SHVR Registration | स्वच्छ आणि हरित शाळा / विद्यालय मूल्यांकन (SHVR) 2025-26 च्या मानांकनासाठी सर्व शाळांनी सहभागी होणे अनिवार्य आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP- २०२० च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९ जुलै २०२५ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या द्वारा स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ उपक्रमाची घोषणा करण्यात आली. राज्यामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या समन्वयाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
देशातील सर्व शाळांनी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ करिता सहभागी होणे अनिवार्य असून यामध्ये शासकीय, खाजगी अनुदानित, खाजगी, निवासी, आदिवासी, अल्पसंख्याक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या (केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेव्दारे मान्यता प्राप्त असलेल्या शाळांना पुढीलप्रमाणे दर्शविलेल्या सहा प्रमुख विषयांवर आधारित बाबींचे स्वयंमूल्यांकन करतील आणि त्याप्रमाणे सुधारणा करून शाळांचे सक्षमीकरण करावयाचे आहे.
१) पाणी
२) शौचालये
३) साबणाने हात धुणे
४) ऑपरेशन आणि देखभाल
५) वर्तन बदल आणि क्षमता बांधणी
६) मिशन लाईफ उपक्रम
या अनुषंगाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करावयाचे असून जिल्हास्तरावरून दोन जिल्हा नोडल अधिकारी (शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे) व एक प्रशिक्षण समन्वयक यांची नियुक्ती आपल्या मार्फत करण्यात आलेली आहे.
स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ अंतर्गत उपरोक्त उपक्रमांची क्षेत्रीय यंत्रणेव्दारे व शाळांव्दारे यशस्वी अंमलबजावणी करणेसाठी स्थानिक स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांनी SHVR आराखड्यानुसार प्रत्येक टप्यांवरचे नियोजन, संबधित भागधारक घटकांची भूमिका आणि जबाबदारी याबाबत उद्बोधन प्रशिक्षण कार्यशाळाव्दारे क्षमता बांधणी व उद्बोधन करावयाच्या उद्देशाने स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन, SHVR, २०२५-२६ च्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय यंत्रणेचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे.
राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दि. २५/०८/२०२५ पर्यत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण ऑनलाईन स्वरुपात आयोजित करून आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील १००% शाळांची नोंदणी दि. ३०/०९/२०२५ अखेर पूर्ण करावयाच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याने सर्व जिल्हा नोडल अधिकारी व प्रशिक्षण समन्वयक यांना उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे. तसेच कार्यवाहीचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास आणि सादर करावा.
SHVR Registration | स्वच्छ आणि हरित शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे?
Video पहा. - Click Here
0 Comments