शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीकरीता उच्चतम वयोमर्यादा किती? विविध शासन निर्णय डाउनलोड करा.
राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीकरीता उच्चतम वयोमर्यादेबाबत स्पष्टीकरण शासन निर्णय 05 नोव्हेंबर 2026
शासन निर्णय : महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ९ (४) (ब) मधील तरतुदीप्रमाणे संदर्भाधीन शासन निर्णय १, २ व ३ मधील खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता ९ वी ते १० वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता ११ वी ते १२ वी) शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेबाबतच्या तरतूदी गैरलागू ठरतात. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता ९ वी ते १०) व उच्च माध्यमिक (इयत्ता ११ ते १२ वी) शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही. शासन निर्णय 05 नोव्हेंबर 2026 डाउनलोड करा. Click Here
शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत शासन निर्णय 05 नोव्हेंबर 2026
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने विहित कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येत आहे.
शासन निर्णय.
या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ जानेवारी, २०२६ ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरतीकरिता ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींकरिता संदर्भ क्र. (१) मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे; आणि,
२) या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दिनांक ३१ डिसेंबर, २०२७ पर्यंत पदभरतीकरिता ज्या जाहिराती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नव्याने प्रसिद्ध होणार आहेत, अशा जाहिरातींकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्र. (१) मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे.
३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त भरती परीक्षा आयोजित करणाऱ्या अन्य यंत्रणांमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता देखील वरील अ.क्र. (१) आणि (२) येथे नमूद केलेल्या तरतुदी लागू राहतील.
४) सदर शिथिलता ही केवळ एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असून, दिनांक १ जानेवारी, २०२८ रोजी किंवा त्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात अथवा संदर्भाधीन क्र. (१) येथील दिनांक २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील.





0 Comments