Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम 2024 जाहीर, निवडणूक मतदान व निकालाबाबत चे नियोजन पहा.

शिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम 2024 निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 02 पदवीधर आणि 02 शिक्षक मतदारसंघातून द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या निवडणुकीसाठी 26 जून 2024 रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.असा असेल पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम 2024 

अर्ज करणे - 31 मे ते 07 जून

अर्ज छाननी - 10 जून

अर्ज मागे घेण्याची मुदत - 12 जून पर्यंत


मतदानाची तारीख- 26 जून 2024 (बुधवार) 

मतदान वेळ - स. 8.00 ते 4.00
मतदान सुधारित वेळ - स. 7.00 ते 6.00

निकाल - 01 जुलै 2024 (सोमवार) 


पदवीधर व शिक्षक मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे शोधा. Click Here
निर्वाचन आयोग PDF  Click Here 


शिक्षक पदवीधर मतदारसंघ मतदान वेळेत झाला बदल

राज्यात येत्या २६ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, मतदारांना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. ही वेळ वाढवण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी मागणी केली होती.

ठाकरे यांच्या शिवसेनेची ही मागणी मान्य करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाचा कालावधी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत निश्चित केला आहे. यापूर्वी हा कालावधी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होता.Post a Comment

0 Comments

close