Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नवोदय परीक्षा - सराव प्रश्नपत्रिका संच | navoday exam practice Question papers

 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा JNVST Exam -  ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. 

भारत सरकारने सन 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जवाहर नवोदय विद्यालये सुरू करण्यात आलेली आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत प्रवेश दिला जातो. त्यासाठी इयत्ता पाचवीत शिक्षम घेत असलेल्या मुलांची निवड चाचणी घेतली जाते.आठवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. आठवीनंतर गणित व विज्ञान इंग्रजीतून तर समाजशास्त्र हिंदी मधून शिकविले जाते.

जवाहर नवोदय विद्यालय संक्षिप्त माहिती

  • 5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते
  • प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते 
  • ग्रामीण भागातील विद्यार्थी 80% व शहरी भागातील 20% विद्यार्थ्यांची निवड केली जाते. 
  • SC / ST/OBC / OPEN आरक्षण आहे. 
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते. 

 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नमूना प्रश्नपत्रिका (6वी) 

Question Papers for JNVST class VI

JNVST 2021 Class VI - Click Here

नवोदय विद्यालय (6वी व 9वी प्रवेश) | अर्ज | प्रवेशपत्र |  प्रश्नपत्रिका | निकाल | निवड यादी - संपूर्ण माहिती - Click Here


जवाहर नवोदय विद्यालय केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे चालवली जातात. येथे भारतातील विशेष, गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक जिल्यातून विद्यार्थ्यांना एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेतील top 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील 80% व शहरी भागातील 20% मुलांची निवड केली जाते. त्यांना 6वी - 12वी मोफत शिक्षण मिळते. इयत्ता 9वी मधील प्रवेशासाठी ( रिक्त जागेवरील) प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती. 

JNVST या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील प्रश्नपत्रिका डाउनलोड करुन सराव करा. 


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF / Online Test

महिना तपशील प्रश्नमंजुषा लिंक प्रमाणपत्र लिंक
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (बोर्ड परीक्षा) प्रश्नपत्रिका PDF
सन 2023 Click Here सन 2022 Click Here
सन 2021 Click Here सन 2019 Click Here
सन 2017 Click Here सन 2016 Click Here
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ऑनलाईन टेस्ट / JNVST Online Test Series
अंकगणित - Unit Wise Online Test Click Here भाषा - Unit Wise Online Test Click Here
बुद्धिमत्ता - Unit Wise Online Test Click Here सराव PDF Click Here
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF
प्रश्नपत्रिका क्र. 1 Click Here प्रश्नपत्रिका क्र. 2 Click Here
प्रश्नपत्रिका क्र. 3 Click Here प्रश्नपत्रिका क्र. 4 Click Here
प्रश्नपत्रिका क्र. 5 Click Here प्रश्नपत्रिका क्र. 6 Click Here
प्रश्नपत्रिका क्र. 7 Click Here प्रश्नपत्रिका क्र. 8 Click Here
Join with us WhatsApp Telegram instagram
Join with us Facebook You Tube twitter


नवोदय परीक्षा सर्व प्रश्नपत्रिका PDF / unit wise Online Test - Click Here


▪️ *परीक्षा*

• परीक्षा प्रत्येक तालुकास्तराव होते. 

• एकूण गुण - 100 
• एकूण प्रश्न संख्या - 80 
• प्रत्येक प्रश्न - 1.25 गुणासाठी.
• परीक्षा वेळ - 2 तास.

▪️ *विषय व गुण*
• मानसिक क्षमता - 40 प्रश्न 
" 10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नात 4 उपप्रश्न असतात. " 
• अंकगणित  - 20 प्रश्न 
" एकूण 15 घटक आहेत . काठिण्यपातळीत थोडी वाढ करण्यात आली आहे. "
• मराठी / प्रथम भाषा. - 20 प्रश्न 
" एकूण 4 उतारे असतात. प्रत्येक उतारावरील 5 प्रश्न विचारली जातात. "

▪️ *अभ्यास कसा करावा* 
1) *मानसिक क्षमता चाचणी*
    संपूर्ण 40 प्रश्न आकृत्या वरील आधारीत असून जास्तीतजास्त सराव करणे गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 गुण मिळवता येतात. 

2) *अंकगणित* 
" 15 ते 16 घटक असून गणितात पैकी च्या पैकी गुण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे "
2019 व 2020 चे झालेले पेपर्स पहा. 
काठिण्य पातळी लक्षात घेऊन तशा प्रश्न चा सराव करून घ्यावे .
Coastal Mind App मध्ये सरावासाठी अनेक प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकता.

3) *भाषा*
" एकूण 4 उतारे असून या साठी आपणास जास्तीत जास्त वाचन ...उतारे...लेख...नविनविन बालसाहित्य लेख. वाचन करणे आवश्यक आहे ". 
विद्यार्थ्यांचे समानार्थी शब्द / विरूद्धार्थी शब्द व शब्द संपत्ती चांगली असेल तर 20 पैकी 20 गुण सहज मिळवता येतात. 
Coastal Mind App मध्ये सरावासाठी 200 पेक्षा जास्त उतारे आहेत  ते आपण सोडवू शकता

▪️ *किती गुण आवश्यक आहेत निवड होण्यासाठी*
- बुद्धिमत्ता 40 प्रश्न बरोबर यावे 
- मराठीत 20 प्रश्न यावे.
- गणित 18 प्रश्न बरोबर ...

म्हणजे आपली निवड निश्चित समजा. 

80 प्रश्न पैकी किमाण 76 प्रश्न बरोबर आले तरच निवड निश्चित.

Post a Comment

0 Comments

close