या घटकांचे स्थानिक, तसेच राज्य स्तरावर सक्षमीकरण करून, शाळांमधील शिक्षणव्यवस्था सुधारणे, शाळांना प्रोत्साहन देऊन, योग्य ते मार्गदर्शन करणे आणि सुधारण्याची संधी उपलब्ध करून देणे, शाळेची बलस्थाने आणि दुर्बलता ओळखून त्यांना विकासाची धोरणे आखण्यास सक्षम बनविणे, शिक्षणव्यवस्था ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना प्रतिसाद देण्यास वचनबद्ध असल्याची खात्री देणे, शाळांना विकासाची धोरणे आखण्यास सक्षम बनविणे, या सर्व प्रक्रियांमध्ये सामान्य घटकांचा समावेश करण्यात आला आहे, जे शाळा गुणवत्ता विकासासाठी साहाय्यभूत असेल. शाळांचे गुणवत्ता मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) मार्फत शाळांचे स्वयं मूल्यांकन व त्यानंतर बाह्य मूल्यांकन करण्यात येईल. यातूनच शाळांना सुधारण्यासाठी व गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
SQAAF स्वयं मूल्यमापन - नवीन खाते तयार करणे व सर्व 128 माणके माहिती भरणे Step by Step मार्गदर्शन - Click Here
SQAAF संरचना
शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) संरचना
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि शालेय गुणवत्ता मूल्यांकन :
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० परिच्छेद क्र. ८.१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, 'शैक्षणिक निष्पत्तींमध्ये सातत्याने सुधारणा करणे, हे शालेय शिक्षण नियामक व्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे, मात्र या व्यवस्थेमुळे शाळांवर अतिरिक्त बंधने लादली जाऊ नयेत, नावीन्यपूर्ण शोध लावण्यावर प्रतिबंध घातला जाऊ नये किंवा मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण केले जाऊ नये. या सर्व गोष्टींचा विचार करता शाळा आणि शिक्षकांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करता यावा आणि आपले काम सर्वोत्कृष्ट करता यावे, यासाठी त्यांना विश्वासपूर्ण पद्धतीने सशक्त बनवणे, याबरोबरच पूर्ण पारदर्शकतेची अंमलबजावणी करणे आणि सर्व आर्थिक व्यवहार प्रक्रिया आणि शैक्षणिक निष्पत्तींचे सार्वजनिक प्रकटीकरण करून, व्यवस्थेची एकात्मता अबाधित राखणे ही नियमनासमोरील उद्दिष्टे असावीत.
सार्वजनिक शिक्षणव्यवस्था ही सक्रिय प्रजासत्ताक पद्धतीचा पाया असून, ती ज्या प्रकारे राबविली जाते, त्यात आमूलाग्र बदल करणे आणि देशासाठी शालेय निष्पत्तींचा उच्चतम स्तर गाठणे ही उद्दिष्टे असावीत. परिणामकारक स्वयंनियमन व मान्यताप्रणाली, या बालवाडीसह सर्व स्तरांसाठी, तसेच खाजगी, सार्वजनिक आणि परोपकारी संस्थांसाठी असून, त्यांचे योग्य ते पालन व्हावे यासाठी आवश्यक गुणवत्ता मानके संस्थापित केली जातील. शालेय मूल्यांकन व्यवस्था हे उद्दिष्ट आणि विकासात्मक विचार, यांबरोबरच जबाबदारीची जाणीव, या बाबी भविष्यातील शालेय विकासाच्या योजनेत मार्गदर्शक ठरतील.
0 Comments