STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
पायाभूत चाचणी दिनांक १७.०८,२०२३ ते १९.०८.२०२३ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. तर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - १ व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - २ यांचे खालील प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे.
संकलित मूल्यमापन चाचणी संभाव्य कालावधी
संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - १ : माहे ऑक्टोबर २०२३ शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबर पहिला आठवडा २०२३
संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - 2 : २ एप्रिल २०२४ पहिला / दुसरा आठवडा.
संकलित मूल्यमापन चाचणीचा अभ्यासक्रम:
१. संकलित मूल्यमापन सत्र १ प्रथम सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.
२. संकलित मूल्यमापन सत्र २ द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.
तरी उपरोक्त प्रमाणे सन २०२३- २४ या शैक्षणिक कालावधीत इयत्ता ३ री ते ८ वी च्या इयत्तांसाठी तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - १ व २ या संकलित मूल्यमापन चाचणीच्या अनुषंगाने आहेत. यामुळे शाळांनी इयत्ता ३ री ते ८ वी (प्रथम भाषा, गणित व इंग्रजी) या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ पुन्हा नव्याने घेवू नयेत. उपरोक्त चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत. या चाचण्यांची गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित १ व २ चे मूल्यमापन करावे.
संकलित मूल्यमापन सत्र 1 नमूना प्रश्नपत्रिका PDF - Click Here
संकलित मूल्यमापन सत्र 2 नमूना प्रश्नपत्रिका PDF - Click Here
संकलित मूल्यमापन सत्र १ व सत्र 2 बाबत शासन परिपत्रक दि. 31 ऑगस्ट 2023 डाउनलोड करा. Click Here
0 Comments