Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Maha School GIS 1.0 | GIS School Mapping APK Download | GIS school Mapping कसे करावे❓You Tube Video पहा. | GIS School mapping User Manual PDF | Step by Step Guidance | शासन निर्णय

GIS School Mapping राज्यातील सर्व शाळांचे जीआयएस मॅपिंग एकाच दिवसात करण्यात येणार आहे. Maha School GIS 1.0  GIS School Mapping APK Download | GIS school Mapping कसे करावे❓You Tube Video पहा.




GIS School mapping Errors


1) GIS School Mapping Error - Network Error Please try Again.

Solution - रेंज चा problem -Mobile Flight Mode On/Off करा किंवा मोबाईल Restart करा.



2)java.net.ConnectException: Failed to connect to tom.mrsac.org.in/115.124.125.64:443

Solution - GIS school mapping App चे cache clear करा. / Uninstall करुन परत install करा. 

3) Something went wrong with MahaSchoolGIS

MahaSchoolGIS closed because this app has a bug.

Solution - लोड येत आहे, थोड्या वेळाने प्रयत्न करा.



Solution - 

1) Clear Catche of Your GIS School mapping app 


2) School Mapping Errors problem solveबाबत video पहा. 

Video 2nd - Click Here



1. सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या यु-डायस नंबर असणाऱ्या सर्व शाळांचे GIS मॅपिंग करावयाचे आहे.

2. प्रत्येक मुख्याध्यापकाने Maha School GIS 1.0 हे ॲप डाऊनलोड करावयाचे आहे.


3. वरील ॲप हे प्लेस्टोर वर उपलब्ध नाही. राज्यस्तरावरून काही वेळात APK फाईल मिळेल त्यातून हे ॲप घ्यावयाचे आहे.

4. APK फाईल मधून ॲप डाऊनलोड करण्यासाठी सेटिंग करावी लागेल. Play store - play protect-improve harmful app detection हे डिसेबल करावे.



5. यु-डायस प्लस मध्ये जे मुख्याध्यापकांचे नंबर नोंदविलेले आहे त त्याला हे अॅप लिंक केलेले आहे.

6. ॲप डाऊनलोड केल्यावर त्यात मोबाईल नंबर टाकून त्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल मग लॉगिन करता येईल.

7. लॉगिन केल्यावर संबंधित शाळेची यु-डायस वरची माहिती स्क्रीनवर दिसेल.

8. पुढे स्क्रोल केल्यावर गेट लोकेशन या टॅबवर क्लिक करावयाचे आहे. अक्षांश रेखांशाची ऍक्युरसी 10 मीटर पेक्षा कमी आल्यावरच कॅमेरा बटन इनेबल होते. 

9. अर्थातच ही सर्व कार्यवाही मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेत जाऊन शाळेतच करावयाची आहे.

10. कॅमेरा टॅब वर क्लिक केल्यानंतर फ्रंट व्ह्यू हा पहिला फोटो काढावयाचा आहे. शाळेच्या फ्रंट व्ह्यू चा म्हणजे साधारण शाळेचा नाव येईल असा फोटो काढून अपलोड करावयाचा आहे.

11. त्यानंतर जनरल व्ह्यू अशी टॅब येईल. साधारण सर्व शाळा दिसेल असा फोटो काढून तो अपलोड करावयाचा आहे.

12. त्यानंतर किचन शेड फोटो काढून तो अपलोड करावयाचा आहे. ज्या शाळांमध्ये सेंट्रलाइज किचन आहे आणि शाळेत किचन शेड नाही त्या शाळांनी आपल्याकडे शालेय पोषण आहाराचे वाटपाचे साहित्य ताट वगैरे ज्या ठिकाणी ठेवतो तेथील फोटो काढून अपलोड करावयाचा आहे. किचन सेट असेल तर किचन शेड चा फोटो अपलोड करावा.

13. त्यानंतर शाळेतील ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी चा फोटो अपलोड करावा.

14. त्यानंतर बॉईज टॉयलेट हा फोटो अपलोड करावा. (फक्त मुलींची शाळा असेल तर बॉईज टॉयलेट फोटोच्या ठिकाणी कॅन्सल ही टॅब सिलेक्ट करावी)

15. त्यानंतर गर्ल्स टॉयलेट चा फोटो काढून तो अपलोड करावा (फक्त मुलांची शाळा असेल तर गर्ल्स टॉयलेट फोटोच्या ठिकाणी कॅन्सल ही टॅब सिलेक्ट करावी)

16. फोटो योग्य पद्धतीने आले आहेत की नाहीत हे तपासून मग फोटो सेंड ही टॅब क्लिक करून सेंड करावेत.

17. ज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही त्या मुख्याध्यापकांनी अॅप मध्ये वर दिलेल्या पद्धतीने एका नंतर एक फोटो काढून घ्यावेत आणि ते फोटो सेव्ह टॅब क्लिक करून सेव करावेत. त्यानंतर आपण कनेक्टिव्हिटी मध्ये आल्यानंतर करावी. ॲप ओपन करून सेंड ही टॅब क्लिक करावी.

18. लॉग इन केल्यानंतर हेल्प या टॅब वर क्लिक केल्यानंतर युजर मॅन्युअल मध्ये वरील सर्व प्रक्रिये बाबतच्या माहितीचे पीडीएफ आणि व्हिडिओ आहे. ते देखील प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पाहून घ्यावेत.

