Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

PAT अंतर्गत संकलित मूल्यमापन सत्र 1 वेळापत्रक व परीक्षा आयोजनाबाबत परिपत्रक | संकलित मूल्यमापन सत्र 1 प्रश्नपत्रिका PDF | संकलित मूल्यमापन सत्र 2 प्रश्नपत्रिका PDF

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत. सन २०२6-२7 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. 



सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा दोन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी -१ माहे नोव्हेंबर २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येत आहे.


सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - १ व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - २ यांचे खालील प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे.


आकारिक चाचणी 1 व 2 नमूना प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक. Click Here

प्रथम सत्र / द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका PDF 2026-27 - Click Here

संकलित मूल्यमापन चाचणी कालावधी

संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - १ : माहे नोव्हेंबर 2026 - (नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात घेण्यात येईल.) 






संकलित मूल्यमापन चाचणी उद्देश :-

१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.

२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे. 

३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत करणे. 

४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृत्तिकार्यक्रम तयार करणे जेणेकरून अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.

५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत मिळणे,


संकलित चाचण्यांचे माध्यम व विषयः 

सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात (मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलगु, सिंधी, बंगाली) होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता 2री ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.


तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा

इयत्ता 2 री ते 8 वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी. तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

टीप:-१ प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (सर्व माध्यम) या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी 

टीप:-२ प्रथम भाषा, गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी (इंग्रजी माध्यम वगळता सर्व माध्यम) या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.



संकलित मूल्यमापन चाचणीचा अभ्यासक्रम:

इयत्ता 2री ते 8वी अभ्यासक्रम

१. संकलित मूल्यमापन सत्र १ प्रथम सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.

२. संकलित मूल्यमापन सत्र २ द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.


इयत्ता 8वी अभ्यासक्रम

प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित व इंग्रजी करिता खालील अभ्यासक्रम असेल.

भाषा (सर्व माध्यम) - प्रथम सत्रांत अभ्यासक्रम यावर आधारित असेल.

गणित (सर्व माध्यम) भाग १ (१ ते ३ घटक)

भाग-२ (१ ते ४ घटक) इंग्रजी (प्रथम व तृतीय भाषा) प्रथम सत्रांत अभ्यासक्रम यावर आधारित असेल.

इयत्ता 8वी साठी अध्ययन निष्पत्ती ऐवजी क्षमता विधाने असून संबंधित सर्व माध्यमाच्या वरील तीन विषयांच्या चाचणी पत्रिका व शिक्षक सूचना यात क्षमता विधानांचे कोडींग नमूद करण्यात आलेले आहेत.


तरी उपरोक्त प्रमाणे सन २०२6- २7 या शैक्षणिक कालावधीत इयत्ता 2 री ते 8 वी च्या इयत्तांसाठी तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - १ व २ या संकलित मूल्यमापन चाचणीच्या अनुषंगाने आहेत. यामुळे शाळांनी इयत्ता 2 री ते 8 वी (प्रथम भाषा, गणित व इंग्रजी) या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ पुन्हा नव्याने घेवू नयेत. उपरोक्त चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत. या चाचण्यांची गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित १ व २ चे मूल्यमापन करावे.  


संकलित चाचणी-१ च्या अंमलबजावणीबाबत सूचना :


१. संकलित चाचणी-१ इयत्ता २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.


२. संकलित चाचणी १ करीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.


३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.


४. उपरोक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची एकच चाचणी घ्यावी. याव्यतिरिक्त या विषयांची शाळास्तरावरून कोणतीही चाचणी घेण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबतचे सनियंत्रण शिक्षणाधिकारी प्राथ. व माध्य. यांनी करावे.


५. संकलित चाचणी १ च्या चाचणीपत्रिका अंदाजित दि. २५ ऑक्टोबर २०२६ ते ०५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत वितरीत करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये PACKING गड्ढे समक्ष पोहोच करण्यात येणार आहेत.


६. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात. तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत अथवा शॉर्ट सर्किट अथवा इतर कोणत्याही कारणाने नष्ट होणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.

७. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर चाचणी पूर्वी शाळास्तरावर पोहचविण्याची दक्षता घेण्यात यावी.


८. प्रश्नपत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.

अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयक यांनी इयत्ता २ री ते ८ वी च्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त झालेल्या विद्यार्थी संख्येनुसार शाळांकरिता पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच पोहोच द्यावी.

आ. तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजून बंद लखोट्यामध्ये मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणीपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.



संकलित मूल्यमापन चाचणी सत्र -2 : माहे एप्रिल 2027 - ( एप्रिल ते  एप्रिल दरम्यान घेण्यात येईल.) 

संकलित मूल्यमापन सत्र 2 नमूना प्रश्नपत्रिका PDF - Click Here



PAT 3 सुधारित वेळापत्रक, परीक्षा आयोजन व  शाळाभेटी बाबत सूचना सुधारित परिपत्रक 2 - 09 एप्रिल 2026

11 एप्रिल 2026 - मराठी 
15 एप्रिल 2026 - गणित
22 एप्रिल 2026 - इंग्रजी



PAT 3 सुधारित वेळापत्रक, परीक्षा आयोजन व  शाळाभेटी बाबत सूचना परिपत्रक 09 एप्रिल 2026 खालील पत्र रद्द करण्यात आले आहे. 


संकलित मूल्यमापन सत्र 2 नमूना प्रश्नपत्रिका PDF - Click Here


संकलित मूल्यमापन चाचणी सत्र -1 : माहे एप्रिल 2025 शेवटचा आठवडा - (12 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेण्यात येईल.) 

संकलित मूल्यमापन सत्र 2 नमूना प्रश्नपत्रिका PDF - Click Here




संकलित मूल्यमापन सत्र 1 नमूना प्रश्नपत्रिका PDF - Click Here

संकलित मूल्यमापन सत्र 2 नमूना प्रश्नपत्रिका PDF - Click Here


खाजगी अनुदानित शाळांमध्ये होणार पायाभूत मूल्यमापन चाचणी - शाळांमधील विद्यार्थ्यांचे नियतकालीक मुल्यांकन चाचण्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. शासन निर्णय



पायाभूत चाचणी 2025 आयोजनाबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका PDF शालेय शिक्षण - Click Here


संकलित मूल्यमापन चाचणी सत्र - 2 : एप्रिल २०२४ पहिला आठवडा.


PAT संकलित मुल्यमापन द्वितीय सत्र-2 | शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका PDF डाउनलोड करा.


संकलित मूल्यमापन सत्र 2 नमूना प्रश्नपत्रिका PDF - Click Here


Post a Comment

1 Comments

  1. संकलित चाचणी 2 उर्दू माध्यम व हिंदी माध्यम pdf पाठवा

    ReplyDelete

close