मुख्याध्यापक पदाचा चार्ज कोणाकडे असावा याबाबत स्पष्टीकरण करणारे जि.प. जालना ने एक परिपत्रक काढले आहे.
परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी - Click Here
जिल्हा परिषद शाळांमधील ज्या शाळेचा पट 150 पेक्षा जास्त असेल त्याठीकाणी मुख्याध्यापक पद RTE 2009 अंतर्गत संदर्भ दि.30/09/2013 नुसार पद मंजूर करण्यात आलेले आहे. इतर शाळांना मुख्याध्यापक (उच्चश्रेणी) पद मुजूर नाही याबाबत तालुकांतर्गत मुख्याध्यापक पदाचे कार्यभराबाबत साशंकता आहे. याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करून अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून करण्यात यावी.
1) ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर असून कार्यरत मु.अ. नी कर्तव्य सुची प्रमाणे कार्यभार सांभाळणे आपणावर बंधनकारक राहील परंतु सदरचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा. पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा
2) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नाही परंतू पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर आहे त्याठिकाणी सेवाजेष्ठ पदविधराकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असल्यास सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.
3) ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्याध्यापक व पदवीधर पद मंजूर नाही त्या ठिकाणी सेवाजेष्ठ प्राथमिक शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्यात यावा.
4) वरील 01 ते 03 बाबी व्यतीरिक्त स्थानीक पातळीवर अडचणी समस्या असतील अशा ठिकाणी स्वतः गट शिक्षणाधिकारी यांनी ज्यांना शिक्षक / प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापकाच्या कारभाराबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित वेळोवेळी केलेले असतील त्यांनी मुख्याध्यापकांच्या कर्तव्यसुचीप्रमाणे कार्यभार सांभाळणे संबंधितावर बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.
1 Comments
जी आर कोणता आहे?
ReplyDelete