Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

TAIT Exam 2025 | शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam - 2025) | TAIT परीक्षा अभ्यासक्रम | माध्यम | पात्रता | कालावधी | अर्ज करण्याची पद्धती tait exam Application link - https://mscepune.in | https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकावर आधारित असेल, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमतामध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam)- 2025 ही परीक्षा ऑनलाईन होणार असून परीक्षेचा कालावधी 25-05-2025 ते 05-06-2025 असा आहे. परीक्षेचे अर्ज 26-04-2025 पासून करता येतील. 17-05-2025 पासून प्रवेशपत्र उपलब्ध होतील. 



TAIT Exam 2025

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा - 2025 चे आयोजन मे / जून 2025 मध्ये परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.  शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 24/05/2025 ते 05/06/2025 या कालावधीत ऑनलाईन घेण्यात येईल. सदर परीक्षेचे अर्ज 26/04/2025 ते 10/05/2025 दरम्यान करता येतील. 

TAIT परीक्षेसंबंधी अधिसूचना पाहण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या. 
See more details - https://www.mscepune.in/



TAIT Exam ऑनलाईन परीक्षा माहितीपत्रक, अभ्यासक्रम, पात्रता

शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT Exam)- 2025 अर्ज कसा करावा? 

TAIT Exam अर्ज करण्याचा कालावधी - 26-04-2025 ते 10-05-2025 पर्यंत

TAIT परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम मुदत - 10-05-2025 रोजी 23:59 पर्यंत

TAIT परीक्षा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी लिंक - Click Here

TAIT Exam Hall Ticket 17-05-2025 पासून उपलब्ध - Click Here







TAIT Exam Result Official website Link - mscepune.in Go to website and open result section

Result section link Click Here





TAIT EXAM - Sample Questions






CTET दिलेले उमेदवार TAIT साठी पात्र 

How to Apply TAIT Exam ? 

अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन परीक्षा माहिती पत्रक डाउनलोड करा. Click Here

सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.

ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.

परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम PDF

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकावर आधारित असेल, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमतामध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.

TAIT Syllabus PDF

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम खालील प्रमाणे.

Tait exam पेपर साठी २ घटक असतात अभियोग्यता व बुद्धिमता व परीक्षा ही एकूण २०० प्रश्नांची व २०० गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल.


अभियोग्यता 120 प्रश्न (60% प्रश्न )

बुद्धिमत्ता 80 प्रश्न (40% प्रश्न)

एकूण गुण - 200

वेळ - 2 तास


अभियोग्यता या घटकांमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो.

अभियोग्यता

1. गणितीय क्षमता,

2. तर्क क्षमता,

3. वेग आणि अचूकता,

4. इंग्रजी भाषिक क्षमता,

5. मराठी भाषिक क्षमता,

6. अवकाशीय क्षमता,

7. कल / आवड,

8. समायोजन / व्यक्तिमत्व


बुद्धिमत्ता या घटकामध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो.

बुद्धिमता

1. आकलन,

2. वर्गीकरण,

3. सांकेतिक भाषा,

4. लयबध्द मांडणी,

5. समसंबंध, 

6. कुट प्रश्न,

7. क्रम श्रेणी,

8. तर्क व अनुमान


Prospect for TAIT Exam



महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम PDF- Click Here

TAIT Exam Syllabus PDF - Click Here




Post a Comment

0 Comments

close