वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांच्या पात्रतेचे निकष कोणते ते पाहूया.
वरिष्ट वेतनश्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे - Click Here
निवडश्रेणी प्रशिक्षणाची उद्दिष्टे - Click Here
वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण पात्रता निकष
वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणास नोंदणी करण्यासाठी उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- १२ वर्षाची अर्हताकारी सेवा
- या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
- अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 प्रशिक्षण अपडेट, शासन परिपत्रक पहा.
वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.
शालेय शिक्षण WhatsApp Group
निवडश्रेणी प्रशिक्षण पात्रता निकष
निवडश्रेणी प्रशिक्षणास नोंदणी करण्यासाठी उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- २४ वर्षाची अर्हताकारी सेवा
- अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.क)
- प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
- प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
- माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.
2 Comments
माझे 10 वर्ष पूर्ण झाल्यावर मला मला पदवीधर शिक्षक पद्दोन्नती मिळाली आणि मला आता बारा वर्षे पूर्ण झाले आहे तर मला आता वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण करता येईल का ? कृपया मार्गदर्शन करा
ReplyDeleteमाझा हि तुमच्यासारखाच विषय आहे
Delete