Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जागतिक महिला दिन 2024 साजरा करणेबाबत शासन निर्णय

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यामध्ये महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा केला जातो आणि लिंग समानतेसाठी कृतीचे आवाहन केले जाते. या दिवसाचा उद्देश महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधणे आणि महिलांच्या मुक्तीसाठी कार्य करणे व शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करून त्यांना दर्जेदार जीवनाकडे नेणारे आहे. या निमित्ताने राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तर खालील विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.

जागतिक महिला दिन सामान्यज्ञान   प्रश्नमंजुषा  सोडवा - Click Here


जागतिक महिला दिन विशेष उपक्रम 

१) लिंग समानता/स्री हक्क यासारख्या स्री केंद्रीत विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करणे. उदाहरणार्थ, महिला सक्षमीकरणावरील कथा भाषेच्या वर्गात सांगितल्या जाऊ शकतात, सामाजिक अभ्यासामध्ये स्त्रियांच्या सामाजिक समस्या आणि स्त्रियांच्या समान हक्कांसाठी झटणाऱ्या प्रतिष्ठित लोकांवर चर्चा केली जाऊ शकते.

2) महिला सक्षमीकरणावर आधारित विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात यावे. ज्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या भूमीकांवर चर्चा केली जाऊ शकते. तसेच महिला सक्षमीकरणावरील सामूहिक गीत, नृत्य, नाटक, संगीत यासारख्या उपक्रमांचे आयोजन करून त्यात विद्यार्थीनींना भाग घेण्यास प्रोत्साहित करावे.


(३) कला, सामाजिक सेवा आणि इतर नवीन क्षेत्रातील स्थानिक स्त्रिया ओळखल्या जाऊ शकतात. ज्यांनी संघर्ष करून यश मिळवले आणि शाळेतील मुला-मुलींशी त्यांचा संवाद आयोजित केला जाऊ शकतो. सशस्त्र दल, पोलीस, विमान वैमानिक, लोकोमोटिव्ह पायलट, एरोस्पेस अभियंता, शास्त्रज्ञ इत्यादी महिला व व्यावसायिकांद्वारे चर्चा देखील आयोजित केली जाऊ शकते व मुलींना खेळात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जावे.


४) महिला शिक्षक सदस्य आणि कर्मचारी यांचा शाळा आणि समाजासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सत्कार केला जाऊ शकतो.


५) महिला विद्यार्थिनींना शाळेत येताना येणाऱ्या कोणत्याही समस्या/ समस्यांबाबत शालेय स्तरावर चर्चा करुन त्यांचे उपाय योजले जाऊ शकतात. लहानपणापासूनच समानता आणि परस्पर आदराची संकल्पना आणण्यासाठी मुलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते.


६) मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करून माध्यमिक/ वरिष्ठ माध्यमिक स्तरावरील मुलींची गळती कशी कमी करता येईल या विषयावर चर्चा आयोजित करावी.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यस्तरावर Online/offline आयोजित करावयाचे कार्यक्रम


8 मार्च 

जागर जाणिवांचा - Click Here

मा.मंत्री महोदय यांच्या हस्ते मुलीच्या सक्षमीकरणास पोषक उपक्रमांचे उद्घाटन ऑनलाईन 

सकाळी 11.00 ते 1.00


9 मार्च

महिला सक्षमीकरण व समाजाचा बदलता दृष्टीकोन  Click Here

(श्रीमती श्रुती तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान ऑनलाईन 

सकाळी ११ ते १२


10 मार्च

घे भरारी करिअरच्या नवीन संधीबाबत मार्गदर्शन Click Here

मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आर्थिक स्रोतांची माहिती देण्यासाठी करिअर मार्गदर्शन व शंका समाधान दिपाली दिवेकर प्रशासन अधिकारी, मुरुड- ऑनलाईन

सकाळी ११ ते १२


11 मार्च

महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती  Click Here

ॲड. दिव्या चव्हाण मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तरे ऑनलाईन

सकाळी ११ ते १२


12 मार्च

माझी सखी, माझी सहचारी  Click Here

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेले स्नेहग्राम संस्थेचे श्रीमती विनया निंबाळकर व श्री महेश निंबाळकर मुलाखत ऑनलाईन

सकाळी ११ ते १२

जागतिक महिला दिन 2023 साजरा करणेबाबतचे शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here

Join WhatsApp group



जिल्हास्तरावर Online / offline आयोजित करावयाचे कार्यक्रम

8 मार्च 

अनुभव कथन, वकृत्व स्पर्धा

आवडती महिला खेळाडू/माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी महिला / आवडती महिला राजकीय नेता यांच्या विषयी माहिती गोळा करून फोटो, व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम द्वीटर यावर #womensdaymh2023 यासह अपलोड करणे.


9 मार्च

समुपदेशन

किशोरवयीन मुला-मुलींसाठी विविध विषयांवर समुपदेशन सत्रांचे आयोजन (सायबर सुरक्षा मासिक पाळी व्यवस्थापन इ.)


10 मार्च

विद्यार्थ्याचे चर्चासत्र

आजच्या युगातील स्त्रीयांच्या व मुलींच्या समस्या व त्यावरील उपाययोजना.


11 मार्च

महिला सक्षमीकरणावर आधारित चित्रपट / चित्र फितीच्या सहाय्याने अभिव्यक्ती करणे

महिला सक्षमीकरणावर आधारित चित्रपट / चित्रफिती दाखवून खुली चर्चा आयोजित करणे / विद्यार्थ्यांना पोक्सो विषयी माहिती, चांगला स्पर्श वाईट स्पर्श या विषयी माहिती.


12 मार्च

व्याख्यान - जिल्ह्यातील प्रेरणादायी महिलेचे

स्त्री-पुरुष समानता ( कामांची समान विभागणी याविषयावर शालेय मुला-मुलींना मार्गदर्शन करणे.

Post a Comment

0 Comments

close