Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक बदली 2024-25 अपडेट | जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली वेळापत्रक जाहीर | शिक्षक संवर्ग 2 मधील बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या जाहीर | संवर्ग 3 मधील शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा?

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2024-25 च्या बदल्या विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच आंतरजिल्हा बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 




जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 18 जून 2024 चा शासन निर्णय पहा. - Click Here

आंतरजिल्हा बदली 23 मे 2023 चा शासन निर्णय पहा. Click Here


ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/





Help Desk - OTT Support numbers :
ऑनलाईन बदलीबाबत vinsys सॉफ्टवेअर पुणे यांचे महत्वाचे नंबर व इमेल - 
1) 7757968420.
2)7757968435.
3) 02035050201.
4) 02035050203.

 

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/


आपली बदली कोणत्या शाळेत झाली? ते असे पहा. 

1) Udise Portal वरुन शाळा चेक करा. शाळेची संपूर्ण माहिती पहा. 

UDISE नंबर टाका व बदली कोठे झाली ते पहा.  

Udise portal लिंक - Click Here


वरील लिंकवर टच करा. 
Udise Number टाका. 
Captcha टाका. 
शाळा पहा.
अशा प्रकारे शाळेचे नाव व माहिती दिसेल. 


2) Udise Number Edit करा आणि सर्च करा. 


New Update - 24 July 2025

विशेष संवर्ग 2 शिक्षक बदली जिल्हानिहाय यादी डाउनलोड करा. 

काही शिक्षकांच्या नावासमोर choice no-0 येत आहे आणि udise number पूर्वीच्या शाळेपेक्षा वेगळा दिलाय आणि transferd असा शेरा आहे 
असे का ?
Software problem मुळे असे झाले होते सदर समस्या vinsys च्या निदर्शनास आणून दिलेली आहे. त्यांनी आता हा प्रॉब्लेम solve केला आहे. नावासमोर udise नंबर दिला आहे. तेथे बदली झालेली आहे. 

Download Vacancy List after cadre 2 Transfer

रत्नागिरी

संवर्ग 2 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून तांत्रिक कारणास्तव बदली याद्या आज सायंकाळ पर्यंत उपलब्ध होतील. 

We will Updating soon.....
plz Refresh this page



New Update - 24 July 2025

बदली अधिकार पात्र संवर्ग 3 मधील शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा? 


➡️ दिनांक 25.07.2025 रोजी सुधारित रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत

➡️ यानंतर  बदली अधिकार प्राप्त चा टप्पा दिनांक 26.07.2025 रोजी सुरू होत आहे

*➡️ काही अपरिहार्य कारणामुळे बदल होऊ शकतो*

➡️  बदली अधिकार प्राप्त असलेल्या शिक्षकांना दिनांक 26.07.2025 ते 29.07.2025 या कालावधीमध्ये खालील लिंक वर अर्ज भरता येईल

ott.mahardd.com

✳️ बदली अधिकार प्राप्त ( संवर्ग 3 ) च्या शिक्षकांनी बदली करिता प्राधान्यक्रम भरताना खालील मुद्द्यांचा विचार करावा

*➡️ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सलग 3 वर्ष सेवा एक किंवा अनेक शाळांवर पूर्ण केलेली आहे. अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक या टप्प्यावर बदली करिता अर्ज करता येईल (GR 1.7.1)*

➡️बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा प्राधान्यक्रम हा त्यांच्या अवघड क्षेत्रातील सलग सेवेतील रुजू दिनांकावर ठरवण्यात येईल येथे जिल्हा सेवाजेष्ठतेचा विचार केला जाणार नाही* (GR 4.4.3)

➡️ सद्य परिस्थितीत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना जिल्ह्यातील सामानिकरणा व्यतिरिक्त उर्वरित सर्व रिक्त जागा व उर्वरित बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दाखवण्यात येतील.(GR 4.4.5)

➡️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना पोर्टलवर बदली करिता होकार (Yes )किंवा नकार (No )देण्याची सुविधा उपलब्ध असेल. 

✳️ *बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीला नकार म्हणजेच No निवडून आपला फॉर्म सबमिट केलेला असेल तर त्यांची बदली होणार नाही*

*If teacher has selected "Willing for transfer" option as "No" then he will not get transferred in entitled round.*

✳️ *तसेच ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी त्यांना बदली हवी असल्यामुळे  Yes निवडून आपला प्राधान्यक्रम दिलेला असेल तर अशा शिक्षकांची बदली त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल जर त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार बदली देणे शक्य न झाल्यास त्यांची बदली होणार नाही

*If he selects option "Yes" then he will be transferred as per his choices and availability of vacancies, and if no choice available then he will not get transferred in Entitled Round.*

➡️ ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून बदली नको असेल व असे शिक्षक बदली पात्र नसतील तर अशा शिक्षकांनी पसंती क्रम भरू नये. 

