Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आनंददायी शनिवार उपक्रम कृतीपुस्तिका PDF (इ. 1ली ते 8वी) | आनंददायी शनिवार उपक्रम शासन परिपत्रक | आनंददायी शनिवार उपक्रम विस्तार | आनंददायी शनिवार उपक्रम यादी

राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या आनंददायी शनिवार उपक्रम घ्यावयाच्या उपक्रमाची कृतीपुस्तिका  PDF (इ. 1ली ते 8वी) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रसिद्ध केली आहे. आनंददायी शनिवार उपक्रम यादी पहा. 



आनंददायी शनिवार' या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत शासन निर्णय - 09 डिसेंबर 2025

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा 'आनंददायी शनिवार' म्हणून साजरा करण्यात येत आहे. सदर उपक्रमाचा विस्तार करण्यात येऊन, या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता, विद्यार्थ्यांच्या इच्छुकतेनुसार करावयाच्या अतिरिक्त कृती कार्यक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे. 

राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय मूल्य आधारित उपक्रमांची ओळख करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, सामाजिकता, व्यावहारिक कौशल्ये आणि नेतृत्व गुण विकसित करणे या उद्देशाने 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाअंतर्गत खालील अतिरिक्त नावीन्यपूर्ण कृतींचा शालेय स्तरावर समावेश करण्यात यावा.

1) पालक मेळावा
2) स्नेहसंमेलन
3) देशभक्तीपर गाण्यांवर कवायत, योगा, व्यायाम, सैनिकी प्रशिक्षण, एन.सी.सी / स्काऊट गाईड धर्तीवर परेड 
4) माजी विद्याथ्यांचे मार्गदर्शन
5) शैक्षणिक सहली (स्थळभेट)
6) क्षेत्रभेट (राष्ट्रीय शिक्षण धोरण आधारित अनुभवजन्य शिक्षण) 
7) वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन
8) लघु उद्यम महोत्सव (व्यवसाय शिक्षण उपक्रम)

वरील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सामाजिक जाणीव, शारीरिक-मानसिक विकास, आर्थिक साक्षरता आणि व्यावहारिक जीवन कौशल्ये विकसित होतील.

प्रत्येक शाळेने या सर्व उपक्रमांची वार्षिक अंमलबजावणी रूपरेषा तयार करून कार्यवाही अहवाल जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचेकडे सादर करावा.

तसेच आयुक्त (शिक्षण) यांनी विभागाच्या संकेतस्थळावर एक लिंक उपलब्ध करून द्यावी आणि शाळांनी या उपक्रमांची माहिती या लिंकवर भरावी.

'आनंददायी शनिवार' या उपक्रमांतर्गत, उपरोक्त नमूद कृती कार्यक्रम/घटक उपक्रम आयोजित करणे हे राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील; परंतु, आयोजित करण्यात येणाऱ्या कृती कार्यक्रम/घटक उपक्रमात सहभागी होणे विद्यार्थ्यांकरिता ऐच्छिक राहील.


सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५१२०९१८२३१७६१२१ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

आनंददायी शनिवार' या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत शासन निर्णय - 09 डिसेंबर 2025 डाउनलोड करा. Click Here



आनंददायी शनिवार उपक्रम शासन निर्णय :- 14 मार्च 2024

आनंददायी शनिवार उपक्रम पुस्तिका PDF


आनंददायी शनिवार उपक्रम राबविणे मागची कारणे

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. 


आनंददायी शनिवार उपक्रमाचे फायदे

"आनंददायी शनिवार" हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल, तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


शालेय परिपाठात आनंददायी अभ्यासक्रम Happiness Curriculum राबविणेबाबत - Click Here


आनंददायी शनिवार उपक्रमाचा उद्देश

१. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे. 

२. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे. 

३. शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे. 

४. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.

५. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे. 

६. विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे 


आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये घ्यावयाचे उपक्रम / कृती

आनंददायी शनिवार उपक्रम यादी 


आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत घ्यावयाच्या कृती

१. प्राणायाम / योग/ध्यान धारणा / श्वसनाची तंत्र

२ आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण

३. दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन

४. स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना

५. रस्ते सुरक्षा

६. समस्या निराकरणाची तंत्रे 

७. कृती, खेळ यावर आधारित उपक्रम

८. Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम - Click Here

९. नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य

वरील कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपुर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना राहील.


आनंददायी शनिवार कृतीपुस्तिका PDF

आनंददायी शनिवार कृतीपुस्तिका pdf (इ.1ली ते 8वी) डाउनलोड करा. - Click Here



आनंनदायी शनिवार उपक्रम शासन परिपत्रक:-

विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

आनंनदायी शनिवार उपक्रम शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपध्दतीनदवारे आंनददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने आयुक्त (शिक्षण), पुणे व संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रुपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाचत कार्यवाही करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०३१४२०५००३९६२१ असा आहे. 

सन 2024 सालातील शासन निर्णय - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन- Click Here

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके - Click Here

Post a Comment

0 Comments

close