Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि. प. शिक्षकांना शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत मतदान करण्याचा हक्क मिळणे बाबत.....

मा.निवडणूक आयुक्त
महाराष्ट्र राज्य.

विषय:-
    जिल्हा परिषद शिक्षकांना शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क मिळणेबाबत...

महोदय, 
शिक्षकांचे प्रश्न व विविध प्रश्नांवर दृष्टिकोन मांडण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेत शिक्षक आमदार असण्याची तरतूद  आहे. सदरील आमदार शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करतात ,शिक्षकांमध्ये राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या सर्वात जास्त असतांनाही  महाराष्ट्रातील आम्ही जिल्हा परिषद शिक्षक मात्र त्यांना मतदान करू शकत नाही किंवा निवडणूकही लढवू शकत नाही.त्यामुळे सदरील आमदार समस्त शिक्षक वर्गाचे प्रतिनिधी ठरत नाहीत.  त्यामुळे जिल्हा परिषद  शिक्षकांना शिक्षक आमदार निवडणुकीत मतदानाचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळावा ही विनंती. त्यातून आमचे प्रश्न व दृष्टिकोन विधानपरिषद या सभागृहात मांडले जातील. त्याचप्रमाणे शिक्षक समुदायातील अजूनही जे घटक समाविष्ट नाहीत त्यांचाही समावेश करावा ही विनंती.

आपला नम्र

जि.प.प्राथ.शाळा
ता.
जि.

Post a Comment

0 Comments

close