➡️ तरीसुद्धा आपणास याबद्दल काही शंका असल्यास आपणास पोर्टलवर होकार (Yes ) किंवा नकार (No ) देण्याची सुविधा उपलब्ध असेल जर आपल्याला बदली नको असल्यास नकार (No ) देऊन फॉर्म सबमिट करावा येथे प्राधान्यक्रम भरण्याची गरज नाही. यामध्ये आपली बदली होणार नाही

*➡️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी पोर्टलवर होकार( Yes)नोंदवून किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरावा किंवा जर पोर्टलवर तीस प्राधान्यक्रम उपलब्ध नसतील तर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या जागांचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा आपण बदली करिता होकार नोंदवल्यामुळे आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा देण्याचा प्रयत्न पोर्टल करेल परंतु जर आपल्या प्राधान्यक्रमानुसार आपणास शाळा मिळाली नाही तर आपली बदली होणार नाही परंतु असे शिक्षक जर बदली पात्र यादीमध्ये येत असतील तर त्यांची बदली पात्र टप्प्यावर बदली निश्चित केली जाईल (GR  4.4.6)*

➡️ बदली अधिकार प्राप्त शिक्षक हे जर बदली पात्र असतील तर त्यांना प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे जर अशा शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरला नाही तर ते विस्थापित होतील

*➡️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली अर्ज केलेला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदली करिता अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येईल (GR 4.2.6)* 

*➡️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी पसंतीक्रम देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहे तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा आपला फार्म सबमिट होणार नाही (GR 3.2)*

*➡️बदली अधिकार प्राप्त शिक्षक अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा  किंवा बदली पात्र शिक्षकांच्या जागा उपलब्ध असल्यास पुन्हा अवघड क्षेत्रामध्ये बदली मागू शकतात.(GR 4.4.5)*

*➡️ बदली अधिकार प्राप्त शिक्षक यादीतील ज्या शिक्षकांची यापूर्वी बदली पती-पत्नी एक युनिट मधून घेतलेली आहे किंवा संवर्ग शिक्षक भाग दोन मधून बदली घेतलेली आहे किंवा सध्या कार्यरत असलेल्या  क्षेत्रामध्ये पती-पत्नी च्या शाळांचे अंतर 30 किलोमीटरच्या आत आहे असे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक या संवर्गातून एक युनिटचा लाभ घेऊ शकतात (GR 4.4.7)*

➡️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकाचा जोडीदार जर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 30 किलोमीटरच्या आत कार्यरत असेल तरीसुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकतात (GR 4.4.7)

➡️ पूर्वानुभावाप्रमाणे प्राधान्यक्रम भरण्याची घाई न करता सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील बदली अधिकार पात्र शिक्षकांसाठी जिल्ह्यातील रिक्त जागांची यादी व बदली पात्र शिक्षकांची यादी प्राधान्यक्रम भरण्याकरिता प्रकाशित करण्यात आलेली असेल सदर  यादींचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपल्या वास्तव्य सेवाजेष्ठतेनुसार व आपल्या यादीतील असलेला प्राधान्यक्रम यांचा योग्य मेळ लाऊन आपल्याला त्यातल्या त्यात सोयीची शाळा कोणती मिळू शकते याबाबत  योग्य असा अंदाज बांधून त्यानंतर आपण आपला फार्म भरवा  अशा शाळांचा यु डायस क्रमांक नोंदवून त्याचा प्राधान्यक्रम अगोदर लावून घ्यावा व त्यानंतरच पहिल्याच दिवशी अर्ज सबमिट न करता व शेवटच्या दिवसाची ही वाट न पाहता योग्य तो वेळ घेऊन विन्सेस ने दिलेल्या सूचना व शासन निर्णय यांचा अभ्यास करूनच आपला प्राधान्यक्रम बदली पोर्टलवर भरून तो सबमिट करावा.

वरील पोस्ट शासन आदेश व Vinsys च्या दिलेल्या मार्गदर्शनानुसार आहे कोणत्याही मुद्द्या संदर्भात शंका असल्यास आपण माझ्याशी 9767397707 या नंबरवर संपर्क करू शकता कृपया ही पोस्ट एडिट करू नये ही पोस्ट इतरांकरिता ग्रुप वर शेअर करा
अखिल महा.प्राथ.शिक्षक संघ अमरावती मार्गदर्शन समुह
*धन्यवाद*


New Update - 21 July 2025

आजचे बदली विषयक न्यायालयीन अपडेट


दिनांक: २१ जुलै २०२५

कोर्टाचा आदेश (P.C.):

1. लेखी याचिका क्र. ५४५६/२०२५ मध्ये, या न्यायालयाने "जैसे थे स्थिती" (status quo) आदेश दिला आहे.

– याचा अर्थ असा की सद्यस्थिती जसची तशीच राहावी, कोणतेही बदल किंवा कारवाई केली जाऊ नये.

– हा आदेश पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत लागू राहील.

2. ही याचिका २५ जुलै २०२५ रोजी पुढील सुनावणीसाठी ठेवण्यात यावी.

[माननीय मंजुषा देशपांडे, न्यायमूर्ती]

[माननीय चंद्रशेखर, न्यायमूर्ती]

आजच्या न्यायालयीन ऑर्डरमध्ये 06/05/2025 ला कोर्टाने दिलेले आदेश 25 जुलै पर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये बदली प्रक्रियेला स्थगितीचा कुठेही उल्लेख नाही.

