संचमान्यता 2025-26 | सन 2025-26च्या (प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक) संचमान्यता, स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टल वर मुख्याध्यापक Loging वरुन माहिती अद्ययावत करणेबाबत परिपत्रक
School Portal - https://education.maharashtra.gov.in/
संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here
Sanch Manyata Portal Login - Click Here
Student Portal login - Click Here
UDISE Plus Portal Main Profile - Click Here
UDISE Teacher Portal Module link - Click Here
UDISE Student Portal Module link - Click Here
सन २०२५-२६ ची प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक ऑनलाईन संचमान्यता निर्गमित करण्यासाठी इ १ ली ते १० वी व इ. ११ वी ते १२ वी च्या शाळा/वर्ग तुकड्यांचे अनुदान प्रकार, माध्यम व व्यवस्थापनाबाबतची माहिती शाळांना स्कूल पोर्टलवर भरुन अद्ययावत करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना कळविण्यात येत आहे.
१. मुख्याध्यापक School Portel Loging करुन शाळेचे मेडीयम व अनुदान प्रकार निश्चित करुन शाळा Forward करणे,
२. मुख्याध्यापक यांनी student Portal ला जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या, अनुदान प्रकार, माध्यम व व्यवस्थापन प्रकार तपासून संचमान्यतेसाठी Forward करणे,
३. केंद्र प्रमुख यांना Cluster मधील सर्व शाळांची माहिती दिसेल. केंद्रप्रमुख यांनी शाळा निहाय माहिती तपासणे., एखाद्या शाळेची माहिती मध्ये बदल करावयाचा असल्यास तो बदल करुन Cluster च्या शाळांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना forward करेल, बदल नसल्यास केंद्रातील शाळा Verify करुन संचमान्यतेसाठी Forward होतील.
४. मुख्याध्यापक Loging ला Fetch बटन असेल त्यावर Click करुन शाळेची संपूर्ण माहिती दिसेल शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी. सर्व तपशील बरोबर असल्यास Verity करावे.
५. मुख्याध्यापक यांनी Loging करुन Get School Information Button Click करावे. आलेली माहिती चेक करुनच वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जावे. आणि युडायस प्लस मधील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास माहिती दुरुस्त करावी.
६. सन २०२५-२६ या वर्षाच्या संच मान्यतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित वर कार्यरत शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती शालार्थ प्रणालीकडून घेतली जाणार आहे. एकपेक्षा अधिक माध्यमाची शाळा असल्यास शिक्षकांच्या नावासमोर माध्यमाची नोंद करावी. तसेच विनाअनुदानित तत्वावर वैयक्तिक मान्यता प्राप्त व कार्यरत असलेल्या प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी शाळास्तरावर संचमान्यता पोर्टलला टैब मुख्याध्यापक लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
उपरोक्त बाबतची कार्यवाही दिनांक ०७.११.२०२५ पर्यत पूर्ण करुन घेण्यात यावी. सदरची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन २०२५-२६ च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगीनवर उपलब्ध होणार नाहीत.
सदरची कार्यवाही न केल्याने एखाद्या शाळेची संचमान्यता उपलब्ध झाली नाहीतर त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी.




 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

0 Comments