समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ निकाल जाहीर.
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी परीक्षेस एकूण ३८५५८ परीक्षार्थी उपस्थित होते.
सदर परीक्षेचा निकाल आज दि.१३/०३/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थी/उमेदवारांची गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तसेच TET/CTET या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची माहिती भरण्याची लिंक यथावकाश www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात येईल. सदर परीक्षेची माहिती भरताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल तेच नमूद करावे.
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ निकाल PDF
Cluster Head Mark List PDF 1 - Click Here
Cluster Head Mark List PDF 2 - Click Here
Cluster Head Mark List PDF 3 - Click Here




0 Comments