आजचा (21 जुलै 2025) कोर्ट आदेश डाउनलोड करा. Click Here


बदली विरोधी याचिका वकील नोटीस डाउनलोड करा. Click Here



New Update - 20 July 2025

शिक्षक बदली प्रक्रिया नियमानुसारच

https://www.shaleyshikshan.in/2024/11/teachers-transfer-update.html

दिनांक 15 मार्च 2024 या शासन निर्णयानुसार 2024-25 या वर्षांमध्ये संच मान्यता झाली. संच मान्यतेनुसार बरेच शिक्षक अतिरिक्त झाले म्हणून, शासनाने घेतलेल्या निर्णयाला शिक्षकांनी विरोध केला. शिक्षक अतिरिक्त करू नका म्हणून काही शिक्षक न्यायालयात गेली त्यामुळे, म्हणून शासनाने तसेच प्रशासनाने अतिरिक्त शिक्षक ठरवून त्यांचे समायोजन करण्याचे आतापर्यंत टाळलेले आहे. म्हणून संवर्ग एक च्या बदल्या करताना शिक्षकाच्या जागी शिक्षक दिला गेलेला आहे.

 .... 

`शिक्षक अतिरिक्त झाले तर तिकडून पण आवाज उठवायचा, शिक्षकाच्या जागी शिक्षक देऊन शिक्षक अतिरिक्त केला नाही तरी पण आवाज उठवायचा,` *शासनाने प्रशासनाने अतिशय पारदर्शक बदल्या केलेल्या आहेत. बदल्यामध्ये होणाऱ्या लाखो कोटींचे घोटाळे थांबवलेले आहे, बदल्यातला भ्रष्टाचार थांबवलेला आहे,* यासाठी शासनालां प्रशासनांना सहकार्य करून त्यांचे आभार व्यक्त करण्याची वेळ असताना,, काही संकुचित शिक्षक जर न्यायालयात जाण्याचे भाषा करत असेल,,,,, तर ते शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या किती न्याय देतात हे पण तपासण्याची वेळ आहे.....


👇 *Follow WhatsApp Channel*

https://whatsapp.com/channel/0029Va9z8Qm5kg7AsKlqON1V

💤 Vinsys सॉफ्टवेअर च्या चूका दिसून येत नाहीत. हे महत्त्वाचे आहे...

➖➖➖➖➖➖➖➖➖

संचमान्यता 2024-25 नुसार जे अतिरिक्त शिक्षक होते त्यांचे समायोजन बदल्या पूर्वी करणे आवश्यक होते पण प्रशासनाकडून ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही... 

*आता ते अतिरिक्त शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांच्या जागी नवीन शिक्षक येत आहेत.*


💁‍♀️ *ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टल लिंक*

https://bit.ly/ottportal

.....गुरू,, बरेच वर्ष दऱ्याखोऱ्यात वाड्या वस्तीवर काम करणाऱ्या सामान्य शिक्षकांनाही कुठेतरी अपेक्षा असते सोयीची बदली करण्याची.. त्या सामान्य शिक्षकाची एवढी ही अपेक्षा काही मूठभर  शिक्षक जर पूर्ण होऊ देत नसेल तर हे कितपत योग्य आहे याचे आत्मपरीक्षण सर्व बंधू- भगिनीने करावे हीच नम्र विनंती....🙏🏻


New Update - 17 July 2025

विशेष संवर्ग 2 साठी पसंतीक्रम नोंदविण्यासाठी / फॉर्म भरण्याची सुविधा 19 जुलै 2025 ते 22 जुलै 2025 दरम्यान उपलब्ध करण्यात येत आहे. 


संवर्ग 2 साठी कोणत्या जागा दाखवतात? 

बदलीपात्र शिक्षक

संवर्ग 1 व 2 ने होकार दिलेले शिक्षक

रिक्त जागा 



शिक्षक बदली पोर्टल अपडेट
👇 शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे निकष डावलल्याने शिक्षक ठरले अतिरिक्त

Share with your friends👭👬

Join WhatsApp Group - शालेय शिक्षण



विशेष संवर्ग 1 शिक्षक बदली जिल्हानिहाय यादी डाउनलोड करा. 




We will Updating soon.....
plz Refresh this page

आपली बदली कोणत्या शाळेत झाली? ते असे पहा. 

1) Udise Portal वरुन शाळा चेक करा.

UDISE नंबर टाका व बदली कोठे झाली ते पहा.  Udise portal लिंक - Click Here

वरील लिंकवर टच करा. 
Udise Number टाका. 
Captcha टाका. 
शाळा पहा.
अशा प्रकारे शाळेचे नाव व माहिती दिसेल. 


2) Student portal वरुन शाळा चेक करा. 

Student Portal Link - Click Here

Transfer Request ला जा. 
UDISE नंबर टाका. 
शाळा सर्च करा. शाळेचे नाव दिसेल. 

New Update - 17 July 2025

विशेष संवर्ग 2 साठी पसंतीक्रम नोंदविण्यासाठी / फॉर्म भरण्याची सुविधा 19 जुलै 2025 ते 22 जुलै 2025 दरम्यान उपलब्ध करण्यात येत आहे. 


संवर्ग 2 साठी कोणत्या जागा दाखवतात? 

बदलीपात्र शिक्षक

संवर्ग 1 व 2 ने होकार दिलेले शिक्षक

रिक्त जागा 


✳️ संवर्ग 1 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम कसा भरावा?

See Video 

संवर्ग 1 मधील शिक्षकांनी बदली फॉर्म कसा भरावा? Video पहा. - Click Here


✳️  संवर्ग एकच्या शिक्षकांनी फॉर्म भरताना खालील मुद्द्यांचा विचार करावा. 

✳️ संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहे. 