19. एका मोबाईलवर एक शाळा मॅप होईल. ज्या मुख्याध्यापकांचा मोबाईल अँड्रॉइड नाही उदाहरणार्थ - आयफोन मोबाइल असेल तर दुसऱ्या एखाद्या अँड्रॉइड असलेल्या मोबाईलवर अॅप डाऊनलोड करावे. लॉग इन करण्यासाठी ओटीपी आयफोन वर जाईल. तो ओटीपी अँड्रॉइड मोबाईल मध्ये टाकून लॉगिन करता येईल.

20. ॲपचा एक्सेस राज्यस्तरावरून काही कालावधीसाठी म्हणजे राज्यातील 100% शाळा पूर्ण होईपर्यंत सुरू असणार आहे. तोपर्यंत माहिती एडिट होईल. एकदा वरिष्ठ स्तरावरून ॲकसेस बंद झाल्यानंतर कोणतीही माहिती एडिट करता येणार नाही.


सर्व मुख्याध्यापकांनी दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी शाळेत प्रत्यक्ष जाऊन हे GIS मॅपिंग चे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावयाचे आहे.

Maha School GIS 1.0 APK - Click Here

GIS School Mapping APK Download - Click Here


GIS school mapping user manual PDF download - Click Here


GIS school mapping Guidance PDF download - Click Here


GIS school Mapping कसे करावे❓You Tube Video पहा. 



GIS school mapping step by step guide

➡️1.सर्वप्रथम play store open करावे.

➡️2.Profile picture वर click करावे.

➡️3.Play protect वर click करून उजव्या कोपऱ्यात असलेल्या setting icon वर click करावे.

➡️4.पुढे general मध्ये active असणारे दोन्ही options(blue light ला touch करून) pause आणि turn off करावे .

➡️5. Maha school GIS apk डाउनलोड करावे. 

Maha School GIS 1.0 APK - Click Here


➡️6.App install करावे.

➡️7.ओपन झाल्यानंतर सर्व permissions allow कराव्या.

➡️8.Login करताना udise शी link असलेला मुख्याध्यापकांचा mobile number टाकून login करावे.

➡️9.सदरील number वरील OTP टाकून confirm करावे.

➡️10.OTP टाकल्यावर login Success होईल.

➡️11.Dash Board वरील school mapping वर click करावे. यात मुख्याध्यापकांची माहिती दिसेल.

➡️12.School mapping GIS open होईल.

➡️13.शाळेच्या 10 मीटरच्या आत उभे राहून location open करावे.

➡️14.Get location open करावे. accuracy 10 मीटरच्या आत असावी.

➡️15. खालील photo  landscape (आडवे फोटो) काढून upload करावे.

1.शाळेच्या दर्शनी भागाचा फोटो 

2.शाळेसह क्रीडांगण 

3.किचन शेड 

4.पाण्याची सुविधा 

5.मुलांचे शौचालय 

6.मुलींचे शौचालय 

➡️Remarks मध्ये ok लिहून Send वर click करावे.

➡️Send वर click केल्यानंतर आपली माहिती यशस्वीपणे पाठविली जाईल.


राज्यातील सर्व शाळांचे Geo Tagging करण्याबाबत शासन निर्णय दि. 23 एप्रिल 2025

राज्यातील सर्व शाळांबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या UDISE plus या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळांबाबतची विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा इ. माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर शासन स्तरावर विविध धोरण/कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो. तथापि, धोरणांच्या आखणीकरीता व अंमलबजावणीकरीता अन्य माहिती जसे गांव, वाडया, वस्ती यांचे ठिकाण (Location), लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग/महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंत्तर, शाळांच्या नजिक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सद्यःस्थितीत उपलब्ध नव्हती,


२. ही कमतरता भरुन काढण्याकरीता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर (MRSAC) या संस्थेसोबत दि.०४.०२.२०२५ रोजी करारनामा करण्यात आला आहे. त्यामुळे MRSAC कडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व UDISE plus या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागांची माहिती यांचे एकत्रिकरण करुन सदरहू माहिती एका स्वतंत्र Dash Board वर उपलब्ध करण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागास संबंधित विविध योजनांच्या आखणीकरीता व अंमलबजावणीकरीता होणार आहे, त्या अनुषंगाने सदर करारनामा करण्यात आला आहे.


३. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे (geospatial technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरीता Mobile App: "Maha School GIS" अॅप विकसित करण्यात आले आहे.

सदर अॅप मध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडयस प्लस मधील संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावयाचे आहे. त्यानंतर शाळेची युडयस प्लस मध्ये भरलेली माहिती या अॅपमध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे GIS Location (Latitude & Longitude with time stamp) Capture करुन शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण ५ फोटो समाविष्ट करुन शाळेने माहिती भरावयाची आहे.

३. सदर माहिती संबंधीत अॅप वर भरतांना संबंधीत मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो / माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्यात यावी.

४. सदर माहिती संबंधीत ॲपवर दि. ३० एप्रिल, २०२५ पुर्वी अद्ययावत करण्यात यावी.


Share with your friends

Post a Comment

0 Comments

close