मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती, आपल्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), किंवा अन्य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्टानेही सादर केल्या जाऊ शकतात. तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा नोंदणी करता येईल.
पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता
१. तो भारताचा नागरीक असावा.
२. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापिठाचा पदवीधर असावा.
३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा
४. त्याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.
५. पदविका (Diploma) जर पदवीतूल्य असेल तरच पदवीधर गृहित धरण्यात येईल.
शिक्षक मतदार नोंदणीकरिता पात्रता
१. तो भारताचा नागरीक असावा.
२. त्याने मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या लगतच्या ६ वर्षात किमान ३ वर्षे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून पूर्णवेळ काम केलेले असावे.
३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा
४. त्याने विहित कागदपत्रांसह त्यांनी फॉर्म क्र. १९ भरावा.
शिक्षक पदवीधर असल्यास शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघात मतदान करू शकतात.
शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्यक इतर कागदपत्रे
१. रहिवासाचा पुरावा. (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्ती, टेलीफोन/विज बिल किंवा इतर मान्यताप्राप्त कागदपत्रांची साक्षांकित प्रत.)
२. मार्क लिस्टची साक्षांकित प्रत.
३. पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.
४. ओळखपत्र
५. शिक्षक असल्यास नोकरी करीत असल्याबाबत (आजी किंवा माजी) प्राचार्यांचे पत्र
६. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र.
साक्षांकन
प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी,किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकार्यांकडून करून घ्यावे.
ऑफलाईन नाव नोंदणी - अर्ज आणि कागदपत्रे सादर करणे
मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती, आपल्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), किंवा अन्य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्टानेही सादर केल्या जाऊ शकतात. शक्यतो ही कागदपत्रे समक्ष सादर करून त्यांची पोहोच घ्यावी. तसेच अद्ययावत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर, त्यात स्वत:चे नाव असल्याची खात्री करावी.
पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी कशी करावी ?
निवडणुकीसाठी मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागते.
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवीन नोंदणी असते. 2026 साठी नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
पदवीधर व शिक्षक मतदार नावनोंदणी लिंक / ऑनलाईन फॉर्म लिंक - Click Here
पदवीधर व शिक्षक मतदार रजिस्ट्रेशन लिंक /ऑनलाईन फॉर्म लिंक - Click Here
पदवीधर मतदार नोंदणी - Offline form 18 Click Here
शिक्षक मतदार नोंदणी - Offline Form 19 Click Here
शिक्षक म्हणून काम करत असले बाबत मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र नमूना - Certification of form 19 - Click Here
ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1)कोणत्याही शाखेतील पदवीच्या मार्कमेमोची झेरॉक्स Pdf मध्ये size --200KB
2)आधारकार्ड झेरॉक्स size --200KB
3)पासपोर्ट साईज फोटो -100kb मध्ये
4)स्वाक्षरी --100 Kb मध्ये
वरील कागदपत्रे अपलोड करून फॉर्म submit करणे,त्यानंतर Acknowledgement Number येईल तो स्वतः जवळ ठेवावा,भरलेला pdf फॉर्म सुद्धा Download करा येतो.
नोंदणी करण्याची मुदत
30 सप्टेंबर 2025 ते 06 नोव्हेंबर 2025
पदवीधर मतदार नोंदणी अर्ज online
मतदार यादीत नाव नोंदणी 2026 online
मतदार यादीत नाव शोधणे
पदवीधर व शिक्षक मतदार नाव नोंदणी करणेबाबत शासन परिपत्रक (निवडणूक आयोग) डाउनलोड करा. Click Here
पदवीधर व शिक्षक मतदार नाव नोंदणी करणेबाबत शासन परिपत्रक (शालेय शिक्षण विभाग) डाउनलोड करा. Click Here
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी लिंक - Click Here
पदवीधर मतदार यादीत नाव शोधा. | मतदार यादी PDF डाउनलोड करा.
मतदान कसे कराल? मतदान प्रक्रिया कशी होते?
महाराष्ट्र विधान परिषदेची रचना कशी असते?
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ किती असतात?
शिक्षक व पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणी करणेबाबत शासन निर्णय
हे ही वाचा.


0 Comments