✳️ जर आपण बदली पात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहील

✳️  परंतु आपण बदली पात्र शिक्षक अथवा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल अन्यथा वरील टप्प्यांमध्ये बदली होऊ शकते यापुढे कोणतेही संवर्गाला मुदतवाढ मिळणार नाही. 

✳️ पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता

✳️ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा? 

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/


➡️ Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा

➡️ आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा

➡️ लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी त्याकरिता पेजवरील 'मराठी' या टॅब वर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल


➡️ स्क्रीनवर आलेले declaration  स्विकारून डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे. 

➡️ त्यातील application form वर क्लिक करावे

➡️ त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर application type  व action असे दोन ऑप्शन दिसतील. 


➡️ Cadre 1 च्या समोर view application चा tab दिसेल application tab वर क्लिक केले की. 

➡️ Cadre 1 application form स्क्रीनवर दिसेल त्यावर

शिक्षकाचे नाव

आडनाव

शाळेचा यु डायस नंबर

शिक्षकाचा शालार्थ आयडी


ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही

➡️ त्याखाली मला बदलीतून सूट हवी आहे असा प्रश्न दिसेल व त्याखाली आपला संवर्ग एक मधील प्रकार दिसेल

वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही


➡️ त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल

पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर


➡️ खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल

➡️ याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम आपण निवडू शकता


➡️ प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down  मधून शाळा निवडावी

➡️ शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील

किती मंजूर पदे

किती कार्यरत पदे

शाळेतील रिक्त पदे

समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे

बदली पात्र शिक्षकांची पदे

ह्या सर्व संख्या दिसतील


➡️ Add tab  वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्य क्रमामध्ये ऍड केली जाईल

➡️ आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add  केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे


➡️ या ठिकाणी संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रमांमध्ये दाखवल्या जातील

➡️ Add केलेली प्रत्येक शाळा save या  tab वर  क्लिक करून  save करावी

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/

 ➡️ आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून  do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल


➡️ अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना add preferences  वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save  करावी


➡️ अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही


➡️ यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. 

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/

➡️ संवर्ग एकच्या शिक्षकांना दिनांक 12 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 प्राधान्यक्रम भरण्याकरिता सुविधा दिलेली आहे त्यानंतर लगेच 18 जुलैला संवर्ग एक च्या बदली झालेल्या शिक्षकांची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल व लगेच त्यानंतर दोन दिवसांनी संवर्ग दोन ला प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली


➡️ वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनपर आहे प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा


बदली प्रक्रिये संदर्भात कोणताही संभ्रम किंवा अडचण येत असल्यास वरील नंबर वर मेसेज करू शकता. 

आदित्य धस - 9022226855

संजय नागे - 9767397707


New Update - 05 July 2025

*▪️शिक्षकांच्या अपीलावरील प्रक्रिया पूर्ण*
*▪️प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरु होण्यासाठी फक्त 2 टप्पे बाकी*

🔅 *सर्व संवर्गांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध करणे - दि. 05.07.2025 (1 दिवस)*

🔅 *रिक्त पदे व समानीकरण पदे अपलोड करणे व समानीकरण व रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करणे - दि. 07 ते 10 जुलै 2025*

🔅 *हे टप्पे पूर्ण झाल्यानंतर संवर्ग 1 साठी पसंतीक्रम भरणे साधारणपणे 11 जुलै पासून सुरू*

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/



New Update - 03 July 2025
आंतर जिल्हा बदली प्रक्रिया 2025 ऑनलाईन राबविणे बाबत परिपत्रक 03 जुलै 2025

दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने संगणकीय प्रणालीव्दारे राबविण्यात येते. त्यानुसार या विभागाच्या दि.२८.२.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सन २०२५ करीता आंतरजिल्हा बदली बाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात आले असून, त्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच सन २०२२ च्या प्रतिक्षाधिन शिक्षकांकरीता व सन २०२३ च्या पात्र शिक्षकांकरीता संदर्भ क्र. ३ येथे नमुद पत्रांन्वये सूचित केल्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तथापि, संदर्भ क्र. २ येथील दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने राबवावी, याबाबत संदिग्धता निर्माण होत असल्याचे आढळून येते. ही वस्तुस्थिती विचारात घेता, या विभागाकडून संदर्भ क्र. २ येथील दि.२३.८.२०२३ रोजी निर्गमित केलेले पत्र रद्द करण्यात येत आहे.

आंतरजिल्हा बदली 2025 बाबत 03 जुलै 2025 चे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here




New Update - 25 June
🙋‍♀️ *शिक्षक बदली पोर्टल अपडेट*
    *1)शिक्षकांनी याद्यावर अपील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्याची मुदत 25.06.2025 ते 27.06.2025 पर्यंत असेल.*

    *2) तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आलेले अपील निकाली काढण्याचा कालावधी  सुनावणी घेऊन अपील मान्य/अमान्य करून केस बंद करतील.यासाठी कालावधी दिनांक 28.06.2025 ते 04.07.2025 या सात दिवसांचा असेल.*

*3) त्यानंतर पुन्हा संवर्ग एक ते चार च्या बदली पात्र याद्या प्रसारित होतील.* 

*4) नंतर रिक्त पदाचा अहवाल घोषित होईल.* 

*5) नंतर संवर्ग एक साठी form भरण्यास सुविधा मिळेल.*



New Update 20 june 

सेवानिवृत्तीस १ वर्ष बाकी असलेल्या विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मधील शिक्षकांबाबत.


