Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

5 डिसेंबर : शाळा बंद आंदोलन प्रमुख मागण्या, प्रशासनाची भूमिका

दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलन प्रमुख मागण्या, आंदोलनात का सहभागी व्हावे, आंदोलनाबाबत शिक्षण संचालक यांचे परिपत्रक


TET बंधनकारक यावर तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे उपाय वाचा



🛑संप यशस्वी झाले आहे 💐💐💐💐संपात सहभागी सर्व आदरणीय शिक्षक बांधवांचे खूप..खूप अभिनंदन 🎉 🎉🎉🎉🎉 

      सर्व राज्यातून माहिती मिळत आहे.......संपात हजारो शिक्षकांनी शाळा बंद करून सहभाग घेतले आहे.....

         आज संध्याकाळ पर्यंत केंद्र सरकार मार्फत TET बद्दल एक पत्र जाहीर करण्यात येणार आहे.......हिवाळी अधिवेशनात लोकसभेत 177 खासदारांनी TET बद्दल माहिती दिली आहे.........जवळपास देशातील सर्व खासदार ( 548 ) आपापल्या राज्यातील शिक्षकांची बाजू लोकसभेत आणि राज्यसभेत मांडली आहे.......त्यामुळे आपल्या संपाची दखल केंद्रात घेण्यात आली आहे......

     सर्व खासदारांची बैठक आज  मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज पार पडणार आहे......येत्या 24 तासात चांगली बातमी मिळणार आहे 🦅🐅


🛑 आज 4 वाजेपर्यंत केंद्र सरकार कडून TET रद्द बद्दल आदेश देण्यात येऊ शकतात......
           


🤝 नोकऱ्या घालवण्यासाठी नाही तर नोकऱ्या टिकवण्यासाठी रजा आंदोलन

आदरणीय शिक्षक बंधू/भगिनींनो उद्या राज्यव्यापी रजा आंदोलन होत आहे. सर्वांनी ताकदीने यामध्ये सक्रिय सहभागी होणे गरजेचे आहे.. *न्यायसंगत मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन पुकारले जाताना थंड राहणे ही प्रवृत्ती घातक आहे...* 
किमान इतिहासातून बोध घेतला जावा... मोठ-मोठ्या व्यक्तींची चरित्रे/पुस्तके वाचताना ती केवळ वाचण्यासाठी नसतात, त्यातून बोध घेऊन कृती करण्यासाठी असतात. आज NPS, शिक्षण सेवक पद, TET अट, संचमान्यता GR, शिक्षकांना अध्यापनापासून दूर ठेवणारी कामे... अशा अनेक गोष्टी लादल्या जात आहे आणि आम्ही निमूटपणे किती काळ सहन करत आहोत.

🤷‍♀️ *5 डिसेंबर शाळा बंद आंदोलन कशासाठी❓*

जिथे लढलो तिथे आपण काही अंशी का असेना यश मिळवू शकलो. पण आज अनेक जाचक निर्णयांमुळे आम्ही त्रस्त आहोत. गोरगरिबांचे शिक्षण संपण्याच्या उंबरठ्यावर आम्ही आहोत. 
   न्याय मागण्यांच्या लढ्याला धमकी,इशारे येणारच असतात. एखाद्या वेळी वेतन कपाती सारख्या कुठून निर्णयही घेतल्या जाण्याची शक्यता असते. ५४ दिवसाच्या आंदोलनातून आम्ही प्रेरणा घेणार आहोत की नाही..?? त्यावेळीही लढा चिरडल्या गेला.  कारवाया झाल्या. अनेकांना तुरुंगवास झाला. आंदोलन मोडीत काढले. परंतु शासनाला शेवटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या.‌ त्यातून महागाई भत्ता मिळाला, घरभाडे भत्ता मिळाला, महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा मिळाली, सेवा शाश्वती मिळाली. अनेक मागण्या मंजूर झाल्या.
   आज पूर्वीच्या लढ्याने मिळवलेले गमावण्याची वेळ आली आहे. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील शाळा शिक्षकाविना ओस पडण्याची वेळ आली आहे. 
   शासनाकडे सातत्याने प्रयत्न करूनही प्रश्न सुटत नसल्याने शाळा बंद आंदोलन करण्याची वेळ संघटनांवर आली आहे. अर्ज, विनंती, निवेदने, भेटी या गोष्टींना कदाचित आपली कमजोरी समजल्या जात असेल; त्यामुळेच लढा अधिक तीव्र करण्याची वेळ आली आहे.
   आज अनेक बाजूंनी हा लढा दडपण्याचा प्रयत्न सुरूआहे नोकरीची भीती घालून , अनेक शासकीय पत्रे काढून लढा दाबण्याचा कट सुरू आहे. लढ्याला कमजोर करण्यासाठी काही नतद्रष्ट सुद्धा हातभार लावत आहे. 
   पण एक मात्र *हमे भय नहीं  दमन-दहशतसे.. हमे भय है ज्ञानी लोगोकीं निष्क्रियतासे..*
    हे आंदोलन आहे गोरगरिबांच्या लेकरांचे शिक्षण वाचावे यासाठी..

