Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नवनियुक्त केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण प्रशिक्षण | प्रशिक्षण गरजांचा अभ्यास' (Training Needs Analysis - TNA)

नवनियुक्त केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA) बाबत परिपत्रक | प्रशिक्षण गरजांचा अभ्यास' Training Needs Analysis (TNA)



महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नवनियुक्त केंद्रप्रमुखांसाठी 'केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण - प्रशिक्षण गरजांचा अभ्यास' (Training Needs Analysis - TNA) उपक्रम नोव्हेंबर २०२६ मध्ये सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (MIEPA) मार्फत हे प्रशिक्षण आयोजित केले जात असून, केंद्रप्रमुखांच्या कामाच्या गरजा समजून घेण्यासाठी एकूण २४ घटकांवर ऑनलाईन पद्धतीने अभिप्राय (Feedback) मागविण्यात येत आहेत.


उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्रात नवनियुक्त केंद्रप्रमुखांना त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्यांची माहिती देणे, प्रशासकीय कौशल्ये, शैक्षणिक नेतृत्व व तांत्रिक कौशल्ये याबाबत माहिती देणे यासाठी राज्यस्तरीय नवनियुक्त केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण आयोजन करणे तसेच प्रशिक्षणासाठीचे मोड्यूल तयार करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरुन सूचना प्राप्त आहेत.


केंद्रप्रमुख यांची भूमिका व जबाबदारी सक्षमणे पार पाडण्यासाठी कोण-कोणत्या प्रशिक्षण घटकांची आवश्यकता आहे यासाठी प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA) करणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रशासन अधिकारी, शिक्षण निरिक्षक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व सदस्य यांना खालील लिंक दि.१५/११/२०२६ पर्यंत भरण्याबाबत आपल्या स्तरावरुन आदेशित करण्यात यावे.


TNA गुगल फॉर्म लिंक - https://forms.gle/2Bfsn6vBNaXNxvDB8





केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण TNA म्हणजे काय?

उद्देश: केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी सध्याच्या कौशल्यांमध्ये आणि अपेक्षित सक्षमतेमध्ये (Competencies) असलेला फरक (Gap) ओळखणे.

प्रक्रिया: यात राज्यभरातील नवनियुक्त केंद्रप्रमुखांकडून विविध शैक्षणिक व प्रशासकीय घटकांवर अभिप्राय / सर्वेक्षण मागवले जाते, जेणेकरून प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम अधिक प्रभावी व गरजेनुसार तयार करता येईल.

प्रमुख घटक: शिक्षण प्रशासन, शाळा भेट व निरीक्षण, शैक्षणिक नेतृत्व, शासकीय योजना, डिजिटल प्रणाली आणि शालेय विकास आराखडा अशा विविध घटकांचा यात समावेश होतो.

Post a Comment

0 Comments

close