Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2023 संभाव्य वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२3 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा संभाव्य कालावधी जाहीर करण्यात आला आहे. 

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २ मार्च पासून सुरू होणार आहे. 

Join WhatsApp Group
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे; म्हणून मंडळाकडून  संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. यानुसार राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते २0 मार्च आणि दहावीची परीक्षा २ मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या वेबसाइटवर विद्यार्थी आणि पालकांना लवकरच उपलब्ध करुन देेेण्यात येईल. 

दहावीचा पहिला पेपर भाषा, तर बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा होईल. दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने नव्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार, तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी जुन्या अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक तयार करण्यात येईल. जुन्या विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत कळवले जाईल. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे; तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. सोशल मीडियाकडून व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहे.

Post a Comment

0 Comments

close