प्राथमिक शिक्षक संवर्ग जिल्हांतर्गत बदली सन २०२५ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मध्ये भाग घेतलेल्या अथवा न घेतलेल्या ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला १ वर्ष बाकी आहे अशा शिक्षकांची यादी प्राप्त होणार आहे .
 त्या यादीतील शिक्षकांकडून  ज्या शिक्षकांना बदली हवी आहे  अथवा बदली नको आहे अशा शिक्षकांकडून बदली हवी किंवा नको याबाबत हमीपत्र घ्यायचे आहे व तसे इमेल द्वारे व्हिंसिसला अवगत करायचे आहे.

हमीपत्र 57+ नमूना 1 - Click Here

हमीपत्र 57+ नमूना 2 - Click Here


New update 15 june 2025
Appeal to EO टॅब Active झाली आहे .

Ott portal login karun

➡️Intra district वर क्लिक करावा

➡️त्यामध्ये List वर क्लिक करावे

➡️Cader 1 or cader 2  वर क्लिक करावे 

➡️Appeal To EO टॅबवर क्लिक करावे 

➡️डायलॉग बॉक्स वर टच करावे .

➡️ज्याच्यावर appeal करायचे आहे
 त्याचे नाव

➡️शालार्थ आय डी

➡️युडायस नंबर

➡️कारण / आपले म्हणणे लिहून सबमिट करायचे आहे .


New Update 14 June 2025

💐 *बदली पोर्टल बाबत.*
🙋‍♀️ संवर्ग  1, 2, 3 आणि 4 मधील बदली पात्र शिक्षक याद्या पुन्हा नव्याने ceo लॉगिन वरून 14 जून रोजी Publish होतील.

🙋‍♀️ दिनांक 15 जून पासून 17 जून पर्यंत अपील To Eo ही सुविधा पोर्टल वर सुरू होईल.याद्वारे संवर्ग 1 2 याद्यावर सर्व शिक्षक सोसियल आक्षेप घेऊ शकतात


New Update 10 june 2025
विशेष संवर्ग 1 व 2 यांनी भरलेल्या फॉर्मची व पुराव्यांची पडताळणी करुन फॉर्म Approve/ Reject करणेबाबत ची कार्यवाही 10 ते 12जून दरम्यान करण्यात येणार आहे. 

यानंतर संवर्ग 1 व 2 च्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 
सदर यादीवर आक्षेप नोंदविण्याची प्रक्रिया यानंतर सुरु होईल. 


New update - 07 june 2025

आज किंवा उद्या पासून संवर्ग 1 बदली हवी /नको साठी नोंदणी पोर्टल वर सुरू होईल.....!

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/

Application Tab Available | फॉर्म भरण्याची टॅब उपलब्ध


संवर्ग 1 मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास काय करावे?

संवर्ग 1 मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास NO हा पर्याय निवडावा. म्हणजेच बदलीतून सूट हवी आहे का? तेथे NO निवडा. 

* संवर्ग 1 मधील शिक्षकांना बदली नको असल्यास काय करावे? 

संवर्ग 1 मधील शिक्षकांना बदली नको असल्यास YES हा पर्याय निवडावा. म्हणजेच बदलीतून सूट हवी आहे का? तेथे YES निवडा. 


Share it

New Update - 04 June 2025
1) सर्व जिल्हा बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध
2) रिक्त पदे व समाणीकरणातून ठेवायची रिक्त पदे ऑनलाईन बदली पोर्टल वर 5 जून पर्यंत भरता येणार

Eligible Transfer list - बदली पात्र शिक्षक यादी
Entitled Transfer list - बदली अधिकार प्राप्त शिक्षक यादी
Eligible for difficult round - दुर्गम क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठीची फेरी 7 साठी शिक्षक यादी

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/


ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/






New Update - 28 may 2025
शासनाच्या दि.२८.३.२०२५ रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी दि.३० सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेकडे अद्ययावत असलेल्या संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त पदांची नोंद तात्काळ करण्यात यावी. शासनाच्या दि.०७.११.२०२४ रोजीच्या जिल्हांतर्गत बदली वेळापत्रकानुसार बदल्यांबाबतची कार्यवाही पूर्ण न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील. तसेच मा.न्यायालयाचे काही विशिष्ट आदेश असल्यास न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यात यावे व मा. न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

जिल्हाअंतर्गत बदली बाबत 28 मे 2025 चे शासन परिपत्रक. Click Here





New Update - 24 may 2025
👇 आज (24 मे ) रोजी दुपारनंतर सर्व जिल्ह्याच्या बदली पात्र याद्या (eligible / entitled) जिल्हा लॉगीन वरून Publish झाल्यानंतर सर्वांसाठी आपल्या लॉगिन वर प्रदर्शित होतील.

💁‍♀️ शिक्षकांना आपल्या लॉगीन वरून बदली पात्र याद्या डाऊनलोड करता येतील.

Eligible Transfer list - बदली पात्र शिक्षक यादी
Entitled Transfer list - बदली अधिकार प्राप्त शिक्षक यादी
Eligible for difficult round - दुर्गम क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठीची फेरी 7 साठी शिक्षक यादी

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/


New Update - 21 may 2025
ऑनलाईन बदली पोर्टलवर निव्वळ रिक्त पदे व समानीकरणातून ठेवायची रिक्त पदे पोर्टलवर भरण्याची कार्यवाही  BEO लॉगीन वरुन सुरू आहे. 

