Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

PRASHAST App 2.0 | प्रशस्त प्रणाली | PRASHAST - Pre-Assessment Holistic Screening Tool अंतर्गत प्रवेशित 100% मुलांची होणार तपासणी | PRASHAST App 2.0 Download Link

PRASHAST App 2.0 | प्रशस्त प्रणाली | PRASHAST - Pre-Assessment Holistic Screening Tool | PRASHAST ॲप 2.0 ची अंमलबजावणी करणे आणि सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग (तपासणी) पूर्ण करण्याबाबत... PRASHAST App 2.0 Download Link 



'प्रशस्त' (PRASHAST - Pre-Assessment Holistic Screening Tool) प्रणाली ही शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचा एक उपक्रम आहे. याचा मुख्य उद्देश नियमित शाळांमध्ये शिकणाऱ्या विशेष गरजा असलेल्या मुलांची (CwSN - Children with Special Needs) सुरुवातीच्या टप्प्यावरच ओळख पटवणे आणि त्यांची तपासणी (Screening) करणे हा आहे. 'प्रशस्त' (PRASHAST - Pre-Assessment Holistic Screening Tool) ॲप द्वारे 'दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा, २०१६' (RPWD Act, २०१६) अंतर्गत अधिसूचित केलेल्या २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाशी संबंधित लक्षणांची तपासणी करण्यास मदत करते.

सुधारित 'PRASHAST App २.०' आता UDISE + प्रणालीशी जोडण्यात आलेले आहे, ज्यामुळे शाळा, विद्यार्थी, वर्गशिक्षक, मुख्याध्यापक (HoS) आणि विशेष शिक्षक (Special Educators) यांची परस्पर सांगड (Mapping) सहजतेने घालणे शक्य झाले आहे. या एकत्रीकरणामुळे विद्यार्थी माहितीचे स्वयंचलित सिंक्रोनायझेशन (Synchronization), भूमिकेवर आधारीत प्रवेश (Role-based access), जबाबदाऱ्यांचे वाटप आणि तपासणी (Screening) उपक्रमांचे निरीक्षण करणे सुलभ झाले आहे, परिणामी तपासणी प्रक्रियेची कार्यक्षमता आणि अचूकता वाढली आहे.

जानेवारी २०२६ मध्ये विभागामार्फत आयोजित 'सर्व समावेशक शिक्षण परिषद (Inclusive Education Summit) मध्ये मा. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये PRASHAST ॲपद्वारे सर्व मुलांचे १००% विद्यार्थ्यांची तपासणी (Screening) करण्याच्या आवश्यकतेवर भर दिलेला आहे. जेणेकरून अतिरिक्त मदतीची गरज असलेल्या मुलांची लवकर ओळख पटेल आणि सर्वसमावेशक शिक्षणाचे नियोजन व उपाययोजना अधिक बळकट करता येतील.

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ दरम्यान 'PRASHAST App २.०' ची कालमर्यादेत आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे उपक्रम आणि कालमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे:


उपरोक्तप्रमाणे नमूद केल्यानुसार जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना खालील बाबींवर कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात येत आहे.

i) PRASHAST App २.० हे ॲप कार्यान्वित होताच मुख्याध्यापक/प्राचार्य आणि इतर संबंधित वापरकर्त्यासाठी संस्थात्मक लॉगिन (institutional login) सक्रिय केले जातील याची खात्री करावी.

ii) आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत शाळेत प्रवेशित १००% विद्यार्थ्यांचे PRASHAST App २.० द्वारे तपासणी (screening) पूर्ण केले आहे याची खात्री करावी.

iii) PRASHAST App २.० चा वापर आणि तपासणी प्रक्रीयेबाबत शिक्षक व विशेष शिक्षकांना मार्गदर्शन व क्षमता वृन्द्वी करणे (capacity building) कार्यक्रमांना चालना देणे; आणि

(iv) PRASHAST App २.० द्वारे तपासणी (screening) ची कामे वेळेत पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी प्रगतीचा नियमित आढावा घेणे.

भारत सरकारने संदर्भिय पत्रान्वये PRASHAST App २.० बाबत दिलेल्या वेळापत्रकाचे कालमर्यादेत आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, हि विनंती. 


PRASHAST App 2.0  Download Link - Click Here





PRASHAST ॲप 2.0 ची अंमलबजावणी करणे आणि सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रिनिंग (तपासणी) पूर्ण करण्याबाबत परिपत्रक - Click Here


Post a Comment

0 Comments

close