MAHA TET Exam 2024 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 चेे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने जाहीर केलेले आहे. www.mahatet.in वरील वेळापत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHA TET 2024) घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयावर सोपविलेली आहे.
इ.१ ली ते इ.५ वी व इ. ६ वी ते इ.८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/ विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी.
online test series for TET MARATHI join now for free
MAHA TET Exam unit wise Videos for all subjects and guess Question Video.
सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असून दि. ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.
MAHA TET 2024 Time Table महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 वेळापत्रक
महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी
०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४ वेळ २३.५९ वाजेपर्यंत
Maha TET Exam अर्ज करण्यासाठी लिंक - https://mahatet.in
महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे.
28/10/2024 ते 10/11/2024
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक व वेळ
१०/११/२०२४ वेळ स. १०.३० ते दु.१३.००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-II दिनांक व वेळ
१०/११/२०२४ वेळ दु.१४.०० ते सायं. १६.३०
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना
खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.
१. ऑनलाईन नोंदणी
२ पोर्टल लॉगिन
3. आवेदनपत्र भरणे.
4. अर्जातील माहितीची पडताळणी करणे
5. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे
६. आवेदन पत्राची प्रिंट घेणे
१ महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी ऑनलाईन नोंदणी
MAHA TET application Form 2024 - www.mahatet.in
Maha TET Exam 2024 Notification Click Here
MAHA TET Exam 2024 Application form last date - 30 September 2024
२. महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी पोर्टल लॉगिन
३ महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी आवेदनपत्र भरणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रक 2024
प्रवेशपत्र / admit card
3.1 अर्जदारा विषयी माहिती
- एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे अर्जदाराचे आडनाव, प्रथमनाव, वडिलांचे / पतीचे नाव व आईचे नाव भरा. जर नावात कोणता बदल असेल तर बदललेल्या नावाची माहिती द्या
- अर्जदार पुरुष स्त्री अथवा ट्रान्सजेन्डर आहे हे ते अचूकपणे निवडा.
- एस. एस. सी. प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक, एस. एस. सी. प्रमाणपत्र क्रमांक उत्तीर्ण चे वर्ष महिना बैठक क्रमांक अचूकपणे भरा.
- आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक यापैकी एक पर्याय निवडून उघडलेल्या चौकटीत संबंधित क्रमांक अचूक नमूद करा.
- राष्ट्रीयत्व भरा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास 'होय' नसल्यास नाही वर लिक करा .
3.2 अर्जदाराच्या संपर्कविषयी माहिती
- यामध्ये सर्वे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, क्षेत्र नमूद करावे.
- शहराचे/गावाचे ठिकाण टाईप करा.
- तालुक्याचे नाव Dropdown मधून अचूकपणे निवडावे.
- अर्जदार महाराष्ट्राबाहेरील असल्यास Dropdown लिस्ट मधील पर्यायांपैकी इतर राज्य निवडा तालुका, जिल्हा आणि पिनकोड नमूद करा.
3.3 अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग आणि इतर माहिती
- जातीचा प्रवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
- दिव्यांग असल्यास होय अथवा नसल्यास नाही निवडा. असल्यास दिव्यांग बाबत सर्व माहिती भरा.
3.4 अर्जाचा स्तर (पेपर पेपर 1 / पेपर 2)
- ज्या वर्गासाठी / स्तरासाठी शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे , ते Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
- पेपर 1 किंवा पेपर 2 साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास Both हा पर्याय निवडावा.
- दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
3.5 परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती
- अर्जदाराने परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा मानून ग्राह्य धरले जाईल.
- द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल.
- तसेच प्रथम भाषा (उर्दू/ बंगाली / गुजराती/ तेलगू /कन्नड) निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.
- उर्दू माध्यम निवडले असल्यास दोन्ही पेपर करिता पत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections/उर्दू आणि इंग्रजी दोन्ही भाषेत द्विभाषिक प्रश्न असतील.
- अर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे तो जिल्हा Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
3.6 शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता या मुद्द्यामध्ये पेपर 1 (कनि प्राथमिक स्तर) या साठी एसएससी पात्रतेविषयी माहिती भरावी . तसेच एच. एस. सी, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता असल्यास त्यांची कोर्स बोर्ड विद्यापीठ उत्तीर्ण वर्ष एकूण गुण प्राप्त गुण टक्के वारी / श्रेणी याबाबत अचूकपणे माहिती नोंदवावी.
- पेपर 2 (वरिष्ठ प्राथमिक स्तर) या साठी एस.एस.सी आणि पदवीची पात्रतेविषयी माहिती भरावी तसेच एच. एस. सी. पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता त्याची माहिती कोर्स बोर्ड विद्यापीठ उत्तीर्ण वर्ष प्राप्तगुण एकूण गुण टक्के अचूकपणे नोंदवावी.
3.7) व्यावसायिक पात्रता
- व्यावसायिक पात्रता यामध्ये पेपर 1 (प्राथमिक स्तर) या साठी शिक्षणशास्त्र पदविका (डीएड किंवा समकक्ष)बाबतची माहिती पदविकेचे नाव विद्यापीठ/परीक्षा मंडळ उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण एकूण गुण टक्केवारी शततमक श्रेणी अचूकपणे नोंदवा.
- पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) साठी शिक्षणशास्त्र पदविका (डी एड किंवा समकक्ष) अथवा शिक्षणशास्त्र पदवी (बी एड किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदविकेचे नाव विद्यापीठ परीक्षा मंडळ उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण एकूणगुण टक्केवारी शततमक श्रेणी अचूकपणे नोंदवा.
- अर्जदार शिक्षणशास्त्र पदवी किंवा शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्ही ची माहिती अचूकपणे नोंदवा.
3.8) छायाचित्र ओळख
- आयडेन्टटी प्रुफ ओळखीचा पुरावा म्हणून पहिल्या चौकटीतीत Dropdown लिस्ट मधून आपल्याकडे पुरावा असलेल्या कोणत्याही एका पर्यायाची निवड करा. दुसऱ्या चौकटीत त्याचा क्रमांक नमूद करा .
- फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती
- अ) ०३.५ से.मी. X४.५ से.मी. १०० KB चा रंगीत फोटो स्कॅन करावा स्कॅन इमेज फोटो बॉर्डर पर्यंत क्रॉप करण्यात यावा. सदर इमेज 4KB ते १०० KB या आकारामध्ये बसेल याची खात्री करून (png.jpg jpeg format only)
- ब) ३.५ से.मी. X४.५ से.मी. चा चौकोन पांढन्या कागदावर आखावा त्यामध्ये काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी सदरची स्वाक्षरी असलेले पृष्ठ ५० KB मध्ये स्कैन करावे व क्रॉप करावा, स्वाक्षरीची इमेज २KB ते ५० KB या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी. (png jpg, jpeg format only)
- प्रतिज्ञापत्र वाचून ते मान्य असल्यास चौकटीत क्लिक करा आणि ऐप्लिकेशन फॉर्म Save / Preview करा.
४. अर्जातीत माहितीची पडताळणी करणे
- स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.
- माहितीत बदल करावयाचा असल्यास स्किनच्या शेवटी असलेल्या 'Edit बटनावर क्लिक करून आवश्यक ते बदल करा आणि Save & Preview या बटनावर वर क्लिक करून स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करून "Payment या बटनावर क्लिक करा.
- अर्जदाराने ऑनलाइन परीक्षा शुल्क यशस्वीरीत्या भरल्यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. तसेच त्यानंतर माहिती बदलाबाबत कोणतेही निवेदन / अर्ज यांचा विचार केला जाणार नाही.
5. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे
- सर्व माहिती अचूक भरून झाल्यावर प्रतिज्ञापत्र वाचून ते मान्य असल्यास चौकटीत क्लिक करा आणि ऐप्लिकेशन फॉर्म 'Save & Preview करा.
- "Payment" या button वर क्लिक करा स्क्रीनवर आलेली परीक्षा शुल्क संदर्भातील माहिती अचूक असल्याची खात्री करा.
- Confirm and Pay या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग असे पर्याय उपलब्ध होतील. आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे.
- चलनाद्वारे ऑफलाइन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही.
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरतेवेळी इंटरनेट कनेक्शन नसणे, वीज पुरवठा खंडित होणे यामुळे परीक्षा शुल्क जमा न झाल्यास पुन्हा Login करून परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे.
- परीक्षा शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर भरलेल्या अर्जाच्या तपशिलाची माहितीचा फॉर्म print / preview टॅब मध्ये उपलब्ध होईल आणि Transaction Details / Transaction Receipt Transaction History मध्ये स्क्रीनवर दिसेल Transaction History या टॅब वर क्लिक करून अर्जदारास सदर Transaction Receipt पाहता व प्रिंट घेता येईल.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 परीक्षा फी
६. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Print / Preview या टॅब चा वापर करावा.
- आवेदनपत्राची प्रिंट गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी यांचेकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.
पात्रता गुण
या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) पात्र समजण्यात येईल.
TET प्रश्नपत्रिका आराखडा
TET वारंवारता आणि वैधता
“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे (किमान एकदा) शासनामार्फत घेण्यात येईल.
उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून आजीवन राहील.
शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येईल.
शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण होणा-या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही.
“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) शासनातर्फे किंवा शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकरण / संस्थाद्वारे घेण्यात येईल. ह्या परीक्षेचा खर्च भागविण्यासाठी प्राधिकरण / संस्थाना योग्य ती फी आकारण्याची मुभा राहील.
“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) आयोजन करण्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावर सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी सर्व बाबींचा विचार करुन परीक्षा घेण्याचे व्यवस्थित नियोजन करावे यामध्ये उमेदवाराकडून अर्ज स्विकारण्यापासून मुलांना पात्रता प्रमाणपत्र देण्याच्या सर्व बाबींचा (उदा:- ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तयार करणे, केंद्रावर परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका OMR पध्दतीने तपासणी करणे, ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करणे, उत्तीर्ण उमेदवारांना विशिष्ट (युनिक) नोंदणी क्रमांक देणे इत्यादी ) अंतर्भाव असेल. परीक्षा परिषदेने शक्यतो सर्व बाबीकरिता संगणकीय पध्दतीचा वापर करावा.
0 Comments