Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ रचना व निवडणूक कशी होते? संपूर्ण माहिती

सध्या पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघ हा शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असेल. पण पदवीधर मतदारसंघ म्हणजे काय आहे? त्याची गरज का आहे?  त्यामुळे काय फरक पडतो? यासाठी मतदार नाव नोंदणी कशी करावी? या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत.

विधान परिषदेची रचना कशी असते
राज्यात विधान परिषद या वरिष्ठ सभागृहाचे एकूण 78 सदस्य आहेत. यातले 31 सदस्य महाराष्ट्र विधानसभेतील आमदार निवडून देतात, 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. तर 12 जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते आणि 7 उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून येतात. हे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ आहेत मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती.

विधान परिषदेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी नवीन निवडणूक होते हे तर आपल्याला माहीतच आहे.


पदवीधर मतदार संघ

महाराष्ट्रात विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदही आहे. ज्याचे आमदार हे नगरसेवक-जिल्हापरिषद सदस्यांमधून,आमदारांमधून, शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून जातात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीप्रक्रियेत स्थान मिळावं अशी त्यात कल्पना आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात.

पदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही,याचा प्रसार करणं ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात. त्यास निवडून देतात तो त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतो आणि पदवीधारकांचे प्रश्न सोडवतो.तो विधान परिषदेचा आमदार म्हणून काम करतो.


१. तो भारताचा नागरीक असावा.
२. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्‍या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्‍सम विद्‍यापिठाचा पदवीधर असावा.
३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा

४. त्‍याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.

५. पदविका (Diploma) जर पदवीतूल्‍य असेल तरच पदवीधर गृहित धरण्‍यात येईल.   



महाराष्ट्रात विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदही आहे. ज्याचे आमदार हे नगरसेवक-जिल्हापरिषद सदस्यांमधून,आमदारांमधून, शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून जातात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीप्रक्रियेत स्थान मिळावं अशी त्यात कल्पना आहे. 
     माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक यासाठी मतदान करु शकतात. यातून निवडलेल्या शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडावेत अशी अपेक्षा असते.
     सद्या शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्हा परिषद शिक्षकांना ही मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून चळवळ सुरु आहे. आपणही यात सहभागी होवू शकता. सहभागी होण्यासाठी Click Here

१. तो भारताचा नागरीक असावा.
२. त्‍याने मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्‍या लगतच्या ६ वर्षात किमान ३ वर्षे माध्‍यमिक किंवा उच्‍च माध्‍यमिक शाळेत शिक्षक म्हणून पूर्णवेळ काम केलेले असावे.
३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा

४. त्‍याने विहित कागदपत्रांसह त्यांनी फॉर्म क्र. १९ भरावा.



शिक्षक पदवीधर असल्‍यास शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्‍ही मतदारसंघात मतदान करू शकतात.

शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्‍यक इतर कागदपत्रे
१. रहिवासाचा पुरावा. (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्‍ती, टेलीफोन/विज बिल किंवा इतर मान्‍यताप्राप्‍त कागदपत्रांची साक्षांकित प्रत.)
२. मार्क लिस्‍टची साक्षांकित प्रत.
३. पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.
४. ओळखपत्र
५. शिक्षक असल्‍यास नोकरी करीत असल्‍याबाबत (आजी किंवा माजी) प्राचार्यांचे पत्र
६. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्‍यास त्‍याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्‍यास प्रतिज्ञापत्र.

साक्षांकन
प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्‍ह्‍यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी,किंवा शासन मान्‍यता प्राप्‍त विद्‍यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्‍य राजपत्रित अधिकार्‍यांकडून करून घ्‍यावे.    

अर्ज आणि कागदपत्रे सादर करणे 
मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती, आपल्या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO)किंवा अन्‍य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्‍टानेही सादर केल्‍या जाऊ शकतात. शक्‍यतो ही कागदपत्रे समक्ष सादर करून त्‍यांची पोहोच घ्‍यावी. तसेच अद्‍ययावत प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द झाल्‍यानंतर, त्‍यात स्‍वत:चे नाव असल्‍याची खात्री करावी.  

मतदार नाव नोंदणी कशी करावी?

पदवीधर व शिक्षक मतदार यादीत नाव शोधा.


मतदान कसे कराल? मतदान प्रक्रिया कशी होते?
📌 पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.
📌 बॅलट म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारूनच मतदान होतं. त्यामुळे मतदारसंघात हजर राहून मतदान करणं आवश्यक आहे.
📌 मतपत्रिकेवर नमूद उमेदवार क्रमांकानुसार, उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.
📌 सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठीइंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतो.
📌 पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१३ असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील). 
📌 मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करू नयेत. 
📌 मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्‍यात यावा. अन्‍यथा मत बाद ठरेल.  
📌 "वरीलपैकी कोणी पर्याय नाही" (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असतो.
'नोटा' किंवा पसंती क्रमाने मत देता येते. यापैकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा.

Post a Comment

1 Comments

close