Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पात्रता प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षावरुन आजीवन

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate) वैधता 7 वर्षावरुन आता अमर्याद कालावधीसाठी वाढविली आहे.

CTET EXAM 2022 Registration - Click Here

The validity period of Teachers Eligibility Test (TET) qualifying certificate extended from 7 years to lifetime with retrospective effect from 2011


यापूर्वी या प्रमाणपत्राची वैधता ७ वर्षांसाठी होती. या कालावधीत शिक्षकाची नोकरी लागली नाही, तर इच्छुकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय बदलत प्रमाणपत्राची वैधता अमर्याद कालावधीसाठी वाढवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल  यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.





प्रमाणपत्र वैधता बाबतचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच २०११ या वर्षांपासून हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी २०११पासूनचे उमेदवार ग्राह्य धरले जाणार आहेत. “शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना यामुळे रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल”, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं.


Post a Comment

0 Comments

close