Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, सममूळ संख्या | मूळ संख्या 1 ते 100 | मूळ संख्या 1 ते 1000 | prime numbers

मूळ संख्या म्हणजे काय? (mul sankhya / prime numbers in marathi) मूळ संख्या 1 ते 100 मध्ये कोणत्या आहेत? जोडमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ संख्या म्हणजे काय? सममूळ संख्या म्हणजे काय? 1 ते 1000 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

मूळ संख्या

मूळ संख्या म्हणजे काय? (mul sankhya / prime numbers in marathi) 

इंग्रजीत prime number म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संख्येला मराठी भाषेत मूळ संख्या असे म्हटले जाते. 

व्याख्या - ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 'मूळ संख्या' असे म्हणतात. 

उदाहरणार्थ 1) : 5, पाच या संख्येला फक्त 1 किंवा 5 नेच पूर्ण भाग जातो. म्हणून 5 ही एक मूळ संख्या आहे. 

उदाहरणार्थ 2) : 6, सहा या संख्येला फक्त 1, 2, 3 आणि 6 ने पूर्ण भाग जातो. म्हणून 6 ही एक मूळ संख्या नाही. 

उदाहरणार्थ 3) : 2, दोन या संख्येला फक्त 1 किंवा 2 नेच पूर्ण भाग जातो. म्हणून 2 ही देखील एक मूळ संख्या आहे. 

मूळ संख्या 1 ते 100 | prime numbers 1 to 100

ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो अशा 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. या संख्या पुढील प्रमाणे आहेत.

2, 3, 5, 7, 

11, 13, 17, 19,

23, 29, 

31, 37, 

41, 43, 47,

53, 59, 

61, 67, 

71, 73, 79, 

83, 89, 

97.

1 ते 100 मधील मूळ संख्या ओळखण्यासाठी एक युक्ती

चाचा दोदोती दोदोती दोए याप्रमाणे प्रत्येक 10 ओळीतील संख्या निश्चित करता येईल. 

चा म्हणजे 4, दो म्हणजे 2, ती म्हणजे 3, ए म्हणजे 1

जोडमूळ संख्या

जोडमूळ संख्या म्हणजे काय? 1 ते 100 मधील जोडमूळ संख्या? 

ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2 चा फरक असतो. त्यास जोडमूळ संख्या असे म्हणतात. 

1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 1 ते 100 मधील जोडमूळ संख्या पुढीलप्रमाणे आहेत.

3 व 5

5 व 7

11 व 13

17 व 19

29 व 31

41 व 43 

59 व 61

71 व 73

सहमूळ संख्या

सहमूळ संख्या म्हणजे काय?  1 ते 100 मधील सहमूळ संख्या कोणत्या? 

सहमूळ संख्या : ज्या दोन संख्यांना 1 हा एकच सामाईक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. 

उदाहरणार्थ: प्रथम आपण 4 व 9 या संख्यांचे चे सर्व विभाजक पाहू.

4 चे विभाजक आहेत 1,2,4 आणि 9 चे विभाजक आहेत 1,3,9.

या दोन्ही संख्यांच्या विभाजाकांमध्ये 1 ही एकच संख्या आहे जी सामाईक आहे. 

म्हणून 4 व 9 या सहमूळ संख्या आहेत. 

1 ते 100 पर्यंत सहमूळ संख्या किती आहेत? 

1 ते 100 पर्यंत सहमूळ संख्यांच्या अनेक जोड्या आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे : (1, 2), (3, 65), (2, 9), (99, 100), (34, 79), (54, 67), (10, 11).

सममूळ संख्या

सममूळ संख्या म्हणजे काय?  सम मूळ संख्या कोणत्या? 

सम मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी सम आणि मूळ दोन्ही आहे. गणितात ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो तिला सम संख्या म्हणतात. म्हणून संख्या प्रणाली मध्ये 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 

मूळ संख्या 1 ते 100 आधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न - 1 ते 100 दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत? 
उत्तर - 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत. ज्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 आहेत.

प्रश्न - सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे?
उत्तर - 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे.  

प्रश्न - 1 ते 100 दरम्यान एकूण किती मूळ संख्या सम संख्या आहेत? 
उत्तर - 1 ते 100 दरम्यान 2 ही एकच सममूळ संख्या आहे.

प्रश्न - 1 ते 100 दरम्यान एकूण किती जोडमूळ संख्या आहेत? 
उत्तर - 1 ते 100 दरम्यान 8 जोडमूळ संख्या आहेत. 

प्रश्न - 1 ते 50 मधील मूळ संख्या किती आहेत? 
उत्तर - 1 ते 50 मधील एकूण मूळ संख्या 15 आहेत.
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47.

प्रश्न - 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती होते? 
उत्तर - 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची एकूण बेरीज 24133 एवढी होते.

1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या | mul sankhya 1 to 1000

2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97, 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199, 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281, 283, 293, 307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373, 379, 383, 389, 397, 401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491, 499, 503, 509, 521, 523, 541, 547, 557, 563, 569, 571, 577, 587, 593, 599, 601, 607, 613, 617, 619, 631, 641, 643, 647, 653, 659, 661, 673, 677, 683, 691, 701, 709, 719, 727, 733, 739, 743, 751, 757, 761, 769, 773, 787, 797, 809, 811, 821, 823, 827, 829, 839, 853, 857, 859, 863, 877, 881, 883, 887, 907, 911, 919, 929, 937, 941, 947, 953, 967, 971, 977, 983, 991, 997.

मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंतच्या | prime numbers in marathi

1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती होते? 

1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्यांची एकूण बेरीज 368213 एवढी होते.

Post a Comment

0 Comments

close