संचमान्यता 2024-25 नुसार बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश - Click Here



New Update - 14 May 2025
5.10.6 अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकाची गैरवर्तणुकीबद्दल प्राप्त तक्रार अनुषंगाने करावयाच्या बदली बाबत शासन निर्णय 18 जून 2024 मध्ये सुधारणा करणेबाबत 14 मे चा शासन निर्णय - Click Here


New Update - 13 May 2025
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सेवाजेष्ठता बाबत आवश्यक ते बदल करणेबाबत व प्रोफाईल अपडेट करणेबाबत

मा. उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिकेचे निर्णय दिनांक ०९.०५.२०२५ नुसार आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मधील नियम ६ (८) (२) नुसार सेवाजेष्ठता अनुज्ञेय करुन त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या जिल्हयातील रूजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करणेबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. तसेच संदर्भ क्र. २ चे पत्रान्वये निर्गमित केलेल्या इतिवृत्तातील अनु. क्र. ३ मध्ये दिलेले निर्देश रदद करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपले स्तरावरून बदली पोर्टलवर शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करणेची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करणेची दक्षता घ्यावी.

आपसी आंतरजिल्हा बदली प्रोफाईल अपडेट करणेबाबत परिपत्रक - Click Here

आपसी आंतरजिल्हा बदली बाबत कोर्ट ऑर्डर PDF - Click Here


आपसी आंतरजिल्हा बदली बाबत कोल्हापूर जि. प. चे परिपत्रक



New Update - 17 April 2025
शिक्षक बदली - कालच्या VC मधील मुद्दे 
1. सर्व जिल्हयानी आपली गोल्डन फाइल डाउनलोड करावी. त्यातील अॅक्टिव शिक्षक, inactive शिक्षक , निलंबित शिक्षक, शिक्षण सेवक, सेवानिवृत्तीसाठी एक वर्ष राहिलेले शिक्षक या सर्वांची संख्या पडताळून घ्यावी. 
2. निलंबित शिक्षक Inactive असतील तर त्यांना अॅक्टिव करून घ्यावे. फक्त current working (कार्यरत शिक्षक) शिक्षकांची संख्या चुकू नये म्हणून त्यांना अॅक्टिव करावे, त्यांना बदली प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. तसेच वन यूनिट मध्येही त्यांची बदलीहोणार नाही. 
3. सेवानिवृत्तीला 1 वर्षे राहिलेले शिक्षक Inactive केले असतील तर त्यांना अॅक्टिव करावे. त्यांना फक्त विशेष संवर्ग 1 मधून बदली हवी असेल तर अर्ज करता येईल. इतर कुठलेही टॅब त्यांना उपलब्ध होणार नाहीत तसेच विशेष संवर्ग 1 व्यतिरिक्त कुठल्याही यादीत त्यांचे नाव येणार नाही. 
4. जात प्रवर्ग खुला आणि नियुक्ती प्रवर्ग ews असेल तर validation काढण्यात आलेले आहे. तर अशा शिक्षकांचे प्रोफाइल अॅड करून सबमिट करून घ्यावे. 
5. 2022 मध्ये जे शिक्षक अधिकार प्राप्त शिक्षक होते (आर डीडी पत्र 28 मार्च 2025 आणि 16 एप्रिल 2025) व ज्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना 2025 च्या बदली मध्ये पुनः संधि देण्यात येणार आहे. त्या सर्व शिक्षकांची यादी आम्ही तुम्हाला पाठवत आहोत. सर्व जिल्हयानी आपली यादी पडताळून घ्यावी. व सुधारित यादी आम्हाला पाठवावी. पोर्टल वर पुनः बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसारित केली जाइल. 
6. गटशिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षकाची माहिती अद्ययावत करण्यासाठी पोर्टल वर टॅब खुला करून देण्यात येईल. तेव्हा गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील शिक्षकांची माहिती अद्ययावत करून घ्यावी. 1. सरनेम 2. विद्यमान क्षेत्र रुजू दिनांक 3. Marital status 4. लिंग , इत्यादि माहिती अद्ययावत करून घ्यावी. 
7. शिक्षक Inactive चे अॅक्टिव केले असतील तर त्या शिक्षकांचे प्रोफाइल beo force acceptance मधून accept करून घ्यावे. 
8. डेटा अपडेट व करेक्शन ची फेज तीन दिवस चालू राहील. तेव्हा सर्व जिल्हयाणणी आपापळी माहिती अद्ययावत करून घ्यावी 
9. त्यानंतर वेकन्सी अपडेट चालू होईल. तेव्हा सर्वांना विनंती आहे की माहिती वेळेत आणि अचूक अद्ययावत करून घ्यावी. वेकन्सी चालू झाली की डेटा अपडेट फेज बंद होईल याची नोंद घ्यावी.

OTT vinsys कंपनीचा बदली बाबतचा कालचा video - 


New Update - 16 April 2025
जिल्हांतर्गत बदलीबाबत येणाऱ्या अडचणीवर Vinsys कंपनी पुणे यांनी दिलेली प्रश्नांची उत्तरे पहा. 




