Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बाल चित्रकला स्पर्धा 2026 संपूर्ण माहिती | नोंदणी लिंक - https://msbae.ac.in/ | https://balchitrakala2026.msbae.in/

बाल चित्रकला स्पर्धा 2026 संपूर्ण माहिती | नोंदणी लिंक - https://msbae.ac.in/ | https://balchitrakala2026.msbae.in/



महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने ८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर बालचित्रकला स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात येणार आहे. इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

शाळा व विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत करावी.


राज्य कला शिक्षण मंडळामार्फत गतवर्षीप्रमाणेच बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये इयत्ता १ ली ते १० वी मधील इयत्तानिहाय ४ गटामध्ये एकाच दिवशी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करावयाची आहे. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा या https://balchitrakala2026.msbae.in लिंकवर शाळेची ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. गटनिहाय तपशील व प्रवेश शुल्क खालील प्रमाणे,


बालचित्रकला स्पर्धेचे प्रवेश शुल्क तसेच जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बक्षीसांच्या रकमेत सन २०२५ पासून वाढ करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा ही चार गटामध्ये घेतली जाणार असून इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतचे गटनिहाय विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रति विद्यार्थी रु २०/- अक्षरी रुपये वीस फक्त एवढे स्पर्धा शुल्क आहे. प्रति विद्यार्थी रु २०/- रक्कमेमधून ड्रॉईंग कागदाचा ११ X १५ इंच या आकाराचा खर्च रु.५/- वजा करून उर्वरित रक्कम रु.१५/- प्रति विद्यार्थी मंडळाकडे दिनांक ३१.०७.२०२६ पर्यंत ऑनलाईन जमा करावयाची आहे.


मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका यांच्या हद्दीतील सर्व शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना कळविण्यात येते की, बालचित्रकला स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी गटनिहाय व सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक ऑनलाईन नोंदणी शाळेमार्फत करावी. बालचित्रकला स्पर्धेकरिता शाळेची नोंदणी व विद्यार्थ्यांची नोंदणी https://www.msbae.ac.in था संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा https://balchitrakala2026.msbae.in या लिंकवर भराययचा आहे. सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थी नोंद होण्याकरिता सर्व संबंधित विद्यार्थी तसेच पालक व शाळा यांना उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय निदर्शनास आणावा.


बाल चित्रकला स्पर्धा संक्षिप्त माहिती 

बाल चित्रकला स्पर्धा 2026 गट

इ.1ली व 2री

इ.3री ते 4थी

इ.5वी ते 7वी

इ.8वी ते 10वी


बाल चित्रकला स्पर्धा दिनांक - 08 ऑगस्ट 2026


बाल चित्रकला स्पर्धा नोंदणी लिंक - Click Here 

https://balchitrakala2026.msbae.in


बाल चित्रकला स्पर्धा परीक्षा फी - 20 रुपये प्रति विद्यार्थी 

बाल चित्रकला स्पर्धा आयोजन वेळापत्रक 



बाल चित्रकला स्पर्धा 2026 विषय


बाल चित्रकला स्पर्धा बक्षीस योजना


बाल चित्रकला स्पर्धा गट विभागणी 



बाल चित्रकला स्पर्धा 2026 नोंदणी करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here 


बाल चित्रकला स्पर्धा 2026 संपूर्ण मार्गदर्शिका PDF - Click Here


maharashtra state board of art education

balchitrakala spardha 2026 registration

balchitrakala 2026 msbae

balchitrakala 2026 msbae in

Post a Comment

0 Comments

close