MAHA TET Exam 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 चेे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने जाहीर केलेले आहे. www.mahatet.in वरील वेळापत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी घेण्याचे निश्चित केले होते. परंतु टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. TET Exam WhatsApp Group / Telegram Group / Facebook Group | शिक्षक पात्रता परीक्षा संपूर्ण माहिती
शिक्षक पात्रता परीक्षा TET Exam WhatsApp Group / Telegram Group
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) च्या तयारीसाठी WhatsApp Group तयार करण्यात आला आहे. सदर समूहांवर TET शिक्षक पात्रता परीक्षा विषयी माहिती देण्यात येईल. यामध्ये परीक्षेविषयक अपडेट, अभ्यासक्रम, video, सराव टेस्ट इ. माहिती दिली जाईल.
TET Exam WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/JvxYeCDDyPwFPtg0pXNIop
https://chat.whatsapp.com/H1FTvRQT7K6ED7jR7jyVFf?mode=ems_copy_t
TET Exam Telegram Group
सदर TET ग्रुप लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
TET Exam 2026 शिक्षक पात्रता परीक्षा 2026चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन
TET परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान दोनदा घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन कार्यपद्धची अवलंब करुन घ्यावयाच्या असल्याने शासन निर्देशानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२६ चे आयोजन IBPS संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकर (सप्टेंबर २०२६) सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे घेणेकरीता परीक्षा परिषदेचे IBPS कंपनीला पत्र
शिक्षक पात्रता परीक्षा 2026चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करणेबाबत परिपत्रक - Click Here
टीईटी परीक्षेसंदर्भात शिक्षणमंत्री यांचे विधानसभेत निवेदन
फेर टीईटी परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षा पूर्णता मोफत असेल.
फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडणार
पुढील वर्षीपासून परीक्षा ऑनलाइन होणार
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
टीईटी परीक्षा 2026 च्या तारखेबाबत
पेपरफुटी झाल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सदर परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख यथावकाश परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर घोषित करण्यात येईल. तरी इतर अफवांवर विश्वास ठेवू नये.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
टीईटी परीक्षा 06 जुलै 2026 रोजी घेण्यात येणार आहे. ही व्हायरल पोस्ट खोटी असून त्यावर विश्वास ठेवू नये.
टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली.
आज दि.२७ जून, २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता दि.२८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
टिईटी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांसंदर्भात माहिती सादर करणेबाबत.
मा. मुख्य सचिव महोदय आगामी साप्ताहिक बैठकीत टीईटी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांसंदर्भात आढावा घेणार आहेत. तरी खालील मुद्द्यांची माहिती शासनास सादर करण्यात येणार आहे.
१) टीईटी (TET) उत्तीर्ण शिक्षकांची एकूण संख्या
२) टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची टक्केवारी
३) तसेच शिक्षकांनी टीईटी परीक्षेस बसावे व ती उत्तीर्ण व्हावी, यासाठी आपल्या स्तरावर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती
शिक्षक पात्रता परीक्षा कोर्ट अपडेट
TET पुनर्विचार याचिकेचा निकाल शिक्षकांच्या विरोधात,
TET अनिवार्यता कायम..
सुप्रीम कोर्टाकडून केवळ 1 वर्ष अधिकची मुदतवाढ..










0 Comments