New Update - 15 April 2025
जिल्हांतर्गत बदली साठी संवर्ग 2 मधील बदली पात्र शिक्षकांना नकार देण्याचा अधिकार मिळणेबाबत शिक्षणमंत्र्यांचे ग्रामविकास मंत्री यांस पत्र
Comment on Facebook post - 




New Update 11 April 2025
बदली पात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या बदली ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करणे सुरू आहे. 

Eligible Transfer list - बदली पात्र शिक्षक यादी
Entitled Transfer list - बदली अधिकार प्राप्त शिक्षक यादी
Eligible for difficult round - दुर्गम क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठीची फेरी 7 साठी शिक्षक यादी

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/


जिल्हांतर्गत शिक्षक बदली 07.11.2024 च्या बदली वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे. 



New Update - 09 April 2025
दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक घोषित करणेत आले आहे. सदर वेळापत्रक मा. उच्च न्यायालय, नागपूर यांनी अवमान याचिका क्र. २१६/२०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार घोषित करण्यात आले असून त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविणेबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

त्यामुळे प्रधान सचिव (ग्राम विकास) यांनी या विषयाबाबत दि.०४.०४.२०२५ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या विहीत वेळापत्रकानुसार करणेबाबत शासन परिपत्रक 09 April 25 - Click Here

जिल्हांतर्गत बदली वेळापत्रक दि. 07.11.2024 चे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here


जिल्हांतर्गत बदली 2024/25 वेळापत्रक


संवर्ग 1 बदली - 28 एप्रिल ते 3मे ...7 दिवस

संवर्ग 2....4 मे ते 9 मे ...6दिवस


संवर्ग 3....10 मे ते 15 मे ....6 दिवस

संवर्ग 4....16 मे ते 21 मे ....6दिवस

विस्थापित बदल्या...22 मे ते 27 मे....6दिवस

अवघड क्षेत्रातील जागा भरणे....28 मे ते 31 मे ....4दिवस





New Update
Phase 1 Completed
Phase 2nd started
Phase2 - आंतरजिल्हा बदली
आंतरजिल्हा बदलीसाठी रोस्टर अपडेट करण्यास 12 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी अंतिम रोस्टर पाहण्यासाठी उपलब्ध होईल. 

सर्व जिल्ह्याचे रोस्टर अपडेट न झाल्यास आंतरजिल्हा बदल्या रद्द करुन जिल्हांतर्गत बदल्या सुरु होणार? 

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/





New update -28/03/2025

जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदलीबाबत शासन परिपत्रक - 28 मार्च 2025

🔰 जिल्हांतर्गत बदली
1)  _परिपत्रकानुसार ज्या शिक्षकांना 30 जून 2025 पर्यंत वयाची ५३ वर्ष पूर्ण झालेले आहेत *त्यांना संवर्ग एक चा लाभ मिळणार आहे*._(हा नियम फक्त ५३+ साठीच लागू आहे.)

2) _ज्या शाळा पुर्वी अवघड क्षेत्रात होत्या परंतु 2022 च्या यादीनुसार त्या सोप्या क्षेत्रात आल्या त्यांना या बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्राचा म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा लाभ मिळणार आहे._

3) _जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेपुर्वी जिल्हा परिषदेने *सर्व प्रकारच्या पदोन्नती प्रक्रिया पूर्ण* करावयाची आहे._

4) _पुढील बदली वर्षात म्हणजेच सन २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी बदली मागितली असल्यास त्यांची बदली संवर्ग 01 मधून करण्यात येईल._

🔰 आंतरजिल्हा बदली
1) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2024-25 करीता शिथील करण्यात येत आहे.

2) संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात.

28/03/2025 चे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here


New Update - 24/03/2025
दुर्गम / अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
आपली शाळा दुर्गम / अवघड क्षेत्रात आहे किंवा नाही हे कसे शोधाल❓

👉 प्रथम बदली पोर्टलला लॉगीन करा.
👉 त्यानंतर Difficult Area या टॅब ला टच करा.
👉 त्यानंतर Search बॉक्स मध्ये आपल्या शाळेचे नाव टाकून 🔍 चिन्हाला टच करा.
👉 तुमच्या शाळेचे नाव अवघड क्षेत्रात 2022 आणि 2025 नुसार आहे किंवा नाही? हे दिसेल.


ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/





बदली पोर्टल शिक्षक लॉगिन - 

💁‍♀️ शिक्षक प्रोफाईल Submit, Approve and Accept / Appeal to EO करणेबाबत... 

मुदतवाढ - शिक्षक प्रोफाईल अपडेट करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. 

शिक्षक लॉगीनवर प्रोफाईल अपडेटची सुविधा देण्यात आली आहे. शिक्षकांनी आपल्या प्रोफाईलवरील माहिती तपासून आपली प्रोफाइल BEO लॉगिनकडे फॉरवर्ड करावी.

संबंधित BEO प्रोफाइल खात्री करून Verify करतील.

त्यानंतर शिक्षकांनी पुन्हा लॉगिन करुन प्रोफाईल बरोबर असल्यास Accept करावे, माहिती चुकीची असल्यास Appeal to EO करावे. 

