शिक्षक व अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणेबाबत परिपत्रक, शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा सहभाग लिंक | शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका PDF | Shikshak V Adhikari Spardha link, guidance PDF
शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा उद्देश
राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, DIET मधील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे, त्यांच्यात समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल, भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात येत आहे.
या स्पर्धांच्या आयोजनासाठी निकष आणि नियमावली तयार करण्यात आली आहे. सदर स्पर्धा ह्या एकूण ४२ विषयांवर आधारित असणार आहेत. नमूद स्पर्धांचे निकष व नियमावली बाबतची सविस्तर माहिती शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका ह्या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी सदर पुस्तिकेत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ह्या संस्थेच्या www.maa.ac.in ह्या संकेतस्थळावर उपयुक्त या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शिक्षक व अधिकारी/कर्मचारी विविध स्पर्धांसाठी नावनोंदणी बाबत सूचनाः
१. राज्यातील शिक्षक व अधिकारी यांनी स्पर्धेत नाव नोंदणी करण्यापूर्वी उपरोक्त नमूद वाचा येथील स्पर्धा आयोजन पत्र व माहिती पत्रक काळजीपूर्वक वाचून अवलोकन करावे.
२. शिक्षकांची तालुका स्तरीय (BRC/URC) सर्व स्पर्धांसाठी नाव नोंदणी केंद्रनिहाय केंद्रप्रमुख यांचे मार्फत दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करावी. सर्व केंद्रप्रमुख यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या केंद्रातील एक शिक्षक एकाच स्पर्धेत सहभागी होईल याप्रमाणे स्पर्धकाची निवड करावी,
३. केंद्रप्रमुखांनी केंद्रातून निवड केलेल्या शिक्षकांना नावनोंदणी साठी स्पर्धेची लिंक उपलब्ध करून द्यावी. केंद्रप्रमुखांनी संबंधित स्पर्धेची लिंक केवळ त्या स्पर्धेसाठी निवडलेल्या शिक्षकालाच द्यावी. सदर लिंक इतर कोणत्याही शिक्षकास देऊ नये. तसेच त्या निवडलेल्या शिक्षकांनीही कोणत्याही परिस्थितीत संबंधित लिंक इतर कोणत्याही शिक्षकास पुढे पाठवू नये, असे स्पष्टपणे सांगावे.
४. केंद्रप्रमुखांनी खात्री करावी की त्यांचे मंजुरीशिवाय कोणताही इतर शिक्षक कोणत्याही स्पर्धेसाठी नोंदणी करणार नाही.
५. केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील नावनोंदणी केलेल्या स्पर्धक शिक्षकांना स्पर्धेसाठी नियोजित वेळापत्रकानुसार तालुकास्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित राहणेबाबत आदेशित करावे.
६. आयोजक जिल्ह्यांनी प्रत्येक केंद्रातील एका शिक्षकाचा एकाच स्पर्धेत सहभाग असलेबाबत खात्री करावी. तथापि, एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छित असेल तर संबंधित केंद्रामधील सर्व शिक्षक एखाद्या तरी स्पर्धेत सहभागी झाले असतील तरच त्याला परवानगी देता येईल. (परिषदेचे माहितीपत्रक मुद्दा क्र. १४ वाचावे.)
७. खालील नोडल अधिकारी यांचे संपर्क नंबर केवळ केंद्रप्रमुख व वरिष्ठ अधिकारी यांना अधिकच्या समन्वयासाठी देण्यात येत आहे. स्पर्धानिहाय आवश्यकतेनुसार संबंधित स्पर्धा नोडल अधिकारी यांना संपर्क साधून शंका निरसन करून घ्यावे.
शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा सहभागी होणेसाठी लिंक
0 Comments