महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत महाराष्ट्र राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले होते. सदर बालचित्रकला स्पर्धेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. बालचित्रकला स्पर्धा निकाल व प्रमाणपत्र डाउनलोड लिंक
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत शनिवार, दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले होते. बालचित्रकला स्पर्धा एकाच दिवशी चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
बालचित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रकामांमधून तालुकास्तरावर निवड झालेल्या चित्रांची जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक)/शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्या कार्यालयामार्फत छाननी करण्यात आली आहे. शासन निर्णयात नमूद केलेल्या निकषांनुसार समितीने निवडलेल्या जिल्हास्तरीय बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा निकाल दिनांक १९ ऑक्टोबर, २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मंडळाच्या msbae.ac.in या संकेतस्थळावर बालचित्रकला स्पर्धा टॅबमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. बक्षिसपात्र विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय यादी सोबत जोडण्यात येत आहे.
बाल चित्रकला स्पर्धा निकाल डाउनलोड लिंक - Click Here
https://balchitrakala2026.msbae.in
सदर विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे तसेच रोख बक्षिसाची रक्कम संबंधित शिक्षण निरीक्षक/शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत स्वतंत्रपणे पाठविण्यात येईल.
तसेच राज्यस्तरीय बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची यादी अंतिम निवड प्रक्रियेनंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
तसेच सर्व गटांमधील स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र दि. २१/१०/२०२६ पासून शाळेच्या लॉगीनमधून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.




0 Comments