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/


शिक्षक बदली 2024-25 अवघड क्षेत्रातील शाळांची यादी घोषित करणेबाबत 05 मार्च 2025

शिक्षक बदली शासन निर्णय 18 जून अन्वये अवघड क्षेत्रातील शाळांची यादी दर ३ वर्षांनी मार्च महिन्यात पुनर्विलोकन करुन सुधारित करण्याची तरतुद आहे. यापूर्वीची अवघड क्षेत्राची यादी सन २०२२ मध्ये सुधारित करण्यात आली असल्यामुळे सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरीता सद्य:स्थितीत सन २०२५ स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी प्रसिध्द करणे आवश्यक आहे. 

त्यानुसार सन २०२५ स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी १५ मार्चपर्यंत घोषित करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदांनी कार्यवाही करावी. या कालावधीत अवघड क्षेत्राची सुधारित यादी घोषित न केल्यास सन २०२२ ची अवघड क्षेत्राची यादी ग्राह्य धरण्यात येईल. तथापि, याबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील.

तसेच अवघड क्षेत्राची यादी सुधारित करताना संवादछायेचा प्रदेश (Communication Shadow Area) हा केवळ महाप्रबंधक, बीएसएनएल यांच्या अहवालानुसार ग्राह्य न धरता अशा ठिकाणी अन्य कंपन्यांचे Network उपलब्ध आहे का, हे देखील तपासावे. (उदा Jio, Airtel, Vodafone-Idea)

सन २०२५ स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी १५ मार्चपर्यंत घोषित झाल्यानंतर याबाबतची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरीता ८ दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे. 

 

आंतरजिल्हा बदली अपडेट 2024-25

आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन २०२४-२५ राबविण्याकरीता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.


शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे
दि.१० मार्चपर्यंत

जिल्हा परिषदांनी बिंदुनामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदुनामावल्या व रिक्त पदांची माहिती अपलोड करणे.
दि.११ मार्च ते १३ मार्च

शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे
दि.१४ मार्च ते २० मार्च

ott portal - Online Teachers Transfer Portal 👇

 https://ott.mahardd.com/


अर्जाची पडताळणी करणे.
दि.२१ मार्च ते २५ मार्च

न्यायालयीन प्रकरणे/विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून प्राधान्य देणे.
दि.२६ मार्च ते २७ मार्च

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पुर्ण करणे.
दि.२८ मार्च ते ६ एप्रिल





जिल्हांतर्गत बदली 2024/25 वेळापत्रक


संवर्ग 1 बदली - 28 एप्रिल ते 3मे ...7 दिवस

संवर्ग 2....4 मे ते 9 मे ...6दिवस

संवर्ग 3....10 मे ते 15 मे ....6 दिवस

संवर्ग 4....16 मे ते 21 मे ....6दिवस

विस्थापित बदल्या...22 मे ते 27 मे....6दिवस

अवघड क्षेत्रातील जागा भरणे....28 मे ते 31 मे ....4दिवस




➖➖➖➖➖➖➖➖
28 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रोफाइल अपडेट करणे.
➖➖➖➖➖➖➖➖
चुकीची माहिती भरल्यास शिस्तभंगाची कार्यवाही होणार.
➖➖➖➖➖➖➖➖
सदर वेळापत्रकात बदल होऊ शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖


VC Update - प्राथमिक शिक्षक बदली बाबत

प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली बाबत.
संदर्भ: व्हिन्सीस मार्फत झालेली व्हिसी दिनांक 10.02.2025

वरील संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होत आहे.

1) पहिल्या फेज मध्ये 
ACTIVE SCHOOL
INACTIVE SCHOOL
ACTIVE TEACHER
INACTIVE TEACHER
NEW TEACHER ADDING 
चे काम जिल्हास्तरावरून सुरू होणार आहे.


बदली पोर्टलवर नवीन शिक्षकांची माहिती अपडेट करणे. 

नवीन शिक्षक / शिक्षण सेवकांची माहिती बदली पोर्टलवर भरणेसाठी माहिती PDF डाऊनलोड करा. Click Here





2) बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्या शिक्षकांना Read Only मोड मध्ये त्यांच्या प्रोफाईल मधील माहिती दिसनार आहे.

3) ज्या शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये अपडेशन करावयाचे आहे ते अपडेशन तालुकास्तरीय पडताळणी नंतर जिल्हास्तरावरून होणार आहे.
 
4) वरील काम संपल्यावर किंवा सोबतच सर्व शिक्षकांचे प्रोफाईल अपडेशन आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया तालुकास्तरावरून सुरू होण्याची शक्यता आहे.

   या कार्यालयाचे पत्र क्र 9282 दिनांक 30.12.2024 च्या पत्रातील सूचनेनुसार आपल्या स्तरावरील बदली माहितीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 10.02.2025 रोजी या कार्यालयात माहिती सादर करण्यासाठी आपणास अवगत करण्यात आले होते .

  तरी बदलीच्या अनुषंगाने सर्व काम पूर्ण करून बदलीची सर्व माहिती या कार्यालयात सादर करावी व आपल्या अधिनिस्थ सर्व शिक्षकांना बदल्याविषयी अवगत करावे.

          

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे राबविण्यात येते.

२. मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्र.२१६/२०२४ वरील दि.२५.१०.२०२४ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रीयेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहीत वेळापत्रकानुसार कार्यान्वित (functional) असावे, असे निदेश दिलेले आहेत.

३. तद्नुषंगाने आपणांस असे कळविण्यात येते की, यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रीया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरु करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करावी.

शिक्षक बदली 2024-25 वेळापत्रक PDF डाउनलोड करा. 


Post a Comment

0 Comments

close