हे आंदोलन आहे तुमची-माझी नोकरी टिकवण्यासाठी..

हे आंदोलन आहे मनमानी कारभार बंद होण्यासाठी..

हे आंदोलन आहे शाळा, शिक्षण टिकवण्यासाठी.....

*सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊ या.....*
    (५ डिसेंबर २०२५)
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
प्राथमिक/ माध्यमीक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼


5 डिसेंबर शाळा बंद आंदोलनाबाबत शिक्षण संचालक यांचे परिपत्रक

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग, सर्व.

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. सर्व.

३) शिक्षण निरिक्षक, बृहमुंबई (उ.द.प.)


विषय: दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत.


संदर्भ :-

१) विविध वर्तमान पत्रामध्ये छापून आलेली बातमी

२) महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती यांचे दि. निरंक चे निवेदन

३) मा. श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत, सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद यांचे दि.०१/१२/२०२५ चे पत्र

४) महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांचे दि.०१/१२/२०२५ चे निवेदन


वरील विषयाचाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित/ अंशतः अनुदानित/ विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यासाठी दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे उक्त संदर्भीय निवेदन/वृत्तपत्रातील बातमीद्वारे निर्देशनास आलेले आहे.


तरी विद्यार्थी हीत लक्षात घेता दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही यांची आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी, तसेच ज्या शाळा दि. ०५ डिसेंबर, २०२५ रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही आपल्यास्तरावरून करण्यात यावी व सदर चाब सर्व शाळांच्या निर्देशनास आणून द्यावी.


Digitally signed by

Mahesh Madhukar Palkar 13:48:24 (डॉ. महेश पालकर)

Date: 03-12-2025

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रत मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तय सविनय सादर.


सदर परिपत्रकांचा कोणताही परिणाम शिक्षकांवर पडणार नसून 100% शाळा बंद राहणार असलेबाबत शिक्षक संघटनांकडून निश्चय करण्यात आला आहे. 

5 डिसेंबर शाळा बंद आंदोलन का❓कशासाठी❓


सर्व शिक्षकांना TET शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करणे, संचमान्यतेच्या आडून जिल्हा परिषद शाळा बंद पाडणे अशा अन्यायकारक निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड दरी निर्माण होणार आहे. त्यामुळे गरीबांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. अशी मुले शिक्षण प्रवाहा पासून दूर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

TET बंधनकारक व संचमान्यता नवीन निकष शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी सर्व शिक्षकांनी एकजूट दाखवून 5 डिसेंबर रोजीच्या शाळा बंद आंदोलनात 100% सहभागी व्हावे. 


चला... 

जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवू

गरीबांच्या शिक्षणाची दारे खुली ठेवू... 


TET बंधनकारक यावर तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे उपाय वाचा


शाळा बंद आंदोलन बाबत संचालक यांचे परिपत्रक पहा. 


5 डिसेंबरच्या राज्यव्यापी सामूहिक रजा व शाळा बंद आंदोलनामध्ये सर्वच शिक्षक बंधू -भगिनींनी सहभागी व्हावे


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने सर्वांना नम्र आवाहन

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणावर टी.ई.टी.व संचमान्यतेचे मोठे संकट उभे असताना शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने  दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. 

शुक्रवार, दिनांक 5 डिसेंबर 2025  रोजी हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनातील काही मागण्या पुढील प्रमाणे आहेत. 

1)संपूर्ण  राज्यामध्ये 2011 पूर्वी सेवेत दाखल शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून सूट देणे (टी.ई.टी.)


2) संच मान्यतेतील त्रुटी दूर करणे.


3) शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर यांच्या थांबवलेल्या पदोन्नती त्वरित करणे

4) शिक्षकांना ऑनलाइन चे कामे न देता फक्त अध्यापनाचीच काम देणे

5) आम्हाला फक्तशिकवू द्या, आमच्या जि .प. न .पा . व मनपा शाळा टिकवू द्या 

6) जुनी पेन्शन योजना, 10.20.30 आश्वासित योजना लागू करा. 

यासह विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय सामूहिक रजा व शाळा बंद आंदोलनात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी  कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या एकदिवसीय सामूहिक रजा व शाळा बंद आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये प्रत्येक शिक्षक बांधवाने सामील व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आपणांस करण्यात येत आहे .

या आंदोलन मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व संघटना सहभागी असणार आहेत. 

तसेच इतरही सर्व संघटना याबाबतीत आपणास आवाहन करण्यास येतील. तरी सर्व शिक्षक बांधवांना नम्र विनंती आहे की, आपण या सामूहिक रजा आंदोलनात 100% सहभागी व्हावे .
*************************
!!!अभी नहीं तो कभी नही!!!
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

Post a Comment

0 Comments

close